माननीय पंतप्रधानांनी 8 एप्रिल 2015 रोजी प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) सुरू केली. ही योजना उत्पादन, सेवा आणि कृषीशी संबंधित उपक्रमांमध्ये कार्यरत असलेल्या पिरॅमिडच्या तळाशी असलेल्या सूक्ष्म आणि लघु व्यवसाय घटकांसाठी एकात्मिक आर्थिक सहाय्य पुरवणारी आहे. सूक्ष्म उद्योजकांना सहज आणि विनातारण कर्ज उपलब्ध करून देणे ही PMMY योजनेची संकल्पना होती. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या गैर-कॉर्पोरेट, गैर-कृषी लघु व्यवसायांना आर्थिक सहाय्य पुरवणे. मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी (MUDRA) अंतर्गत, बँकांमार्फत सुरुवातीला ₹10 लाखांपर्यंतचे कर्ज खालीलप्रमाणे तीन श्रेणीत दिले जात होते:
प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) कर्ज श्रेणी कर्ज रक्कम- 1 शिशु ₹50,000 पर्यंत
- 2 किशोर ₹50,001 ते ₹5,00,000
- 3 तरुण ₹5,00,001 ते ₹10,00,000
2024 च्या अर्थसंकल्पीय भाषणात मा. अर्थमंत्र्यांनी घोषित केल्यानुसार, नवोदित उद्योजकांना आर्थिक पाठबळ अधिक बळकट करण्यासाठी अर्थ मंत्रालय, भारत सरकार यांनी “तरुण प्लस” नावाची नवीन PMMY कर्ज श्रेणी सादर केली आहे. या श्रेणीअंतर्गत ₹20,00,000 पर्यंतचे कर्ज दिले जाते. “तरुण प्लस” कर्ज त्याच उद्योजकांसाठी आहे ज्यांनी पूर्वी “तरुण” श्रेणीतून कर्ज घेतले आहे व यशस्वीरित्या परतफेड केली आहे.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे फायदे: - PMMY योजना सुरू होण्यापूर्वी सूक्ष्म व लघु व्यवसायांना औपचारिक आर्थिक संस्थांकडून कर्ज मिळवण्यात अडचणी येत असत. त्यामुळे बहुतेक सूक्ष्म आणि लघु व्यवसायांना त्यांच्या गरजांसाठी उच्च व्याजदराने अनौपचारिक स्रोतांवर अवलंबून राहावे लागत असे. 2015 मध्ये योजना सुरू झाल्यापासून, PMMY योजनेमुळे सूक्ष्म उद्योजकांसाठी औपचारिक कर्ज प्रणालीत उत्क्रांती झाली आहे. ही योजना सरकारच्या आर्थिक समावेशन व तरुण उद्योजक सशक्तीकरणाच्या वचनबद्धतेचे प्रतीक बनली आहे. गेल्या दशकात, या प्रमुख योजनेने उद्योजकता वाढवणे, रोजगार निर्माण करणे आणि बँकिंग सुविधांपासून. वंचित लोकांना सक्षम करणे यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या योजनेच्या माध्यमातून “FUND THE UNFUNDED” हा उद्देश पूर्ण करण्यात आलेला आहे. या योजनेमुळे देशभरातील सूक्ष्म उद्योजकांसाठी संधींचे असंख्य द्वार खुले झाले आहेत. सुमारे ₹33 लाख कोटींची कर्जे 52 कोटी लाभार्थ्यांना बँका/आर्थिक संस्थांकडून मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी सुमारे 70% महिला उद्योजक आहेत आणि बहुतांश महिला पहिल्या पिढीतील उद्योजिका आहेत. विनातारण किंवा तृतीय पक्ष हमीशिवाय बँक कर्ज उपलब्ध झाल्याने लाभार्थ्यांच्या आर्थिक स्थितीत मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे.
युको बँकेने सुमारे ₹30,473 कोटींची PMMY कर्जे 24 लाख लाभार्थ्यांना वितरित केली आहेत. PMMY अंतर्गत मिळालेल्या आर्थिक सहाय्यामुळे लाभार्थ्यांचे जीवन बदलले असून, अनेक जण स्थायिक व्यावसायिक/उद्योगपती बनले आहेत. PMMY योजनेद्वारे सूक्ष्म उद्योजकांना सहाय्य करून युको बँकेची प्रतिमा एका सामाजिकदृष्ट्या जबाबदार संस्था म्हणून उंचावली आहे, जी आर्थिक सशक्तीकरण आणि राष्ट्रनिर्माणात योगदान देत आहे. या योजनेमुळे युको बँकेला विविध प्रकारे फायदा झाला आहे. अनेक लाभार्थ्यांनी योजनेअंतर्गत जास्त रक्कमेचे कर्ज घेतले असून, त्यामुळे बँकेला प्राधान्य क्षेत्र कर्ज उद्दिष्ट पूर्ण करण्यास मदत झाली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यान्नी बँकेच्या विविध किरकोळ योजनांचा लाभ घेतला आहे, त्यामुळे बँकेचा किरकोळ व्यवसायही वाढला आहे. रुची असलेल्या अर्जदारांनी युको बँकेच्या जवळच्या शाखेत संपर्क साधावा किंवा एसटीपी जर्नी (STP Journey) च्या माध्यमातून डिजिटल कर्जासाठी अर्ज करावा.
- अर्ज पुढील संकेतस्थळांवरून देखील करता येईल :
- �� www.udyamimitra.in �� www.jansamarth.in

0 टिप्पण्या