Top Post Ad

ओबीसी बहुजन पक्षाचा अमरावतीमध्ये आनंदराज आंबेडकर यांना जाहिर पाठिंबा

 


 वंचित आघाडीबाबत आम्ही आजही सकारात्मक आहोत. त्याच भुमिकेतुन ओबीसी बहुजन पक्षानै बाळासाहेब आंबेडकर यांना पाठिंबा दिला आहे तर त्यांनीही मला पाठिंबा जाहीर केला आहे. इतकेच नव्हे तर अमरावतीमधून आनंदराज आंबेडकर यांनाही आमचा पाठिंबा जाहिर करीत आहोत. असे ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी आज मुंबईत जाहिर केले. तसेच  यवतमाळ मधून अनिल राठोड, नांदेड मधून सुरेश राठोड, उत्तर मध्य मुंबईतून शांताराम दिघे, लातूर मधून पंचशील कांबळे असे आमच्या ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार आहेत. नाशिकची उमेदवारी छगन भुजबळ यांना दिली तर ओबीसी समाज त्यांच्या मागे उभा राहणार असल्याने त्यांचा विजय नक्की आहे. आमची धन पेटी खाली आहे मात्र आता मत पेटी भरणार आहे.   माढा लोकसभा मतदार संघात प्रस्थापितांची असलेली मसल पॉवर मनी पॉवर आमचा ओबीसी उमेदवार संपवणार असल्याचा इशाराही   शेंडगे यांनी शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांचे प्रश्न घेऊन लढणारे संजय हाके यांनी बहुजन समाजाचे प्रश्न अनेक वेळा मांडून सोडवले आहेत.कुणालाही भिडण्याची तयारी त्यांनी वेळोवेळी सिद्ध केली आहे. त्यांनी उध्दव ठाकरे गटातून प्रवक्ते पदाचा राजीनामा देऊन आमच्या ओबीसी बहुजन पार्टीत प्रवेश केला असून त्यांना आम्ही माढा लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली आहे असे प्रकाश शेंडगे यांनी यावेळी जाहीर केले. माढा लोकसभा मतदार संघात उमेदवारीसाठी पुन्हा घराणेशाई समोर आली आहे. मात्र या भागात ओबीसी समाज ७० टक्के आहे. याचा फायदा आता संजय हाके यांना होणार आहे. पाटील व निंबाळकर घराणे सामान्य माणसाचे कोणते प्रश्न घेऊन लढले आहेत ? आजही सर्व प्रश्न, समस्या आहे तशाच आहेत. त्या आता संजय हाके पूर्ण करतील असा आम्हाला विश्वास आहे.असे शेंडगे यांनी सांगितले.

कोस्टल रोड, अटल सेतू, गगनचुंबी इमारती असा आडवा उभा विकास होत असताना आमचा गोरगरीब समाज आजही या विकासापासून कोसो दूर आहे. त्याचा रोजच्या रोजीरोटीच्या प्रश्न सुटत नाही. यासारखे दुर्दैव नाही.  धन दांडगे लोकसभेच्या सभागृहात जातात मात्र धनगर समाजाचे किती खासदार लोकसभेच्या सभागृहात गेले. प्रस्थापितांनी कधी या पक्षाकडून तर कधी त्या पक्षाकडून निवडणूक लढवून आपली तिजोरी भरण्याचेच काम केले आहे.  आता प्रकाश शेंडगे यांच्या ओबीसी बहुजन पार्टीमुळे कुणाच्या दारात तिकीट मागायला जाण्याची गरज नाही. आज ओबीसी बहुजन पार्टीने जो विश्वास माझ्यावर टाकला आहे त्या विश्वासाने यापुढे ओबीसी बहुजन पक्षाचे कार्य करीत राहीन असा विश्वास  संजय हाके यांनी  यावेळी व्यक्त केला.  

.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com