Top Post Ad

भारतीय बौद्ध बांधवांनी जागतिक बौद्ध बांधवांशी नाळ जुळवणे गरजेचे

 


 जगामध्ये मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध आदी धर्माची भिस्त आहे . त्या त्या धर्मगुरूनी आपण देवाचे प्रेषित आहोत. देवदूत आहोत. आपणच स्वयंभू आहोत असे सांगितले.मात्र, सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी आपण काही मोक्षदाता नसून मार्गदाता आहोत असे सांगून मी ही तुमच्यासारखा माणूस आहे. जे काही ज्ञान मी प्राप्त केले आहे ते ज्ञान तुम्हीही प्राप्त करू शकता. मी सांगितलेल्या मार्गावरून सतत चालण्याचा प्रयत्न करा. त्या सततच्या प्रयत्नामुळे ती गोष्ट साध्य करू शकता. आणि हा साधासुधा सिद्धांत, जगण्याचा उपाय, नियम, वर्तुणूक त्यांनी सांगितली. सर्व दुःखाचे मूळ तृष्णा आहे. आसक्ती आहे. जी गोष्ट हवीहवीशी वाटते ती गोष्ट मिळू न शकल्याने जे दुःख होते. त्याचे खरे कारण तृष्णा/आसक्ती मध्ये आहे. माणसाने माणसांशी चांगले वागणे, बोलणे, व्यवहार ठेवणे म्हणजेच बुद्ध धम्म होय. माझ्यासह सर्व मानव जातीचे, प्राणीमात्रांचे, जीवांचे मंगल हो। त्यांचे कल्याण हो। ही उदात्त भावना मृणजे बुद्ध धम्म होय. कोणतेही कार्य करताना कोणताही मनी कुटील डाव न ठेवता, कपटनितीने कुकर्म न करता केलेल आचरण म्हणजे बुद्ध धम्म होय.

 राग, लोभ, द्वेष, मत्सर, ह्या माणसांच्या विकारांना बुद्धाने शत्रू मानले आहे. त्याचेवर नियंत्रण करण्यासाठी मन हे कर्ता करविता आहे. शारिरीक व्याधीपेक्षा मानसिक व्याधीने मनुष्य आजारी पडतो. बुद्धाने वयाच्या ८० वर्षापर्यंत भ्रंमती करून लोकांना उपदेश दिला, प्रवचने दिली. जीवन जगण्याचा मार्ग दिला. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच!!! ते म्हणतात की तुम्ही कुनावरही विसंबून राहू नका. तूच तुझा मार्गदाता हो। तू स्वयंदिप हो। कुणाच्याही अधीन जाऊ नका. कुणाचेही गुलाम होऊ नका. मनुष्य जीवन खूप सुंदर आहे. हे सुंदर जीवन जगताना पंचशील तात्वाचे पालनासह अष्टशिल, दशशिलांचे पालन करा, त्याचे अध्ययन करा आणि मग बघा ते जीवन किती अनमोल आहे ते.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली लाखो अनुययांसह बौद्ध धम्म नागपूर याठिकाणी स्विकारला. आता माझा नवा जन्म होत आहे ३शी त्यांनी ओळख जगाल करून दिली. आपण बाबासाहेबांच्या दिव्य संदेशाची अंमलबजावणी करतो का हा खरा प्रश्न आहे. आपण त्यांच्या दिव्य संदेशावर वाटचाल केली तर आपला भाग्योदय कुणीही रोखू शकणार नाही. जगामध्ये २०० बौद्ध राष्ट्रे आहेत. त्या राष्ट्रांतील राष्ट्रप्रमुखाशी पत्रव्यवहार करून त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटून भारतातील बौद्ध बांधवावर, धम्मस्थळांवर कशाप्रकारे अन्याय अत्याचार होतो. त्यांची कशाप्रकारे मुस्कटदाबी केली जाते. त्यांचेवर पदोपदी अन्याय अत्याचार केला जातो याची वास्तविकता, दाहकता त्यांचेसमोर मांडली पाहिजे. आणि बौद्ध धम्माची बौद्ध स्थळे ही कशाप्रकारे आक्रमणीत केली जाता आहेत. त्यांचेवर उपाययोजना करण्यासाठी त्यांना आपल्या देशात पाचारण केले पाहिजे. त्यांचा मानसम्मान केला पाहिजे. येथील बोद्ध बांधवांचे, बौद्ध धर्मगुरूची कशी कोंडी केली जाते आहे. त्यांचा कशाप्रकारे छळ केला जातो आहे त्याचे वास्तव दर्शन करून त्याच्या मुळाशी कोण आहे त्या शत्रूचा चेहरा जगासमोर उघडा केला पाहिजे, तर आणि तरच जगाच्या पटलावर  धम्मध्वज डोलाने फडकू शकेन. भारतातील बौद्ध बांधवांनी, धर्मगुरूंनी जागतिक बौद्ध बांधवांना याची जाणीव करून दिली पाहिजे. आणि तेथील बौद्ध बांधवांना ,धर्मगुरूंना पाचारण करून आपल्या वस्त्या- वस्त्या मध्ये नेऊन येथील बौद्ध विहारात त्यांचे धम्मप्रवचनासह विविध सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक उपक्रम करावयास लावून येथील बोद्ध बांधवांचे कशाप्रकारे अनन्वीत छळ, शोषण केले जाते. त्याविषयीची भयानक वस्तुस्थिती मांडली पाहिजे. आणि भारतीय बौद्ध बांधवांची नाळ जागतिक बौद्ध बांधवांशी जुळली पाहिजे. ही नाळ जुळली तर भारतीय बोद्ध बांधवांना, जागतिक बोद्ध बांधवाना एकमेकांच्या सुखदुःखाची जाणीव होईल. त्या त्या बौद्ध बांधवांच्या भाषेशी, संस्कृतीशी, संपर्क येईल. आणि बुद्ध जयंती ही विश्वव्यापक जयंती साजरी होईल. .

 


 याठिकाणी बसपाच्या नेत्या मायावती ह्या चारदा  मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावर त्यांनी बौध्द धम्म स्वीकारला असता तर जागतिक स्तरावर त्यांची बौद्ध धर्मीयांची मुख्यमंत्री म्हणून आगळवेगळी ओळख झाली असती, आणि त्यांच्या संकल्पनेतील जे सर्व महामानव महापुरूष महामाता आहेत त्यांची जगाला ओळख झाली असती. एवढेच नव्हे तर भारतामध्ये जगामध्ये सर्व कार्यकर्तांमध्ये शत्रुमध्ये भूंकप झाला असता, सर्व हादरून गेले असते. आणि एक वेगळी शक्ती, सामर्थ्य प्राप्त झाले असते. परंतु त्यांनी तो इतिहास रचला नाही. जो इतिहास पुसता येणार नाही. आणि आता नामी संधी भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष, आझाद पार्टीचे प्रमुख नेते आणि नवनिर्वाचित खासदार ॲड चंद्रशेखर आझाद यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार करून जागतिक बोद्ध राष्ट्रमुखांना, धर्मगुरूंना आमंत्रित करून विश्वव्यापी धम्मसोहळा आयोजित करून ला सर्व बौद्ध बांधवांची नाळ जोडण्याचे काम केले पाहिजे. आणि ही सुवर्णसंधी दवडता कामा नये . कारण आपण कुठपर्यंत आणि केंव्हापर्यंत आपण कळपा कळपाने राहात राहायचे? अगदी एकसंघ होऊन इतिहासाची पाने सुवर्णअक्षराने लिहून काढू...

 सुरेश गायकवाड ९२२४२५०८७३


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com