Top Post Ad

धर्माच्या आधारावर मतदारांना आवाहन.


  •  आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या उत्तर मुंबईच्या भाजपा उमेदवार पियुष गोयल यांची उमेदवारी रद्द करा.- सुरेशचंद्र राजहंस  
  • श्रीरामाचे होर्डिंग लावून पियुष गोयल यांचे धर्माच्या आधारावर मतदारांना आवाहन.

उत्तर मुंबईचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पियुष गोयल यांनी श्रीरामाचे मोठे होर्डिंग लावले असून या होर्डिंगमध्ये वाराणसी मतदारसंघाचे भाजपा उमेदवार नरेंद्र मोदी यांचाही फोटो आहे. मोग्रा मेट्रो स्टेशनच्या बाहेर हे होर्डिंग लावले आहे, हा प्रकार धर्माच्या आधारावर आणि धार्मिक चिन्हांचा वापर करून मतदारांना आवाहन करणारा असून यातून आदर्श आचार संहितेचे उल्लंघन करण्यात आले. याची दखल घेत गोयल व मोदी यांच्यावर तात्काळ कारवाई करत पियुष गोयल यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी काँग्रेसच्या सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे.

यासंदर्भात राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठवून तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीत असे म्हटले आहे की, निवडणुकीत धर्माच्या आधारावर मतदारांवर प्रभाव टाकणे हा आचारसंहितेचा भंग करणारे आहे. परंतु भाजपा उमेदवार पियुष गोयल यांनी रामाचे होर्डिंग लावून धर्माच्या नावावर मते मागण्याचा प्रयत्न केलेला आहे. याची गंभीर दखल घेऊन गोयल व मोदी यांच्यावर तात्काळ कारवाई करावी असे सुरेशचंद्र राजहंस यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com