भारतीय जनता पार्टीचे महाअधिवेशन अहिल्यानगर जिल्ह्यात शिर्डी या पवित्र ठिकाणी पार पडले. महाअधिवेशनसाठी भा ज पा चे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा उपस्थित होते. प्रदेश कार्यकारिणीची बैठक झाली आणि अधिवेशनाला सकाळी 11 वाजता सुरुवात झाली त्यात भाजपा नेते मधू चव्हाण यांनी सुरुवातीला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ च्या जयंतीनिमित्त आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनानिमित्त आपले विचारपुष्प वाहिले. त्यानंतर मुंबई भाजपा चे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार, माझी केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचे धोरण आणि भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रनिर्माणाचा विचार या विषयी आपले विचार मांडले. भाजपा चे राष्ट्रीय नेते तथा भूपृष्ठ मंत्री नितीनजी गडकरी यांचे सत्ता ही समाजाच्या म्हणजेच राष्ट्र उभारणी करण्यासाठी उपयोगात आणली पाहिजे आणि 2014 पासून हे सरकार सातत्याने समाजातील शेवटच्या पंक्तीत थांबलेल्या दरिद्री नारायणाचा विकास करण्यासाठी सक्रिय आहे असा विचार मांडत असताना जगातील सर्वात लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात हे सरकार लोकोपयोगी कार्य करत आहे असे त्यांनी सांगितले.
भाजपचे कार्याध्यक्ष आणि माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी महाराष्ट्र भाजपा नि विधानसभा निवडणुकीत केलेली ऐतिहासिक कामगिरी बद्दल चंद्रशेखर बावनकुळे आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली हे दैदिप्यमान यश मिळाले याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्राचे मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्ला चढविला. त्यानी महाराष्ट्राला सुझलाम सुफलाम बनविण्यासाठी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील शेतकऱ्यांना नदीजोड प्रकल्पाद्वारे पाणीदार करून आपण त्यांच्या जीवनात चांगले दिवस आणले पाहिजेत असं ते म्हणाले. पुढे ते बोलताना कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले की 1978 च्या नंतर पहिल्यांदा च एवढं मोठे यश 132 आमदार निवडून देऊन एक इतिहास निर्माण केल्याबद्दल उपस्थित सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचे अंतकरणापासून आभार मानले.
महाधिवेशनाचा समारोप गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यशाबद्दल उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करून त्यांनी भारताला बलशाली बनविण्यासाठी महाराष्ट्र बलशाली बनवला पाहिजे. कारण भारताचे विकासाचे इंजिन हे महाराष्ट आहे त्यामुळे महाराष्ट्र अत्येंत महत्वाचे आहे त्या साठी येणाऱ्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदा, पंचायत समित्या आपल्या भारतीय जनता पार्टीचे सरकार स्थानीक स्वराज्य संस्थेत आले पाहिजे यावर शाह यांनी भर दिला. या महाधिवेशनसाठी भाजपाचे नेते अरविंदपाटील निलंगेकर,प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामचंद्र तिरुके, भाजपा अजा मोर्च्यांचे प्रदेश सरचिटणीस प्रा पंडित सूर्यवंशी, भाजपा चे उदगीर तालुका सरचिटनीस रमेश शेरीकर भाजपा लातूर जिल्हासरचिटणीस सुधाकर बिरादार या महाधिवेशनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय जनता पक्षाच्या सरचिटणीस ऍड माधवीताई नाईक यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ सुजय विखे पाटील यांनी उपस्थिथांचे आभार मानले. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीतांनी झाली तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली
0 टिप्पण्या