भारतीय संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष सुरु होत असतानाच संविधानावर घाला घातला गेला आणि या दरम्यान मोठे आंदोलन होत असताना पोलिसांनी बळाचा वापर करून ते आंदोलन थोपवण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन करत आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी विद्यार्थ्यांला मारहाण झाली व वैद्यकीय उपचारादरम्यान दिनांक 15 डिसेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. सलग तीन दिवस परभणीतील वातावरण संवेदनशील बनलं होतं. अनेक कार्यकर्त्यांवर जाणिवपूर्वक गुन्हे नोंदवले गेले. त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली. या सर्व प्रकारणाची अद्याप सखोल चौकशी न करता शासन चालढकल करत असल्याच्या निषेधार्थ आज परभणी ते मुंबई असा लाँगमार्च काढण्यात आला आहे.
भारतीय संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष सुरु होत असतानाच संविधानावर अशा पद्धतीचा घाला घातला गेला आणि या दरम्यान मोठे आंदोलन दोन दिवस होत असताना पोलिसांनी बळाचा वापर करून ते आंदोलन थोपवण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन करत ते आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या वकील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांला मारहाण झाली व वैद्यकीय उपचारादरम्यान दिनांक 15 डिसेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला व पुन्हा आंदोलन झाले. सलग तीन दिवस परभणीतील वातावरण संवेदनशील बनलं होतं. अनेक कार्यकर्त्यांवर जाणिवपूर्वक गुन्हे नोंदवले गेले. त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली.
शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करत असताना अडचणी ही निर्माण झाल्या होत्या, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये तसेच संसदेतही याबाबत विविध पातळीवर चर्चा झाली. नेहमी प्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणीत पोलिसांनी कोंबींग ऑपरेशन केलेच नाही. शहीद सोमनाथ सुर्यवंशी याचा मृत्यू पोलीस कस्टडीत झाला नसून त्यास श्वसनाचा त्रास होता.. त्याच्या अंगावर आधीच जखमा होत्या.. वगैरे वगैरे अशा प्रकारे विधानसभा सभागृहात अत्यंत खोटे आणि विसंगत स्टेटमेंट दिले. त्यांनी एक प्रकारचे पोलिसांना क्लिन चिटच दिली आहे. आता चौकशी जरी झाली तरी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याच्या आधारेच केल्या जाईल यात तिळमात्र शंका नाही. परंतु आंबेडकरी समाजाने असे कितीक अत्याचार सहन करावेत ? आणि पूढील अत्याचाराच्या घटनांची वाट पाहत त्यालाही सामोरे जायचे ?
संविधान प्रतिकृती शिल्प विटंबना प्रकरणातील आरोपी दत्तराव पवार यास मनोरुग्ण माथेफिरू असे खोटे सर्टिफिकेट देणाऱ्या सर्व वैद्यकीय अधीक्षकांची, अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी. संविधान प्रतिकृती शिल्प विटंबना या गुन्ह्यात वरिष्ठ विशेष सरकारी वकील यांची तात्काळ नियुक्ती करून खटला जलदगती न्यायालयात घेऊन दोन महिन्याच्या आत निकाली काढावा. याबाबतचे आदेश संबंधित विभागांना करण्यात यावे. अंतरावली सराटी येथे झालेल्या आंदोलनादरम्यान मराठा समाजातील समाज बांधवांवर दाखल झालेले गुन्हे सरकारने शासन निर्णय काढून मागे घेतले त्याप्रमाणे परभणी येथील संविधान प्रेमी देशभक्तांवर दाखल झालेले 10 दखलपात्र गुन्हे शासनाने शासन निर्णय काढून तात्काळ मागे घेण्यात यावेत. परभणी पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झालेले आहेत. यामध्ये संविधानप्रेमी नागरिकांना जाणून-बुजून टार्गेट करणाऱ्या पोलिसांना शासकीय नोकरीतून बडतर्फ करण्यात यावे. शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावर अमानुष अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर तात्काळ गुन्हा दाखल करून दोषी पोलीस अधिकाऱ्यांना शासकीय नोकरीतून कायमचे बडतर्फ करावे. तसेच हा गुन्हा दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील बडतर्फ करावे. परभणी प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस यांनी अशोक घोरवांड यांना फक्त निलंबीत न करता त्यांचेसह ईतर पोलीस अधिकारी यांचेवर गुन्हा दाखल करावा. शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांवरती अंत्यविधी परभणी येथे करू नये याकरिता परभणी येथील उच्च पदस्थ अधिकारी यांनी दबाव टाकला होता का? दवाव टाकला असेल तर का टाकला होता? हे सर्व अधिकारी कोणाच्या सांगण्यावरून करत होते. याची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत. पोलीसांनी कोणाच्या आदेशावरून लाठीहल्ला केला, कोणाच्या सांगण्यावरून अमानुष अत्याचार केला. याची चौकशी करण्यात यावी. पोलीस निरीक्षक घोडबांड यांना चौकशी सुरू असेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक घोडबांड यांना शासकीय नोकरीतून बडतर्फ करावे व घोडबांड हे ज्या ज्या ठिकाणी शासकीय नोकरीमध्ये होते ते त्यांनी अशा प्रकारे दलित हत्याकांड दाबली आहेत का? निरापराध लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत का? याचे देखील चौकशी करून कारवाई करण्यात यावी. या मागण्यांसाठी आज आंबेडकरी जनतेने लाँगमार्च काढला आहे.
0 टिप्पण्या