Top Post Ad

नोकरी जे.एन.पी.टी.ची... जाहीरात इंग्रजी पेपरात... मुलाखती गुजरातला...

उरण तालुक्यातील जेएनपीटी पोर्ट मधील न्हावाशेवा फ्रीपोर्ट  टर्मिनल (NSFT) जे एम बक्षी & सी एम ए टर्मिनल्स या पोर्टने इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. ती जाहिरात रद्द करून यापुढे स्थानिक वुत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करुन पोर्ट मध्ये होणाऱ्या नोकर भरती प्रक्रियेत मराठी तरुणांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचे आश्वासन जेएनपीए बंदराचे चेअरमन उन्मेष वाघ यांनी दिले आहे.त्यामुळे हा विजय हा मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या विचारांचा विजय असणार आहे.असे प्रतिपादन मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी व्यक्त केले.

   जेएनपीटी पोर्ट मधील न्हावाशेवा फ्रीपोर्ट  टर्मिनल (NSFT) जे एम बक्षी & सी एम ए टर्मिनल्स या पोर्टने दहा दिवसापूर्वी इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करून मुलाखती( इंटरव्यू ) ह्या गुजरात राज्यातील मुद्रा या ठिकाणी घेऊन संबंधित व्यवस्थापनाने कामाचा पत्ता हा  जेएनपीटी उरण नवी मुंबई म्हणून प्रसिद्ध केले होते.एकंदरीत व्यवसाय महाराष्ट्र मध्ये करायचा,आणि नोकर भरती मुलाखती या गुजरात राज्यात घ्यायच्या यासंदर्भात कोणीच आवाज उठवित नसल्याने स्थानिकांच्या अस्तित्वासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर व उरण तालुका अध्यक्ष अँड सत्यवान भगत यांनी आवाज उठविण्याचा निर्णय घेतला असता या नोकर भरती प्रक्रियेची दखल मनसेचे नेते राज ठाकरे यांनी घेऊन प्रसारमाध्यमांतून आवाज उठविला.यांची दखल जेएनपीए बंदराचे चेअरमन उन्मेष वाघ यांनी घेऊन शुक्रवारी( दि २७) बंदर प्रशासनाच्या दालनात बैठकीचे आयोजन केले होते.या बैठकीत मनसेचे नेते अविनाश जाधव, मनसेचे सरचिटणीस संजय नाईक, मनसेचे सरचिटणीस संदिप दळवी यांनी मराठी माणसावर पोर्ट टर्मिनल कशा प्रकारे अन्याय करत आहे.ही बाब बंदराचे चेअरमन उन्मेष वाघ यांच्या निदर्शनास आणून दिली.

  यावेळी जेएनपीटी पोर्ट मधील न्हावाशेवा फ्रीपोर्ट  टर्मिनल (NSFT) जे एम बक्षी & सी एम ए टर्मिनल्स या पोर्टने इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये नोकर भरतीची जी जाहिरात प्रसिद्ध केली होती ती जाहिरात रद्द करून यापुढे स्थानिक वुत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करुन पोर्ट मध्ये होणाऱ्या नोकर भरती प्रक्रियेत स्थानिक भूमिपुत्र व मराठी तरुणांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचे आश्वासन जेएनपीए बंदराचे चेअरमन उन्मेष वाघ यांनी मनसेच्या शिष्टमंडळाना दिले.यावेळी मनसेचे नेते अविनाश जाधव, मनसेचे सरचिटणीस संजय नाईक, मनसेचे सरचिटणीस संदिप दळवी यांनी मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या वतीने बंदराचे चेअरमन उन्मेष वाघ यांचे आभार व्यक्त केले.तसेच मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी मनसे यापुढे ही आवाज उठविणार असल्याचे सांगितले.

    याप्रसंगी जे एम बक्षी & सी एम ए टर्मिनल्स या पोर्टचे व्यवस्थापन अधिकारी अनिरुद्ध लेले,बीएमसीटी पोर्ट चे व्यवसायिक अधिकारी मनोज गावंड, जेएनपीए बंदराच्या अधिकारी मनिषा जाधव, जेएनपीए बंदराचे ट्रस्टी दिनेश पाटील, जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, तालुका अध्यक्ष अँड सत्यवान भगत, महिला जिल्हाध्यक्षा आदिती सोनार, प्रविण दळवी, मनसे प्रवक्ते योगेश चिले, उपजिल्हा अध्यक्ष दिपक कांबळे,सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल नेहूल  आणि न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे निरीक्षक बापू तुळशीराम ओवे, तालुका सचिव अल्पेश कडू, राकेश भोईर, द्रोणागिरी शहराध्यक्ष रितेश पाटील, कविता म्हात्रे महिला तालुकाध्यक्ष, उरण शहर महिला अध्यक्ष सुप्रिया सरफरे, उपतालुका अध्यक्ष दीपक पाटील, विभागीय अध्यक्ष बबन ठाकूर, जनहित पक्षाच्या मालती म्हात्रे, शेवा शाखाध्यक्ष भालचंद्र म्हात्रे आदिंसह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.मनसे मुळे मराठी तरुणांना यामुळे न्याय मिळणार असल्याने तमाम जनतेने मनसेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com