ठाणे शहरातील प्रख्यात जांभळी नाका येथून कृत्रिम कलवट पश्चिमेकडून पूर्वेकडे म्हणजेच कळव्याच्या खाडीत विसर्जित होत असून अनेक वर्षांपासून बाजार पेठेत पावसाचे पाणी साचून होत असलेल्या हानी / नुकसान, वास्तविक सदर कृत्रिम कलवटचे वरील आरसीसी स्लॅब तोडून पूर्णपणे गाळ काढणे गरजेचे आहे याबाबत सामाजिक कार्यकर्ते संजीव दत्ता यांनी महानगर पालिकेला पत्र लिहीले आहे.
खारकर आळी परिसरातील जांभळी नाका जुने बाजारपेठ, ठाणे परिसरातील व्यापारी व स्थानिक नागरिक अनेक वर्षापासून व्यवसाय व लोक राहत आहेत. जांभळी नाका"" पेड्या मारुती" मंदिरा पासून कृत्रिम कलवट पश्चिमेकडून पूर्वेकडे म्हणजेच कळव्याच्या खाडीत विसर्जित होते, परंतु ठाणे महानगरपालिकेकडून सदर कृत्रिम कलवट अपेक्षित प्रमाणे स्वच्छ करण्यात येत नसून केवल स्वच्छतेच्या नावावर मोजकेच गाळ काढण्याचे प्रकार अनेक वर्षांपासून होत असून ऐन पावसाळ्यात सदर ठिकाणी कृत्रिम कलवटातील गाळ त्याच्या खोलीप्रमाणे न काढल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण होते. अशास्थितीत मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी परिसरात भरून / साचून व्यापाऱ्यांच्या दुकानात ते शिरून मोठ्या प्रमाणात वित्तहानी दरवर्षी होते तसेच परिसरातील नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना, शाळेतील विद्यार्थ्यांना, ग्राहकांना याचे त्रास सहन करावे लागते,
परंतु ठाणे महानगरपालिका प्रशासनाकडून याबाबत ठोस कारवाईस्वरूपी निर्णय होत नाही / घेतले जात नाही, वास्तविक सदर कृत्रिम कलवट चे वरील आरसीसी स्लॅब तोडून पूर्णपणे गाळ काढणे गरजेचे आहे, कारण अनेक वर्षांपासूनचे गाळ या ठिकाणी साचलेले असून त्याची मूळ खोली (DEP) ही संपुष्टात आलेले आहे आणि यामुळे ही परिस्थिती निर्माण होते, ही गंभीर बाबा असून दरवर्षी जाणीवपूर्वक हेतू पुरस्कृत कृत्रिम परिस्थिती पावसाळ्यात निर्माण करून प्रामाणिक करदात्या व व्यापाऱ्यांना या संकटातून मोकळे करण्यासाठी तातडीने व तात्काळ उपाययोजना कराव्या असे निवेदन ठाणे महानगर पालिकेला देण्यात आले आहे.
0 टिप्पण्या