शिवसेना आज ५९ वर्षाची झाली,शिवसेनेचा जन्म महाराष्ट्रासाठी खऱ्या अर्थाने भाग्योदय ठरला,मराठी अस्मिता जागृत झाली,१९ जून १९६६ रोजी दादर मुंबई येथे शिवसेनेची स्थापना करण्यात आली, बाळासाहेबांसारखा धगधगता अंगार महाराष्ट्राच्या सेवेत शिवसेनेच्या रूपाने मराठी माणसाच्या अस्मितेला फुंकर घालण्यासाठी पुढे सरसावला !मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना हे ब्रीद वाक्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दणक्यात गर्जना करू लागले,बाळासाहेबांचे नेतृत्व, कर्तृत्व, व वक्तृत्वाची छाप तमाम मराठी मनावर पडू लागली,"जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिणीनो व मातांनो"या चार शब्दांनी बाळासाहेबांनी सर्वांना आपलेसे करून टाकले, महाराष्ट्राच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी कोरून ठेवावेत असे ते प्रचंड आपुलकीचे,प्रेमाचे भारदस्त शब्द ! शिवतीर्थावरून विचारांचे सोने लुटण्याचे काम अनेक दशके सुरूच राहिले, तोच ज्वलंत विचार महाराष्ट्राच्या घराघरात रुजला,अंगिकारला,आणि तो ज्वलंत विचार म्हणजेच शिवसेना !!
हीच खरी बाळासाहेबांची शिवसेना, मातोश्री ची शिवसेना ! सत्तेच्या लालसेपोटी पदाला कधीही स्पर्श केला नाही,जे पोटात तेच ओठात असा एकमेव जगातील नेता म्हणजे बाळासाहेब ! म्हणूनच बाळासाहेबांवर जीवापाड प्रेम केले व आजही ते प्रेम तसंच राहिले आहे, सत्तेच्या राजकारणात कुटील कारस्थाने करून तोडफोड करण्याचा कितीही प्रयत्न झाला तरी,बाळासाहेबांच्या विचारांचे तळागाळातील कट्टर कार्यकर्ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत बाळासाहेबांची शिवसेना कोणीही,व कधीही संपवू शकत नाही ही काळ्या गडावरील रेघ आहे !!आजच्या पडझडीच्या काळात जुने,निष्ठावंत शिवसैनिकच मातोश्री च्या शिवसेनेला गत वैभव प्राप्त करून देऊ शकतात असा ठाम विश्वास व्यक्त होत आहे,त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करायाला हवे! जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांना प्रेमाने एकत्र करा,त्यांना योग्य प्रकारे मानसन्मान द्या हेच नेतेमंडळीने लक्षात घेऊन काम केले पाहिजे,सत्ता येते जाते,परंतु सत्तेच्या धुरापुढे कुणालाच काही दिसत नाही,आज तो धुरही नाहीसा झाला व सत्तेच्या महापुरात हात धुण्यासाठी आलेले हौसे नौशे गौशे कुठल्या कुठे पळून गेले आहेत,चार अक्षराची बाळासाहेबांची शिवसेना सुद्धा पळवली, नाव, पक्षचिन्ह, व फंदफितुरीने बाळासाहेबांचा कार्यकर्ता सुद्धा पळवला,असे असूनही ज्वलंत विचारांचा कडवट शिवसैनिक जाग्यावरच आहे,
बाळासाहेबांच्या विचारांची खरी शिवसेना आज मातोश्री बरोबर आहे,स्वच्छ व चकचकीत !!बाळासाहेब नेहमी म्हणायचे.. नेता म्हणून मोठं व्हायचं असेल तर कार्यकर्ते जपायला शिका. स्वयंघोषित नेते होण्यापेक्षा कार्यकर्त्यांनी तुमचं नेतृत्व मान्य केलं पाहिजे. स्वतःभोवताली पुढे-मागे करणाऱ्या दोन-चार जणांना पदे द्यायची आणि स्वतःच्या नावापुढे नेता लावून मिरवायचे या क्षणिक आनंदापेक्षा सामान्य शिवसैनिकांना प्रेम द्या, मान-सन्मान द्या. तुमचं नेतृत्व सहजतेने आपोआप मोठं होईल. माझ्या शिवसैनिकांना जपाल तर भविष्यात कधीही, कोणत्याही निवडणुका लढल्यात तर इतर पक्षातील नेते व कार्यकर्त्यांशी तडजोड करण्याची वेळंच येणार नाही. शिवसैनिक कधीही संघटनेपासून दूर जात नाही. कदाचित तो वैयक्तिक कारणास्तव सक्रिय नसेलही.. पण निवडणूकांच्या रणधुमाळीत तो पक्षकार्यासाठी धावून येतो.गेल्या ५९वर्षात शिवसेनेने अनेक राजकीय धक्के बघितले आहेत,आले किती गेले किती शिवसेनेवर किंचितही परिणाम झाला नाही कारण विचार हा सर्वश्रेष्ठ असतो ! म्हणूनच ५९ वर्षानंतरही. बाळासाहेबांच्या विचारातून घडलेला कडवट शिवसैनिक आजच्या फुटीरवादी काळात पक्षाला उभारी देऊ शकतो,पक्षाला भरारी देऊ शकतो !जय महाराष्ट्र..!
नारायण पांचाळ


0 टिप्पण्या