प्रयास एक कोशिश आणि घरेलू कामगार विकास वसतिस्तर संघा मार्फत आज 22 जुन रोजी अंधेरी पश्चिम् येथे अंतर्ष्ट्रीय घरेलू कामगार दिवस साजरा करण्यात आला. ज्यात साधारण अंधेरी, जोगेश्वरी, आजी गोरेगाव येथील 200 घरकामगार महिलांचा सहभाग राहिला..प्रमुख् अतिथी म्हणून नारी अत्याचार विरोधी मंचाच्या सुजाता गोठसकर, महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समितेचे ज्ञानेश पाटील, समाजिक कार्यकर्त्या संजीवनी नांगरे व साधना म्हसके तसेच घरेलू कामगार विकास वसतिस्तर संघाचे सल्लागार advocate दर्शन इंगळे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे वैशिष्ट म्हणजे घरेलू कामगार महिलांनी स्वत रचेलेल्या त्यांच्या जीवनातील कष्टाच्या गीतांचे पुस्तक - हम गाते है याचे प्रकाशन करण्यात आले.
संस्कृतिक व लोकागिताचे मंच - गणी समतेची याचे साथी अनुराधा, सुशांत, मयूर, आणी प्रवीण यांनी आपल्या सुंदर आवाजात विविध जागृती गीतांची प्रस्तुतु केली. महिलांनी आपल्या जागृती नाटकातून. गीतांतून आणी नृत्याचा माध्यमातून संविधान आणी मूल्य यावर देखील जागरूकता केली.घरेलू कामगारांचे साहित्य निर्माण व्हावे आणी जास्ती जास्त घरलेवू कामगारांना बदल विविध अंगाने लिहिले जावे, त्यांचा कष्टाची माहिती आणी त्यांचा हक्कांची जागरूकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा महत्वाचा उद्देश होता.
0 टिप्पण्या