Top Post Ad

पार्किन्सन्स आजारावर डीप ब्रेन stimulations च्या साहाय्याने अनेक यशस्वीरीत्या उपचार

 चायना एक भन्नाट देश म्हणून पुढे येत आहे. 20 वर्षांपूर्वी हा देश लोकसंख्येने जगात पहिल्या क्रमांकावर होता. ह्या achivement बद्दल चायना मात्र खुश नव्हता,आज त्याने अथक प्रयत्न करून स्वतःला 2 क्रमांकावर आणले.(भारताने यात बाजी मारली आणि पहिला नंबर पटकाविला, "दस बच्चे पैदा करो" पॉलिसी नुसार लवकरच देश पातळ लोकं मधे आश्रय घ्यायला जाईल) काहीच दिवसांपूर्वी चायना ने "डीपसीक" लाँच करून अमेरिका ला जबर झटका दिला, (भारत त्या घडीला सार्वजनिक आंघोळ कार्यक्रमात व्यस्त होता ही बाब अलहिदा) चायना चा एक मेडिकल शास्त्रज्ञ आहे जिया फुमिन, गजहब माणूस आहे हा. म्हणजे "थांबणे" काय असते हे ह्याला माहितीच नाही. आता पर्यंत ह्या माणसाने पार्किन्सन्स आजारावर डीप ब्रेन stimulations च्या साहाय्याने अनेक यशस्वीरीत्या उपचार केले.

पण नुकताच त्याच्या नवीन संशोधनाने तर अमेरिकेची neuro technology क्षेत्रात असलेल्या मक्तेदारीला ला हादरवून सोडले,इतकेच काय तर Elon Musk च्या NEURALINK टेक्नॉलॉजी ला सुद्धा पाणी भरायला लावले. कारण आतापर्यंत असं मानल्या जायचे की एकदा तुम्हाला spinal cord injury झाली आणि तुम्ही paralysed होऊन जागेवर बसला तर तुम्ही कधीच जागेवरून उठू शकत नाही.पण हारेगा वो चीन कैसा मेरे दोस्त, जिया भाऊ आणि त्याच्या टीम ने लावला ना शोध.!! ह्युमन बॉडी प्रचंड चमत्कारिक आहे,त्याच सगळं कामं highly organised आहे. इतक, की ज्या मनुष्याला असं वाटतं की मी खुप्पच हुशार आणि organised आहे त्याने एकदा ह्युमन बॉडी मधे शिरून स्वतःच गर्वाच घर खाली उतरवून घ्यावे इतकं!!
तर झालं अस्स, कि आपलां ब्रेन हा शरीरातील इतर अवयव,मांसपेशी अगदी पायाची बोट सुद्धा, यांच्या सोबत spinal cord आणि त्याच्या nerves ने कनेक्टेड असतो. म्हणजे ब्रेन ला एखादे वेळी पायाची बोटं हलवायची इच्छा झाली की त्याचा हा मेसेज मेंदू च्या तळाशी अगदी शेपटी सारखा जोडून असलेला लांब spinal cord आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या असंख्य nerves जे पुढे शरीरातील इतर अवयव, मांसपेशी व इतरांना जोडून असतो. त्याच्या माध्यमातून ब्रेन चा मेसेज पायाच्या बोटांना पोहचवतो, मग ब्रेन जसे म्हणेल तस्स आपलं शरीर respond करते. म्हणजे spinal cord हा दोन दूरच्या नातेवाईकांना भेटवून देणारा दुवा असतो. पण जर हा दुवा एखाद्यावेळी तुटला किंवा त्यांच्यात बिघाड झाला की,आदमी उठता नहीं बल्की उठ ही जाता है!!
अश्या केसेस तुम्ही आम्ही बरेचदा ऐकल्या असतील,पण त्यावर इलाज नसल्याने अनेकांना आयुष्यभर बेडवर खिळून राहावं लागतं. अमेरिका neuro technology मधे जगाचा बाप आहे,पण त्यांच्या जवळ सुद्धा याविषयावर लिमिटेड उत्तर होत. पण डॉ जिया फुमीन ने सहा महिन्यांपूर्वी अनोखं काम केलं. त्यांनी एक अशी AI based neural chip शोधून काढली की त्यात spinal cord चे काही कामच नाही. त्याने डायरेक्ट ब्रेन टू muscles चे कनेक्शन लावून दिले. परिणाम असा झाला की, एक 35 वर्षाचा चिनी मुलगा जो अनेक वर्षांपासून spinal cord बिघाडामुळे बेड वर खिळून होता, त्याच्यावर जिया फूमिन ने केलेल्या नॉन invasive surgery मुळे त्याचे हातपाय 24 तासात हलायला लागले,आठवड्यात तो चालायला लागला, आणि 14 दिवसांत तो स्वतः अडथळा दूर करून चालायला लागला.त्याच्या मांसपेशी मधे हालचाल जाणवायला लागली,घाम यायला लागला.अगदी नॉर्मल मनुष्याप्रमाने!!!
ह्या नवीन संशोधनाला म्हणतात brain spinal interface surgery.!! 15-20 वर्षांपूर्वी चायना ने सर्वात जास्त खर्च शिक्षणावर केला, इंग्लिश ची कमतरता जाणवली तर प्रत्येक नागरिकांना इंग्लिश स्पीकिंग लर्निग कम्पल्सरी केलं,इतकेच काय तर त्यासाठी budgetory investment केले.research and development वर जोर दिला.सुविधा निर्माण करून दिल्या. देश प्रगती वर आणायचा असेल तर नागरिकांना योग्य सुविधा व नियम लावून द्यावे लागतील हे चायना ने दाखवून दिले. (आता काही महाभाग म्हणतील की चायना मधे हुकूमशाही आहे वगैरे, तर सध्या भारतात हुकूमशाही चं सुरू आहे फक्त नावालाच लोकशाही आहे!!) पूर्वी, चायना मधून मेडिकल शिक्षण घेतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांवर जोक्स मारले जायचे, आज भारतात मेडिकल शिक्षण घेतलेला मेडिकल स्टूडेंट मज्जाक वाटतो. महागडे मेडिकल शिक्षण व सरकार चे शिक्षणाबद्दल असलेल्या उदासीनतेमुळे शिक्षण व्यवस्थाच भारतात मज्जाक होत चालली आहे!!!
आश्चर्य तर याच आहे की, भारतात अजूनही लोकं मस्जिद खाली शिवलिंग शोधत आहेत,कुठे बाया नवऱ्याला शांत करण्यासाठी शिवलिंग वर बेलाचे पानं झोकून देत आहेत, कुठे लोकं आंघोळ करून पापं धुवत बसले आहेत,कुठे कावळ्याला जेवू घालत आहे ,तर कुठे गुरुवार शनिवार नॉन व्हेज खात नाही,तर कुठे आम्ही घरी नाही खात, पण बाहेर नॉनव्हेज खातो...च्यायला घर असून बाहेर नॉनव्हेज खायचं,मग घराचा उपयोग फक्त देवाच्या मंदिरा साठीच आहे का??
अंधश्रद्धा भारतात इतकी फोफावली आहे, की यांचा मेंदू,शरीर, घर सर्वच नासवून टाकले आहे. त्यामुळे इथे डॉ.जिया फ्युमिन सारखे शास्त्रज्ञ जन्म घेऊच शकत नाही.!! तर सांगण्याच तात्पर्य हे,की चायना आज 2050 मधे जगत आहे आणि भारत 1600 शतकात..!
डॉ.चेतना सवाई
(लिंक फॉर reference)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com