सहा महिन्यापुर्वी अदानी समूहानं विमान सेवेत प्रवेश केला आहे. 'एअर वर्क्स' नांवाची विमान देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल कंपनी विकत घेऊन त्यांनी ही सुरूवात केली. नॅरो-बॉडी आणि टर्बोप्रॉप विमानांची देखभाल, दुरूस्ती सेवा करणारी ही भारतातली सर्वात मोठी कंपनी आहे... भारतातल्या हेलिकॉप्टर वगैरेंचीसुद्धा देखभाल करण्याचं काम या कंपनीकडे आहे. बोइंग ७३७ फॅमिलीच्या विमानांनासुद्धा ही कंपनी सेवा देते… पण परवा अपघात झालेले बोइंग ७८७ ड्रीमलाइनर, जे एक विशालकाय विमान आहे, तशा विमानांच्या देखभालीची कामं करण्याचं कंत्राट अजून अदानी समुहाच्या या कंपनीला मिळालेलं नाही. तिथं तगडी स्पर्धा आहे.
अहमदाबादला अपघात झालेल्या बोइंग ७८७ ड्रीमलाइनरसारख्या बड्या आणी आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या विमानांची देखभाल सेवा देण्याचं मोठं कंत्राट 'एअर इंडिया इंजिनियरिंग सर्व्हिसेस लिमिटेड' या कंपनीकडं पुर्वीपासून आहे.
ही सेवा देऊन आपला व्यवसाय आणि कार्यक्षेत्र विस्तारण्यासाठी जीएमआर एरोटेक्निकसारखी कंपनी अदानी समुहाच्या स्पर्धेत आहे. तसेच या क्षेत्रात इंडिगो, टाटा ग्रुप हे ही कार्यरत आहेत. हल्ली विमानाचा अपघात कसा झाला यावर खुप लोक बोलताहेत. विमानातील तांत्रिक बिघाडामुळं हा अपघात झाला असं आजवरच्या बातम्यांमधून समोर येतंय. पण मग या विमानांचा मेन्टेनन्स कोण करतं? ती जबाबदारी कुणाची असते?? त्यांच्याकडून काय कमी राहिली??? याबाबतीत संबंधित कंपन्यांना का जाब विचारला जात नाही??? याबद्दल काहीच समोर येत नाही. म्हणून थोडं खोलात जाऊन 'सत्यशोधन' केलं. मला जमेल तेवढं.आपली निष्पाप माणसं दिवसेंदिवस हकनाक मारली जाताहेत म्हणून आपण सगळेच अस्वस्थ आहोत. मुद्याचं कुणीच बोलत नाही म्हणून आपली घुसमट वाढत चाललीय. 'पायलट शेवटच्या क्षणी काय बोलला?', 'शेवटचा सेल्फी कुणी कसा काढला?' हे सगळं ठीक आहे. पण आपण यापुढं कधी जाणार? मी चुकीचा असेन तर कुणी आणखी तज्ञ आणि ज्ञानी माणसानं यावर आणखी सखोलपणे प्रकाशझोत टाकल्यास ही अपघाताच्या मुळाशी जाण्यापासून दूर चाललेली चर्चा योग्य त्या पाॅवरनं 'टेकऑफ' घेईल अशी आशा आहे !
0 टिप्पण्या