Top Post Ad

'उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा' या राज्यस्तरीय मतदार जनजागृती अभियानाचा शुभारंभ


 मतदारांमध्ये निवडणुकीतील सहभागाबद्दल जागरूकता निर्माण करणे व मतदारांची सक्रिय भागीदारी सुनिश्चित करणे या उद्देशाकरिता महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ निमित्त, माननीय भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभागासाठी सुनियोजित कार्यक्रम (SVEEP) अंतर्गत, मतदार जनजागृतीसाठी 'उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा' हे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा महाराष्ट्र स्तरीय शुभारंभ गेटवे ऑफ इंडिया येथे शुक्रवार, दिनांक ८ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता करण्यात येणार आहे. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ च्या मतदान पूर्वतयारीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी, माननीय भारत निवडणूक आयोगाचे उप निवडणूक आयुक्त  हिर्देश कुमार, उप निवडणूक आयुक्त संजय कुमार, संचालक  पंकज श्रीवास्तव, प्रधान सचिव  अविनाश कुमार, सचिव  सुमन कुमार, अवर सचिव अनिल कुमार हे शिष्टमंडळ दिनांक ८ नोव्हेंबर २०२४ रोजी मुंबई दौऱयावर आहे. या शिष्टमंडळाच्या उपस्थितीत 'उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा' या विशेष अभियानाचा शुभारंभ होईल. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी  एस. चोक्कलिंगम, मुंबई उपनगर जिल्हा व मुंबई शहर जिल्हा यांचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, सर्व अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी देखील या शुभारंभास उपस्थित राहणार आहेत.


क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेता सुबोध भावे, अभिनेत्री श्रीमती वर्षा उसगांवकर, सिने कलाकार अर्जुन कपूर, हास्य कलाकार श्रीमती भारती सिंग, हर्ष लिंबाचिया, गायक मिलिंद इंगळे, गायिका श्रीमती वैशाली माडे, गायकराहुल सक्सेना यांच्यासह विविध नामवंत कलाकार, अभिनेते तसेच दिव्यांग अधिकार क्षेत्रातील श्रीमती विराली मोदी, राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे सदिच्छा दूत श्रीगौरी सावंत आणि निलेश सिंगीत आदी याप्रसंगी उपस्थित राहतील.  या विशेष अभियानाचा मुख्य उद्देश मतदारांमध्ये निवडणुकीतील सहभागाबद्दल जागरूकता निर्माण करणे व मतदारांची सक्रिय भागीदारी सुनिश्चित करणे हा आहे. त्यादृष्टिने या शुभारंभ कार्यक्रमात विविध कला सादरीकरणातून मतदार जनजागृतीचा संदेश देण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई पोलीस दलाच्या वाद्यवृंद पथकाकडून सादरीकरण करण्यात येणार आहे. तर, डाक कार्यालयाने निवडणूक विषयक तयार केलेल्या डाक तिकिटाचे अनावरण केले जाईल. त्याचप्रमाणे उपस्थितांना मतदान करण्याविषयी शपथ देण्यात येईल. मतदार जनजागृतीचा संदेश देणारी विद्युत रोशणाई देखील समुद्रातील बोटींवर करण्यात येणार आहे. मतदार जागृती रॅली, मतदार जागृती व्हॅनचे लोकार्पण, फ्लॅश मॉब देखील यानिमित्ताने आयोजित करण्यात आले आहे.  विशेष म्हणजे, मुंबईत शुभारंभ होत असताना, त्याचवेळी म्हणजे शुक्रवार, दिनांक ८ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी 'उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा' या मतदार जनजागृती अभियानाचा शुभारंभ स्थानिक स्तरांवरुन देखील होणार आहे.   विविध कला सादरीकरणातून मतदार जनजागृतीचा संदेश देण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com