Top Post Ad

बदलत्या हवामानापासुन पर्यावरणाला वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड आवश्यक


 
 करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने "ऑक्सिजनची" परीभाषा काय आहे हे जगाला दाखवून दिले.त्यामुळे सावधान ! ऑक्सिजनची पुर्ती करण्यासाठी "पर्यावरणाला" वाचवीने अत्यंत गरजेचे आहे.कारण आज आपण बदलत्या हवामानामुळे पर्यावरणात झालेल्या बदलांचे प्रायचित्य भोगतो आहे.प्रदुषणावरील समस्येवर १९७२ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने स्टाकहोम (स्विडन) इथे जगातील पाहीले पर्यावरण सम्मेलन आयोजित केले.यामध्ये ११९ देशांनी भाग घेतला होता व सर्वांनीच पृथ्वीच्या सिध्दांताला मान्यता दिली व दर वर्षी ५ जुन पर्यावरण दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली व ५ जुन १९४७ ला पहीला "जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला".आज संपूर्ण जगात पर्यावरणाच्या बाबतीत असमंजस्यतेचे वातावरण निर्माण झाले आहे.प्रत्येक देश सर्वांनाच सांगतो की पर्यावरण वाचविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.तरीही जगातील अनेक देश अत्याधुनिक शस्त्रस्पर्धेत आप-आपले शक्ती प्रदर्शन मोठ्या प्रमाणात करतांना दिसतात.यामुळे प्रदूषणात व तापमानात वाढ होवून पर्यावरणावर विपरीत परिणाम होतांना दिसतो.याचा परिणाम आज तिसऱ्या महायुद्धाकडे जातांना दिसतो.

आज युक्रेन-रशिया युद्ध व इजरायल-हमास-ईरान युद्धामुळे अनेक भाग आगीत भस्मसात झाला आहे.त्यामुळे बलाढ्य देशांनीच पर्यावरणाची गळचेपी केल्याचे दिसून येते.अमेरिका,नाटो देश,चीन, उत्तर कोरिया, रशिया, ब्रिटन, इजरायल यांनी पर्यावरणाला कोसो दूर नेवून ठेवले आहे ही समजदार आणि बलाढ्य देशांची शोकांतिकाच म्हणावी लागेल. आपण दुसऱ्या महायुद्धातील हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बचे मृत्यूचे तांडव पहाले तरीही प्रत्येक देश पर्यावरणाला बाजूला सारून अणुबॉम्बची भाषा करतात हे जगाचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. कारण आज प्रत्येक देश निसर्गाच्या हिरव्यागार गालीच्यावर बसण्यापेक्षा बारूदच्या ढीगाऱ्यावर बसण्याचे जास्त पसंत करतांना दिसतो.कारण अत्याधुनिक शस्त्र स्पर्धेत सर्वच अव्वल येण्यासाठी प्रत्येक देश कसोटीचे प्रयत्न करीत आहे. त्यामुळे पुढे चालून बारूदचा ढीगारा संपूर्ण पृथ्वीला आगीच्या खाईत लोटु शकते.त्यामुळे सावधान जगातील देशांनो बारूदच्या ढीगाऱ्यावर लक्ष न देता पर्यावरणावर लक्ष दिले पाहिजे.

कारण वाढत्या तापमानामुळे यावर्षी मे २०२४ ला भारताची राजधानी दिल्ली येथील तापमान सर्वाधिक ५२.३ अंश सेल्सिअस होते यावरुन आपण समजू शकतो की पुढे तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होवू शकते याला नाकारता येत नाही.आज जगात मोठ्या प्रमाणात शहरीकरण आणि औद्योगिकीकरणाचा विस्तार झाल्यामुळे पर्यावरण डगमगतांना दीसत आहे.ढासळत्या पर्यावरणामुळे सुर्य आग ओकत आहे.२०१९ मध्ये राजस्थान मधील चुर आणि श्रीगंगानगर येथे तापमान ५० डीग्री सेल्सिअस पार गेल्याने भारतातील पर्यावरण रेड झोनमध्ये होते ही अत्यंत चिंतेची व गंभीर बाब आहे.२६ मे २०२० ला इराकमधील तूज या शहरात जगभरातील उच्चांकी ५०.५ अंश सेल्सिअस होते. भारतात  मे २०२४ मध्ये दिल्लीतील तापमान ५२.३ अंश सेल्सिअस वर गेले होते.यामुळे वाढते तापमान पृथ्वीसाठी,मानव, जीवजंतू, पशुपक्षी या सर्वांसाठी आगीचा गोळा बनल्याचे दिसून येते. वाढता तापमानातील बदल हा मानवाच्या अतीरेकामुळे व अहंकारामुळे निर्माण होत आहे.याचा सरळ परिणाम  पर्यावरणावर होत असुन त्याचा ह्रास होत आहे.

२०१९ मध्ये बंगालमध्ये आलेल्या "अम्फान"चक्रीवादळाने १०० हुन अधिक लोकांचा बळी गेला व मोठ्या प्रमाणात वित्तीय हानी सुध्दा झाली.यानंतर "तौक्ते व "यास" चक्रीवादळाने हाहाःकार माजवीला.म्हणेज दरवर्षी दिवसेंदिवस वेगवेगळे चक्रीवादळ उग्ररूप धारण करतांना दिसते. मानवाने पर्यावरणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे ह्या संपूर्ण विनाशकारी नवीन-नवीन घटना पहायला मिळतात.याकरीता मानवाने पर्यावरणाची जोपासना करण्याची गरज आहे.आज जगात मोठ्या प्रमाणात प्रदुषण वाढत आहे. त्यामुळे पृथ्वीतलावरील ऑक्सिजनची मात्रा दीवसेंदीवस कमी होतांना दिसत आहे.याचे उदाहरण आपणाला करोना काळात चांगल्याप्रकारे ग्यात आहे.यामुळे अनेक प्रकारचे नवीन-नवीन आजार उदयास येताना दीसतात.आज पर्यावरणाचे संतुलन विस्कळीत झाल्यामुळे व मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्यामुळे जंगलातील हिंसक पशु शहरांकडे शिरकाव करतांना दिसतात.यामुळे मानवीय हानी मोठ्या प्रमाणात होतांना आपण पहातो.यामुळेच मानव व पशु यांच्यात शत्रृत्वाची भावना निर्माण झाली आहे.

आज प्रदुषणामुळे अनेक पशु-पक्षी लुप्त झाल्याचे दिसून येते."गिधाड हा पक्षी" पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून एक महत्त्वाचा घटक आहे.परंतु प्रदुषणामुळे गिधाडांची संख्या कमी झाल्याचे दिसून येते.अशा प्रकारे अनेक पशु-पक्षांना प्रदुषणामुळे आपले प्राणसुध्दा गमवावे लागतात. पर्यावरणाला वाढविण्याकरिता मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याची गरज आहे.वाढते शहरीकरण व औद्योगिकीकरण यांना कुठेतरी थांभवीले पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड व्हायला पाहिजे.आज प्रदुषणामुळे व ग्लोबल वॉर्मिगमुळे मोठ्या प्रमाणात ग्लेशिअर वितळत आहे, समुद्राच्या पाण्याची पातळी दीवसें-दीवस वाढतच आहे,शहरीकरण, औद्योगिकीकरण व खनण प्रक्रियेमुळे जमीनिचा भुभाग निकामी होत आहे.यामुळे जगात ज्वालामुखीचा उद्रेक,वनवा लागुन जंगल संपदा नष्ट होने,भुकंप, सुनामी,अम्फान तुफान,अती पाउस,अती उष्णता,अती थंडी,अवकाळी पाऊस,विजापडुन मृत्यूचे प्रमाण सुध्दा मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या घटना आपल्याला निरंतर पहायला मिळतात.

त्यामुळे आज जगातील देशांचे व देशातील प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे की पर्यावरणाला वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून "घर तिथे झाड" ही मोहीम राबविली पाहिजे.जंगल तोडीमुळे पावसाचे पाणी जमिनीत न मुरता सरळ समुद्रात किंवा नद्यांमध्ये जातांना आपण पहातो.यामुळे विहीरीच्या पाण्याची पातळी दीवसें-दीवस कमी होतांना दिसते. याकरीता ७०० फुट बोअरवेल खोदुन मानव पाण्याची तहान भागवत आहे. पाण्यासाठी ७०० फुटांवर मानवाने जाने म्हनजे देवलोकातील (पाताळातील) पाणी आनल्या सारखे आहे.मानवाचा अधिकार फक्त ५० ते १०० फुटांपर्यंतच आहे.परंतु मानवाने आपल्या बुद्धीचा अतीरेक केला त्यामुळेच आज मानवावर निसर्ग कोपत आहे ही सत्य परिस्थिती आहे.यावरून स्पष्ट होते की मानवजाती स्वत:च्या स्वार्थासाठी कोणत्याही स्तरावर जायला मागेपुढे पाहत नाही. कोव्हीड-१९ची  महामारी  मानवाच्या अतीरेकामुळेच झालेली होती.एप्रिल-मे महीना उष्णतेच्या लाटेचा होता त्यामुळे "संपूर्ण भारतात उष्णतेची लाट आणि पाण्याचा हा!हा!कार!"पहायला मिळाला. तळपत्या सुर्याने संपूर्ण भारतात उष्णतेची लाट पसरली.पशु-पक्षी पाण्यासाठी वणवण भटकतांना दीसतात.हा संपूर्ण प्रकार पर्यावरणाचे संतुलन डगमल्याचा आहे.

त्यामुळे निसर्गाला वाचविने काळाची गरज आहे.निसर्ग वाचला तर पृथ्वी वाचेल, पृथ्वी सुरक्षीत रहाली तर मानवजाती, पशु-पक्षी, जिवसृष्टी,जिवजंतु सुरक्षित राहील.परंतु याकरिता सर्वांनीच पर्यावरणाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. पर्यावरण वाचविण्यासाठी जल,वायु,भुमि यांची जोपासना करणे गरजेचे आहे.संपुर्ण जगात जल व वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात दीसुन येते.पर्यावरण टीकुन रहावे याकरिता प्रत्येक देश पर्यावरणावर करोडो रुपये खर्च करतात. परंतु कोव्हीड-१९ च्या महामारीच्या काळात जगात लॉकडाउन होता यामुळे हवाई वाहातुक,रेल्वे, कारखाने व इतर संपूर्ण वाहातुक बंद होती. यामुळेच करोनाकाळात पर्यावरण अत्यंत आल्हाददायक होते.नद्यांना प्रदुषनापासुन मुक्त करण्यासाठी सरकारने करोडो रुपये खर्च केले.परंतु लॉकडाउनच्या काळात नदी,नाले,तलाव आपोआप प्रदुषण मुक्त झाले व पृथ्वी वरील निसर्ग बहरला आणि पर्यावरणात आपोआप सुधारणा झाली.

५ जुन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मी सरकारला आव्हान करतो की लॉकडाउनच्या काळातील प्रदुषणाची मुक्ती पहाता "दर महिन्याला एक दिवस लॉकडाउन ठेवायला पाहिजे" असे माझे स्पष्ट मत आहे.वाढती लोकसंख्या,वाढते औद्योगिकीकरण पृथ्वीला व पर्यावरणाला घातक आहेच यात दुमत नाही.परंतु यातुन मार्ग आपल्यालाच काढावाच लागेल. याकरीता शहरीकरणाचा व औद्योगिकीकरणाचा विस्तार रोखायला पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून व महीण्यातुन "एक दिवस" लॉकडाउन  ठेवण्याचा "संकल्प" भारतासह संपूर्ण जगाने घ्यायला हवा.आज संपूर्ण जग बारूदच्या ढीगाऱ्यावर बसलेले आहे हे विनाशाचे संकेत आहे. यापासुन जगातील संपूर्ण देशांनी शस्त्रसंधी करून दारूगोळ्यामध्ये कपात करायला पाहिजे.यामुळे पर्यावरण वाचविण्यासाठी मोठी मदत होईल.अन्यथा "विनाशकारी विपरीत बुद्धी" असा प्रकार व्हायला वेळ लागणार नाही. याकरीता पर्यावरण वाचविण्याचा संदेश संपूर्ण जगात जायला पाहिजे.पर्यावरण वाचविण्या करिता "शक्तीचा" वापर न करता "भक्तीचा व युक्तिचा" वापर जास्त केला तरच "निसर्ग" भरभराटीला येईल. पृथ्वीतलावरील ऑक्सीजनची कमी पहाता प्रत्येकाने आपल्या घरी तुळशी,मनीप्लांट, जुही,एलोवेरा इत्यादी वृक्ष अवश्य लावले पाहिजे.त्याचप्रमाणे ग्राउंडच्या ठिकाणी किंवा उद्यानाच्या ठिकाणी वडाचे झाड, पीपळ,नीम इत्यादी झाडांची लागवड करून ऑक्सिजनची मात्रा वाढवीली पाहिजे व पर्यावरणाला वाचवीले पाहिजे."झाडे लावा पर्यावरण वाचवा"


  •   रमेश कृष्णराव लांजेवार.  
  • (माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर)  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com