Top Post Ad

अवघ्या आठ तासात रेल्वे रूळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी,

 ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाच येथून जलद मार्गिकेच्या रेल्वे गाड्या कल्याण, कसारा, कर्जत दिशेने वाहतूक करत असतात. रात्रीच्या वेळी या फलटावरती प्रवाशांचे मोठी गर्दी असते. अनेकदा फलाटावर चेंगराचगरी सदृश्य परिस्थिती निर्माण होत असते. पावसाळ्यात प्रवाशांचे सर्वाधिक हाल होतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक पाचच्या रुंदीकरणाचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे गुरुवारी रात्रीच रुंदीकरणाचे कार्य मध्य रेल्वे प्रशासनाने हाती घेतले. या कामासाठी मध्य रेल्वेने आठ तासांमध्ये फलाट क्रमांक पाचवर पूर्वी रेल्वे रूळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केले आहेत. या कामांसाठी सुमारे साडेपाचशे ते सहाशे मजूर, अभियंते, कर्मचारी कार्यरत होते अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली मध्यरात्री साडेबारा वाजल्यापासून सुमारे साडेपाचशे ते सहाशे मजूर तसेच रेल्वेचे कर्मचारी ठाणे रेल्वे स्थानकात दाखल झाले होते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फलाट क्रमांक चारची रेल्वे वाहतूकही बंद करण्यात आली होती. त्यानंतर फलाटाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत रेल्वे रूळ तोडण्यात आले तसेच हे रेल्वे रूळ सुमारे तीन ते साडेतीन मीटर रुंद एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करण्यात आले. हे कार्य १२ ते १४ तासांमध्ये रेल्वेला अपेक्षित होते परंतु अवघ्या आठ तासात कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी हे कार्य पूर्ण केले आहे. दुपारनंतर येथे फलाटाचे मुख्य कार्य देखील हाती घेतले जाणार आहे. . रेल्वे फलाटाची लांबी, उंची अनेकदा वाढल्या आहेत. परंतु रुंदी वाढण्याचा हा पहिलाच प्रयोग असावा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com