महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा करण्याच्या पद्धतींमध्ये काही विकृती निर्माण झाल्या आहेत. याची सुरुवात गणेश मूर्तींच्या निर्मितीपासून होते.केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाने १२ मे २०२० पासून देशभरात प्रदूषणकारी प्लास्टर ऑफ पॅरीस पासून मूर्तींचे उत्पादन, साठवणूक, विक्री इत्यादींवर बंदी घातलेली आहे. सर्वोच्च न्यायालयानेही २०२१ साली हि बंदी कायम केली असताना, आजही बाजारात विक्रीस उपलब्ध असणाऱ्या ९०% मूर्ती या प्लास्टर ऑफ पॅरीस निर्मित आहेत. पर्यावरणपूरक मातीच्या गणेश मूर्तींबाबत गेली दोन दशके पर्यावरण संस्था सातत्याने समाज प्रबोधन करत आहेत, त्याचा सकारात्मक परिणाम म्हणजे आज ग्राहक सजग झाला असून मातीच्या मुर्तींबाबत आग्रही आहे. परंतु बाजारात गेल्यावर ग्राहकाकडे प्लास्टर ऑफ पॅरिसचाच पर्याय उपलब्ध आहे. दरवर्षी गणेशोत्सव जवळ येताच राज्य सरकार PoP बंदीबाबत केवळ दिखावा करत असून प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जात नाही. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आज पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती बनविणारे पारंपारीक मूर्तिकार देशोधडीला लागलेत, घातक कृत्रिम रंगाने रंगविलेले लाखो टन अविघटनशील प्लास्टर ऑफ पॅरिस आपल्या खाड्या, नद्या, तलाव, समुद्र अशा नैसर्गिक स्रोतांमध्ये जातेय . जलिय जैव विविधता प्रचंड वेगाने उद्ध्वस्त होते आहे.
या सर्व मुद्यांबाबत राज्यातील विविध जिल्ह्यांतील पर्यावरण कार्यकर्ते व पारंपरिक मुर्तीकारानी एकत्र येत मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या प्लॅस्टर ऑफ पॅरिस मुर्तींबबत बंदीची तंतोतंत अंमलबजावणी करणे, नियम मोडणाऱ्या मूर्तिकार, विक्रेते यांना जबर दंड ठोठावून पर्यावरण संरक्षण अधिनियमा अंतर्गत अजामिनपात्र गुन्हे दाखल करणे, जिल्हास्तरीय समित्या नेमून त्यांच्यामार्फत अंमलबजावणीची देखरेख ठेवणे अशा प्रमुख मागण्या या याचिकेत केल्या आहेत. दिनांक ३१ जुलै २०२४ रोजी याचिकेची प्रथम सुनावणी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय यांच्यासमोर झाली असता याचिकाकर्त्यांचे म्हणणे गांभीर्यपूर्वक ऐकून सर्व प्रतिवादींना त्यांचे म्हणणे ३ आठवड्यात प्रतिज्ञापत्रावर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
गणेशोत्सव साजरा करण्यापाठी हिंदू धर्मात असलेल्या निर्मळ उदात्त हेतूच्या रक्षणासाठी ,आपल्या प्रथा परंपरा धार्मिक आस्था जोपासण्यासाठी कोणत्याही दबावाला बळी न पडता राज्य सरकारने प्लॅस्टर ऑफ पॅरिस बंदीची तात्काळ अंमलबजावणी करावी. नियम मोडणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी. ..रोहित जोशी - ९८१९७६९०६९ याचिकाकर्ते
- जनहित याचिका ९६/२०२४
- रोहित जोशी व इतर विरुद्ध महाराष्ट्र राज्य सरकार व इतर
मी मराठवाड्याची असल्याने गणेशोत्सवाच्या माझ्या अशा फारशा आठवणी नाही आहेत. पश्चिम महाराष्ट्रात घरोघरी गणपती असतो. मुंबईत अलीकडे बाहेरून आलेली माणसं सुद्धा गणपती बसवतात. नेपाळ, युपीवरून आलेले लोक सुद्धा गणेशोत्सव साजरा करतात. पण, खरा गणपती हा कोकणातला आहे'. मराठवाड्यात एवढं स्तोम नाही. टिळकांनी सुरू केल्याने तेव्हा सार्वजनिक गणपतीचे मेळे व्हायचे. ते स्वरूप थोडं कमी होतं किंवा माझ्या वाट्याला एवढं काही आलं नाही. पुण्यात आल्यावर मी पाच मानाच्या गणपतींचं दर्शन घेतलं. त्यानंतर मुंबईतला गणेशोत्सव सुद्धा पाहिला. खरं सांगू का म्हणजे त्याच फार अवडंबर झालं आहे. खूप चुकीच्या गोष्टी होतात. सार्वजनिक गणपती आपण मोठ्या भक्तिभावाने करतो. पण मला असं वाटतं आता आपण सार्वजनिक गणपती नाही केले पाहिजेत'.'रस्त्याच्या मध्यभागी तुम्ही गणेशोत्सव साजरा करता. पण, त्यानंतर रात्री तुम्ही दारू पिऊन पत्ते खेळणं वगैरे चालतं. हे तर कोणीच अमान्य करू शकत नाही. हे एकदम चुकीचं आहे.आपणच आपल्या देवाचा अपमान करतोय, सार्वजनिक गणपती आता बंद व्हायला हवाय. छोट्या- छोट्या गावांमध्ये आता सुबुद्धपणे एक गाव एक गणपती अशी प्रथा सुरू केली आहे. त्यामुळे आपण आता असे बदल केले पाहिजेत. एनर्जी वाया जाते. सार्वजनिक गणेशोत्सवात सर्व प्रकारचं प्रदूषण होतं. मला वाटतं घरोघरी जो गणपती बसतो तो खूपच सुंदर असतो. कुणा-कुणाच्या घरचा गणपती सुद्धा मोठा असतो', - मराठी अभिनेत्री शुभांगी गोखले
0 टिप्पण्या