Top Post Ad

अखेर ठाण्यातील त्या पत्रकार?चे बोगस फेरीवाला प्रमाणपत्र रद्द

ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष पत्रकार  संजय चंद्रकांत पितळे यांना ठाणे महानगरपालिकेने   दिलेल्या फेरीवाला नोंदणी प्रमाणपत्राबाबत सामाजिक कार्यकर्ते सुभाष दिगंबर ठोंबरे यांनी आक्षेप घेतला. त्याअनुषंगाने सदर प्रकरणी तत्कालिन सहाय्यक आयुक्त, नौपाडा-कोपरी प्रभाग समिती यांनी सादर केलेला अहवाल दि०८/०३/२०२३ रोजी झालेल्या ठाणे महानगरपालिका शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत निर्णयासाठी ठेवण्यात आले होते . याबाबत सखोल चौकशी होऊन अखेर पितळे याने ठाणे महानगरपालिकेकडे खोटी माहिती देऊन ठामपाची फसवणूक करून मिळविलेले फेरीवाला प्रमाणपत्र सुभाष ठोंबरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून रद्द करण्यात आले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सुभाष ठोंबरे यांनी प्रजासत्ताक जनताला कळवली आहे. तसेच फेरीवाला म्हणून मिळवलेल्या सोयी-सुविधांबाबतही लवकरच चौकशी करून त्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येईल असे ठोंबरे म्हणाले.

 या प्रकरणी  संजय चंद्रकांत पितळे यांचे म्हणणे ऐकूण घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त, नौपाडा-कोपरी प्रभाग समिती यांनी सुनावणी घ्यावी व सुनावणी अंती अहवाल समितीस सादर करणेबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार तत्कालिन सहाय्यक आयुक्त, नौपाडा-कोपरी प्रभाग समिती यांनी    पितळे यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्याच्या उद्देशाने दि.३०/०५/२०२३ रोजी सुनावणी घेतली आहे. सुनावणी अंती तत्कालिन सहाय्यक आयुक्त नौपाडा-कोपरी प्रभाग समिती यांनी अहवाल सादर केला होता. सदर अहवाल दि.२१/०२/२०२४ रोजीच्या ठाणे महागनरपालिका शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत अंतिम निर्णयासाठी ठेवण्यात आला होता. बैठकीत सदर अहवालावर चर्चा करण्यात आली. परंतु सहाय्यक आयुक्त यांनी सादर केलेला अहवाल स्वयंस्पष्ट नाही त्यामुळे प्रकरणी प्रशासनाने निर्णय घ्यावा, प्रशासनाने घेतलेला निर्णय समितीस मान्य असेल असे सर्वानुमते ठरविण्यात आले.

तद्नंतर प्रकरणी सहाय्यक आयुक्त, नौपाडा-कोपरी प्रभाग समिती यांचेकडून मुद्देनिहाय स्वयंस्पष्ट वस्तुनिष्ठ अहवाल मागविण्यात आला असून त्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार  पितळे यांचे नावे मिनाताई ठाकरे चौक, सुमेर कॅस्टल जवळील निर्मलादेवी चिंतामण दिघे व्यापारी संकुल येथे सन १९९७ पासून दुकान गाळा असून सदर गाळयामध्ये  संजय चंद्रकांत पितळे हे स्वतः व्यवसाय करतात त्यामुळे  पितळे यांना फेरीवाला नोंदणी प्रमाणपत्र देण्यापूर्वीपासून फेरीवाला व्यवसाया व्यतिरिक्त अन्य उपजीविकेचे साधन असल्याचे दिसून येते. त्यामुळे संजय चंद्रकांत पितळे यांचेकडून पात्रता निकषातील अट क्र. ४ ची पुर्तता होत नसल्याने प्रकरणी तत्कालिन व विद्यमान सहाय्यक आयुक्त, नौपाडा-कोपरी प्रभाग समिती यांनी सादर केलेला अहवाल, वस्तुस्थिती व योजनेतील पात्रता निकषातील अटी शर्ती नुसार नौपाडा-कोपरी प्रभाग समिती कार्यालयाकडून  संजय चंद्रकांत पितळे यांना देण्यात आलेले फेरीवाला नोंदणी/विक्री प्रमाणपत्र रद्द करणेबाबतचा प्रस्ताव मा. आयुक्त सो. यांचेकडे सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावास मा. आयुक्त सो. यांनी दि. १९/०९/२०२४ रोजी मान्यता दिलेली आहे. सबब, "पथविक्रेता (उपजीविकेचे संरक्षण व पथविक्री विनियमन) (महाराष्ट्र) योजना, २०१७ मधील बाब क्र.५.३ मधील तरतूदीनुसार समितीस प्रदान केलेल्या अधिकारान्वये पितळे यांचे फेरीवाला नोंदणी प्रमाणपत्र रद्द करणेबाबत प्रशासनाने घेतलेल्या निर्णयास ठाणे महानगरपालिका शहर फेरीवाला समिती मान्यता दिली  आहे. तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. 


गुन्हा दाखल


ब्लाउस पीस विकणारा बोगस फेरीवाला पत्रकार संजय चंद्रकांत पितळे याचा फेरीवाला प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं आहे.ब्लाउस पीस आणि रुमाल विकून पत्रकार झालेले संजय चंद्रकांत पितळे या बोगस फेरीवाल्याचा फेरीवाला प्रमाणपत्र अखेर ठाणे महानगर पालिका ने रद्द केला आहे. या बोगस फेरीवालेच्या मानसिक संतुलन बिघडल्यामुळे याला काही महिन्यापूर्वी ठाण्यातील मेंटल हॉस्पिटल इथे ही ऍडमिट केले होते. मानसिक संतुलन बिघडले म्हणजे तो सध्या "मेंटल" आहे असं बोलणे चुकीचे नसणार. हा मेंटल आणि बोगस फेरीवाल्याला महाराष्ट्र राज्य अधिस्वीकृती समिती चा सदस्य ही केलं गेला आहे.* महाराष्ट्र राज्य अधिस्वीकृती समिती मध्ये असे बोगस आणि मेंटल लोकांची काय गरज आहे ? उद्या जर या मेंटल ने महाराष्ट्र राज्य अधिस्वीकृती समिती मध्ये काही बोगस काम केलं तर कोणाला दोषी ठरवायचा ? कारण हा तर मेंटल आहे.म्हणून माझी राज्य सरकारला ही विनंती आहे की असे मेंटल आणि बोगस लोकांचे महाराष्ट्र राज्य अधिस्वीकृती समिती सदस्यपद रद्द करून त्यांचा ठाणे मेंटल हॉस्पिटल इथे योग्य ते उपचार करावा.............एक ठाणेकर




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com