Top Post Ad

महानगरपालिकेचा अर्थसंकल्‍प बेस्ट सेवेला दिलासा देणारा

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वित्तीय वर्ष २०२५ - २६ चे अर्थसंकल्‍पीय अंदाज महानगरपालिका मुख्यालयातील सभागृहात आज (दिनांक ०४ फेब्रुवारी २०२५) सादर करण्यात आले. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी शिक्षण खात्याचे अर्थसंकल्‍पीय अंदाज 'ई'  हे महानगरपालिकेचे प्रशासक तथा शिक्षण समितीचे प्रशासक  भूषण गगराणी यांना सादर केले.तसेच, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी महानगरपालिकेचे अर्थसंकल्पीय अंदाज 'अ', 'ब' आणि 'ग' हे महानगरपालिकेचे प्रशासक. भूषण गगराणी यांना सादर केले.अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, महानगरपालिका सचिव श्रीमती रसिका देसाई यांच्यासह सर्व सहआयुक्त, उपआयुक्त, संचालक, सहायक आयुक्त तसेच संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते

या अर्थसंकल्पात मुंबईतील बेस्ट सेवेकरीता विशेष  1000 कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे  महसूल वाढीसाठी विविध विभागांच्या आकारल्या जाणाऱ्या आकार आणि शुल्कांचे पुनरावलोकन आणि विविध सुधारणा करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. यामुळे येत्या वर्षात मुंबईकरांवर कराचा बोजा वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थसंकल्पात मुंबईच्या झोपडपट्टीतील व्यवसायिक आस्थापनांवर कर लावण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. तसेच पालिकेच्या राखीव निधीमधून 16 हजार 699.78 कोटी इतका निधी काढला जाणार असल्याचे म्हटले आहे. मुंबई महापालिकेचा 2025-26 या आर्थिक वर्षाचा 74 हजार 427.41 कोटी रुपयांचा असून 60.65 कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 65 हजार 180.79 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. मागील वर्षापेक्षा यंदा 14.19 टक्क्याने अर्थसंकल्पात वाढ झाली आहे. शिक्षण विभागाचा 2025 - 26 वर्षासाठी 3955.64 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे.  निवडणुकीच्या तोंडावर थेट करवाढ करण्यात आलेली नाही मात्र, उत्पन्न वाढीसाठी आगामी काळात नवे कर लागु करण्याचे संकेत अर्थसंकल्पात देण्यात आले आहेत. झोपडपट्टीमधील व्यावसायिक आस्थापनांना  सर्वेक्षणानंतर कर लागु केला जाणार आहेत. सोबतच आगामी काळात मुंबईकरांना कच-यावरही टॅक्स द्यावा लागणार आहे. 

सन २०१२-१३ पासून जानेवारी २०२५ पर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेने बेस्ट उपक्रमास एकूण १११३०४.५९ कोटी इतक्या रकमेचे अर्थसहाय्य केले आहे. सध्याचे हाती घेतलेले प्रकल्प आणि इतर महत्वाच्या उद्दिष्टांकरिता सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये १००० कोटी इतकी तरतूद अनुदान म्हणून प्रस्ताविण्यात आली आहे. सदर रक्कम बेस्ट उपक्रमास पायाभूत सुविधांचा विकास आणि भांडवली उपकरणांची खरेदी, कर्जाची परतफेड, भाडेतत्वावरील (Wet Lease) नवीन बसेस, वेतन करारान्वये येणारे आर्थिक दायित्व, दैनंदिन खर्च, ITMS प्रकल्प, कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान, निवृत्त कर्मचाऱ्यांचे उपदान व इतर विविध देणी, विद्युत देणी, इत्यादीसाठी अनुदानित करण्यात आली आहे. 
तसेच राज्य शासनाच्या निर्देशांनुसार मुंबई शहरासाठी बेस्ट उपक्रमाच्या २,००० इलेक्ट्रीक बसगाड्यांचे प्रवर्तन करण्यासाठीच्या प्रकल्पाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेचा ५% हिस्सा म्हणजेच ११२८.६५ कोटी या खर्चापोटी प्रदान करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, विद्युत बसगाड्या खरेदी करण्याकरिता १५ व्या वित्त आयोगाकडून १९९२ कोटी इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. त्यापैकी, प्राप्त झालेली १४९३.३८ कोटी इतकी रक्कम बेस्ट उपक्रमास अधिदानीत करण्यात आली आहे व उर्वरीत ₹४९८.६२ कोटी इतकी रक्कम १५ व्या वित्त आयोगाकडून प्राप्त झाल्यानंतर बेस्ट उपक्रमास उपलब्ध करुन देण्यात येईल.  अर्थसंकल्पाबाबत नागरिकांच्या हरकती मागवण्यात आल्या होत्या. या हरकतीमध्ये सर्वाधिक तक्रारी, सुचना बेस्टबाबत होत्या. याचा गांभिर्याने विचार करून बेस्टच्या सुविधांसाठी महापालिकेने अधिकाधिक आर्थिक तरतूद करण्याचा प्रयत्न केला असल्याचे आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. 

यंदाच्या अर्थसंकल्पात तब्बल 14.19 टक्के इतकी रेकॉर्डब्रेक वाढ झाली आहे. इतिहासातील सर्वात मोठा अर्थसंकल्प माला जात आहे.  निवडणूकीच्या तोंडावर सादर करण्यात आलेले मुंबई महापालिकेचे चे बजेट 74,427  हजार कोटींवर पोहचले आहे. पर्यावरण खात्याकरता 113 कोटींची तरतूद,  मुंबई महापालिका आरोग्य खात्याचे बजेट 7379 कोटी बजेटच्या दहा टक्के तरतूद आरोग्य खात्यासाठी करण्यात आली.  मुंबई महापालिका शिक्षण खात्याचा यंदाच्या वर्षीच बजेट  3955 कोटींची तरतूद, सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी  5545 कोटी व मल निसारण प्रचालन साठी 2477 कोटी यांचा समावेश असलेली एकूण  13457 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे

 मुंबई महापालिकेच्या एफडींमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 854 कोटींची वाढ झाली आहे. मात्र, यंदाच्या वर्षी पुन्हा एकदा  विकासकामांसाठी एफडी महापालिकेच्या खर्चात वळत्या केल्या जाणार आहेत. यासाठी 16 हजार कोटींच्या एफडी तोडल्या जाणार आहेत.   2026 च्या पावसाळ्यापूर्वी मुंबईकरांना उत्तम रस्ते मिळणार आहेत.2026 च्या पावसाळ्यापूर्वी मुंबई महापालिकेच्या रस्ते काँक्रीटकरणाचे काम शंभर टक्के पूर्ण करणार.  यंदाच्या वर्षी मे महिन्याअखेरपर्यंतच रस्ते खोदण्यास परवानगी दिली जाणार. 
धारावी प्राधिकरणाचा स्वतंत्र कारभार सुरु झाल्यानं त्यांच्या प्रिमियम एफएसआयचा वाटा मुंबई महापालिकेला मिळणार आहे. मुंबई महापालिकेला आता एफएसआयचा 25 टक्क्यांऐवजी 50 टक्के हिस्सा मिळणार. हा हिस्सा 75 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची महापालिकेची शासनाकडे विनंती आहे.  कोस्टल रोडचा विस्तार दहिसर आणि भाईंदर पर्यंतचा विस्तार वर्सोवा ते दहिसर ते भाईंदर पर्यंतच्या कोस्टल रोड प्रकल्प करिता 4300 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे.  गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाकरिता  1958 कोटी इतकी तरतूद करण्यात आली.   
पालिकेच्या 2025-26 च्या अर्थसंकल्पात जकात कराच्या बदल्यात शासनाकडून 14 हजार 398.16 कोटी, विकास नियोजन विभागाकडून 9700 कोटी उत्पन्न, मालमत्ता करामधून 5200 कोटी रुपये उत्पन्न, जल आणि मलनिस्सारण आकारतून 2363.15 कोटी, गुंतवणुकीवरील व्याजातून 2283.89 कोटी, अग्निशमन दलाच्या 759.18 कोटी, अनुज्ञापन विभागाकडून 362 कोटी तर राज्य शासनाकडून येणाऱ्या थकबाकीमधुन 6581.14 कोटी उत्पन्न अपेक्षित धरण्यात आला आहे.  2025-26 च्या अर्थसंकल्पात महसुली खर्च 31 हजार 204.53 कोटी तर भांडवली खर्च म्हणून 43 हजार 162 कोटी अंदाज प्रस्ताविण्यात आला आहे. 2017-18 मध्ये पालिकेचा भांडवली खर्चात 75 टक्क्यांहून 42 टक्के इतकी घट झाली होती. गेल्या काही वर्षात भांडवली खर्च 25 टक्क्यांहून 58 टक्के पर्यंत पोहचला आहे. पायाभूत सुविधांचा विकास आणि आधुनिकीकरणाच्या दिशेने पालिकेने गाठलेला हा उल्लेखनीय टप्पा आहे. 

 सध्या मुंबई महापालिकेच्या विविध बँकांमध्ये 81 हजार 774.42 इतक्या ठेवी आहेत. पालिकेच्या बँकांमधील ठेवीमधून 2023 - 24 आर्थिक वर्षात 6364.48 कोटी इतका निधी काढण्यात आला होता. 2024-25 पर्यंत 12 हजार 119.47 कोटी इतका निधी काढण्यात आला. 2025 -26 मध्ये 16 हजार 699.78 कोटी इतका निधी काढला जाणार असल्याचे अर्थसंकल्पात म्हटले आहे. मुंबईमधील 2 लाख 50 हजार पैकी 50 हजार झोपडपट्टीमध्ये उद्योगधंदे सुरू आहेत. त्यांच्यावर मालमत्ता कर लावून झोपडपट्टीधारकांना सोयी सुविधा दिल्या जाणार आहेत. झोपडपट्ट्यांमधील व्यावसायिक मालमत्तांवर करामधुन 350 कोटी महसूल अपेक्षित धरण्यात आला आहे. मुंबईमध्ये घनकचरा व्यवस्थापन खर्च वाढला आहे. नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी तसेच स्वच्छ आणि निरोगी मुंबईसाठी घन कचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क लागू करण्याचा विचार पालिकेचा आहे.  

  • महसूल वाढीसाठी उपाययोजना - 
  • 1 अतिरिक्त चटईक्षेत्रापोटी अधिमुल्य - 300 कोटी
  • 2 रिक्त भूभाग भडेपट्टा - 2000 कोटी 4 वर्षात प्राप्त होणार
  • 3 अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा शुल्क - 759.18 कोटी
  • 4 वाहतूक आणि व्यवसायिक केंद्र उभारणार
  • 5 झोपडपट्ट्यांमधील व्यवसायिक मालमत्तांवर कर - 350 कोटी

  • अर्थसंकल्पातील विभागवार महत्वाच्या तरतुदी -
  • रस्ते आणि वाहतुकीसाठी 16434.04 कोटी
  • मुंबई किनारी रस्त्या दक्षिणसाठी 1507.24 कोटी
  • मुंबई किनारी रस्त्या उत्तरसाठी 4300 कोटी
  • गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 1958.73 कोटी
  • घनकचरा व्यवस्थापन आणि परिवहन 6064.98 कोटी
  • आरोग्य विभागासाठी 7380.44 कोटी
  • पर्जन्य जलवाहिन्यांसाठी 3039.25 कोटी
  • प्राथमिक शिक्षणासाठी 3955.64 कोटी
  • बेस्ट उपक्रमाला अनुदान 1000 कोटी

  • इतर तरतुदी - 
  • शिक्षण विभाग : ३२४१ कोटी रुपये
  • घनकचरा व्यवस्थापन विभाग : ५५४८ कोटी रुपये
  • पर्जन्य जलवाहिनी विभाग : ३०३९ कोटी रुपये
  • कोस्टल रोड प्रकल्प : १५४५ कोटी रुपये
  • रस्ते आणि वाहतूक विभाग : ६५१९ कोटी रुपये
  • पूल विभाग : ८३६९ कोटी रुपये
  • आरोग्य विभाग : १९५८ कोटी रुपये
  • प्रमुख रुग्णालये : २४५५ कोटी रुपये
  • वैद्यकीय महाविद्यालये : ५७९ कोटी रुपये
  • विशेष रुग्णालये : ३०६ कोटी रुपये
  • जल अभियंता विभाग : ४३७२ कोटी रुपये
  • पाणी पुरवठा प्रकल्प खाते : ४०५६ कोटी रुपये
  • मलनि:सारण प्रचालन विभाग : १९७२ कोटी रुपये
  • मलनि:सारण प्रकल्प खाते : ४३९ कोटी रुपये
  • मलनि:सारण प्रकल्प कामे : ६५३२ कोटी रुपये
  • नगर अभियंता विभाग : ३३९५ कोटी रुपये
  • विकास नियोजन विभाग : १८३१ कोटी रुपये
  • उद्यान आणि प्राणिसंग्रहालय : ७३१ कोटी रुपये
  • कोळीवाड्यांच्या विकासासाठी २५ कोटी रुपयांची ठोक तरतूद


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com