Top Post Ad

'मदर ऑफ डेमाॅक्रसी' ते 'मर्डर ऑफ डेमाॅक्रसी...


  निवडणूक आयोग, न्यायालयं, विद्यापीठं, नीतिआयोग, कॅग, ईडी-आयटी-सीबीआय सारख्या सगळ्याच केंद्रीय अथवा स्वायत्त-यंत्रणा वेड्यावाकड्या ताब्यात घेऊन, EVM चा कथित गैरवापर करुन, 'इलेक्टोरल-बाॅण्ड'सारख्या सरकारी-दरोडेखोरीच्या माध्यमातून प्राप्त हजारो कोटींच्या काळ्या पैशातून प्रचंड महागडा असा 'आयटी-सेल' चालवून; तसेच, शिक्षित-अशिक्षित 'अंधभक्तां'च्या फौजेला सोबत ठेऊन आणि दमनकारी पोलिस-यंत्रणेकरवी 'बुलडोझर-रिपब्लिक' चालवून... भाजपाई मोदी-शाह सरकार हुकूमशाहीचा जो वरवंटा फिरवतेय...ती अघोषित आणीबाणी आहे; पण, ती १९७५च्या इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीपेक्षा भयंकर आहे! १९४७ सालचं पहिलं स्वातंत्र्ययुद्ध आपण जिंकलो, ते लाल-बाल-पाल, म. गांधी, पं. नेहरु, सुभाषचंद्र बोस, मौलाना अबुल कलाम आझाद यासारख्या महान पुढार्‍यांच्या नेतृत्त्वाखाली व भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, मंगल पांडे, अशफाक उल्ला खान, शिरीषकुमार, बाबू गेनू यासारख्या शेकडो स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानातून! 

दुसरं स्वातंत्र्ययुद्ध आपण १९७७ साली, इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीविरुद्ध, उर्वरित सगळ्या पक्षांची जनतादलाच्या रुपाने मोट बांधून, त्यांचा लोकसभा-निवडणुकीत पाडाव करत जिंकलो आणि आता त्यानंतर, बरोबर ४७ वर्षानंतर हे *'तिसरं स्वातंत्र्ययुद्ध' आपण लढतो आहोत* आणि काळाचा महिमा बघा, ते *तिसरं स्वातंत्र्ययुद्धही, १९७७ प्रमाणेच देशभरातले सगळे विरोधीपक्ष, सत्ताधारी भाजपाविरुद्ध 'इंडिया-आघाडी'च्या बिरुदाखाली एकत्र येऊनच लढतो आहोत! *१९७५ची आणीबाणी, कायदेशीर मार्गाने आली आणि* कायदेशीर मार्गानेच गेली. पण, ही अघोषित-आणीबाणी बेकायदेशीर आणि घटनाद्रोह करणारी आहे, कितीतरी अधिक घातकी आहे...त्यावेळी, इंदिरा-सरकारने ईडी/आयटी/सीबीआयच्या विरोधकांवर सर्रास धाडी नव्हत्या घातल्या आणि काही विरोधकांना तुरुंगात धाडण्यामागे कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून काहीप्रमाणात योग्य कारणं देखील होती व एकदा १९७७ साली निवडणुका जाहीर झाल्यानंतर इंदिरा गांधींनी सगळ्याच विरोधकांना निवडणूक लढविण्यासाठी पूर्ण मोकळीक दिली होती... कुणालाही तुरुंगात ठेवलं नव्हतं, विरोधी पक्षांची बँक-खाती गोठवली नव्हती आणि आज काय हुकूमशाहीचा भयंकर तमाशा चाललाय देशात?

*'बोलता हिंदुस्तान' हे प्रख्यात युट्यूब-चॅनेल सूचना न देता रातोरात बंद करण्यात आलंय आणि सरकारविरोधात 'अबोल' असणारा 'गोदी-मिडीया' मात्र, सरकारी-जाहिरातींच्या शेकडो-हजारो कोटीत खेळतोय!* ही घटनात्मक मूलभूत अधिकार असलेल्या 'भाषण व विचार स्वातंत्र्या'ची मुस्कटदाबी आहे, गळचेपी आहे...'लोकशाहीचा चौथास्तंभ' असलेल्या पत्रकारितेला जबरदस्तीने मूठमाती देऊ पहाणं आहे. सरकारची 'री' ओढणाऱ्या, सरकारविरुद्ध अजिबात न बोलणाऱ्या 'गोदी-मिडीया'सकट सगळ्यांनाच हा दिल्लीश्वर-हुकूम'शहां'चा घातकी इशारा आहे! लक्षात घ्या, भाजपाई मोदी-शाह रासवट राजवटीत *'Freedom of Speech' जवळपास गेलंय आणि 'Freedom to Rich' मुक्तहस्ते आलंय,* ते मिळालंय 'अंबानी-अदानी'सारख्या मोदीजींच्या शे-दिडशे गुजराथी-भाषिक मित्रपरिवारातल्या (Crony-Capitalists) भांडवलदारवर्गाला...लुटा देशाला, लुटा जनतेला हवं तेवढं...*"मोजक्या लोकांच्याच हातात सत्ता-संपत्ती ठेवायची, वर्णवर्चस्ववादी-शोषक मानसिकता त्यामागे आहे"!* देश पूर्ण लुटून खाल्ला; तरीही, या 'गुजराथी-लाॅबी'ला लागलेला 'भस्म्यारोग' बरा होणं शक्य नाही...तेव्हा, सावधान!

*"तमसो मा ज्योतिर्गमय"* असा आपल्या भारतीय-आध्यात्मिक अंतःप्रज्ञेचा मोक्षाप्रत नेणारा ऊर्ध्वप्रवास... तर, भाजपाई बनावट-बेगडी 'हिंदुत्वा'चा प्रवास उलटा किंवा अधोगामी : *'प्रकाशाकडून अंधाराकडे' नेणारा...!!!* ...सापाच्या विषासारखी या 'अघोषित आणीबाणी'तली हुकूमशाही, गुलामगिरी (जशी ती, 'गोदी-मिडीया'तल्या गलेलठ्ठ पगाराच्या अँकर्स, मालक-संपादक व इतर पत्रकारांच्या रक्तात उतरलीय); तुमच्याआमच्या अंगात-रक्तात हळूहळू खोलवर भिनू पहातेय... तेव्हा, सावध होऊन काळाच्या हाका ऐका!  तुमच्या मातीत घट्ट रुजू पहात असलेली ही विषवल्ली* जर, २०२४च्या लोकसभा-निवडणुकीत शेतातलं तण उपटून फेकून द्यावं, तशी... आपण मतपेटीतून उपटून फेकून दिली नाही; तर, मतदारराजा, तुझं 'लोकशाहीचं पीक' हातचं गेलं म्हणून समज! हे 'हुकूमशाही'चं तण...तुमचंआमचं जीणं हराम करेल, जगणं मुश्किल करेल...आणि, त्याविरुद्ध, कोणी साधा आवाजसुद्धा उठवू शकणार नाही! 

आज लोकशाहीचा आवाज जिवंत ठेवण्यासाठी* धडपडणाऱ्या विरोधकांना फक्त, तुरुंगातच डांबलं जातंय, उद्या रशियातला पुतीन करतो तसं, विरोधकांना तुरुंगात डांबून विष चारुन मारणं, किती दूर आहे?...कारण ते क्रौर्य, ती हुकूमशाही-जुलूमशाही प्रवृत्ती, या लोकांनी काळ्या टोपीसह इटलीचा नृशंस हुकूमशहा मुसोलिनीकडून उसनी घेतलीय. ...लक्षात ठेवा की, रावण प्रत्येकवेळी साधुचा वेष* धारण करुनच सीतेचं अपहरण करतो, असं नव्हे; तो कधि कधि खुद्द रामाचाच वेष परिधान करुन येतो. ...भाजपा नावाचा 'रावण', 'सब का साथ, सब का विकास' पुटपुटत, विकासाचं सोंग घेऊन २०१४मध्ये प्रथम आला, २०१९मध्ये तो बालासोर 'सर्जिकल-स्ट्राईक'च्या रुपाने 'देशभक्ति'चं सोंग वठवत आला आणि आता २०२४मध्ये, अयोध्येतल्या राममंदिराच्या निमित्ताने रामभक्तिचं 'दशावतारी-सोंग' वठवत परत आलाय...आपण, गेल्या दोन्ही खेपेस फसलो. आपल्या देशातल्या 'लोकशाहीरुपी सीते'चं अपहरण करुन, तो आज इथेच ठिय्या देऊन बसलाय (लंकेत परत जायची सोय नाहीच; 'कच्चाथिवू' बेटावरुन लंकेशी हकनाक दुश्मनी घेऊन बसलेत ना).

या लोकसभा-निवडणुकीनंतर आपल्या देशात निवडणुका होणारच नाहीत, असं नाही...त्या होतील; पण, त्या कशा होतील...तर जशा त्या चीन, उ. कोरिया व रशियामध्ये होतात, तशाच होतील. तिथल्या निवडणुकांमध्ये 'लोकेच्छा' नव्हे; तर, राज्यकर्त्यांची सत्तापिपासू 'पाशवी इच्छा' प्रतिबिंबित झालेली असते. ...नाहीतरी, ब्लादिमीर पुतिनसारखाच क्रूर, विकृत मनोवृत्तीचा रशियाचा भूतपूर्व अध्यक्ष जोसेफ स्टॅलिन म्हणायचा की, "निवडणुकीत 'मतदार' महत्त्वाचे नसून 'मत मोजणारे' महत्त्वाचे असतात" (आपल्याकडे, EVMs, निवडणूक-आयोग आणि ईडी/आयटी/सीबीआयसारख्या दमनकारी सरकारी-यंत्रणा महत्त्वाच्या असतात). अशाच हडेलहप्पीने व दडपशाहीनेच तर, पुतिन आजवर बेगुमानपणे निवडणुका जिंकत आलेत. आपली सत्ता तहहयात कायम राखण्यासाठी राज्यघटनेत वेडेवाकडे बदल करत आलेत, विरोधकांना सरळ ठार मारत किंवा त्यांच्यावर विषप्रयोग करत आलेले आहेत...हाच, (रास)पुतीन नावाचा सत्तापिपासू फुगा, आपल्यासाठी 'धोक्याचा कंदील' बनून लोकसभा-निवडणुकीच्या तप्त हवेत वर लटकतो आहे...आपली नजर, किमान वर तर जायला हवी ना!

राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)*_ _(क्रमशः)_


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com