देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. याकरिता प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची रणनिती आखत आहे. प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारांची घोषणा करत आहे. मात्र प्रस्थापित भाजपा मित्र पक्षांची आघाडी आणि काँग्रेस मित्र पक्षांची आघाडी व्यतिरीक्त जनतेला पर्याय म्हणून ओबीसी एन टी पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष संजय धाकु कोकरे यांनी महाराष्ट्रातील छोटे छोटे राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांना एकत्र करुन तिसरी राजकीय आघाडीद्वारे (T.R.A) निवडणुक लढवणार असल्याचे आज प्रसिद्धी माध्यमांसमोर जाहिर केले. यावेळी लोकस्वराज्य पार्टीचे अध्यक्ष बाळासाहेब गावंडे, सुराज्य निर्माण सेनेचे अध्यक्ष आकाश पवार राष्ट्रमाता अहिल्यादेवी समाज परिवर्तन आघाडीचे बाळासाहेब लंबाटे, राष्ट्र निर्माण पार्टीचे आनंदकुमार तसेच काशिनाथ पाल, मेघशाम सोनवणे इत्यादी अनेक पक्षांचे प्रमुख उपस्थित होते.
1) ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडिया 2) न्यु राष्ट्रीय समाज पक्ष 3) समता पार्टी 4) बळीराज्य पार्टी 5) स्वराज्य शक्ती सेना 6) लोकराज्य जनता पार्टी 7) राष्ट्रमाता अहिल्यादेवी समाज परिवर्तन आघाडी 8) महाराष्ट्र प्रगतीक पक्ष 9) बहुजन क्रांती पक्ष 10) वंदे मातरम सेना 11) भारतीय लोकशक्ती पार्टी 12) संघर्ष सेना 13) भारतीय प्रजा सुराज्य पक्ष 14) राष्ट्र निर्माण पार्टी 15) लोक स्वराज्य पार्टी 16) सुराज्य निर्माण सेना 17) मुस्लिम सेवा संघ 18) मातंग सेवा संघ 19) बहुभाषिक भाऊ बाबा वंजारी संघ 20) लोहार गाडीलोहार समाज विकास संस्था 21) यंशवत आर्मी 22) ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक 23) महिला शक्ती आघाडी 24) भारत जनसंग्राम पार्टी 25) आम जनता पार्टी 26) समाज सेवा पार्टी यांच्यासह अनेक संस्था संघटना या तिसरी राजकीय आघाडीमध्ये सहभागी झाल्या असल्याचेही कोकरे म्हणाले.
संविधानाला अभिप्रेत असलेला समाज निर्माण करणे. भारताची धर्म निरपेक्ष राष्ट्र म्हणून ओळख निर्माण करणे. देश पातळीवर जातीय जनगणना केली जाईल. अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधित कायदा (ऑट्रासिटी कायद्याचे) सुरक्षा कवच एन.टी, व्ही.जे.एन.टी, एस. बी. सी. आणि संपुर्ण ओबीसी समाजला लागु करणार. अल्पसंख्याकचा दर्जा हिंदु धर्मातील जे जाती जमाती अल्पसंख्याक कायद्याच्या निकष पुर्ण करतात त्यांना अल्पसंख्याक म्हणून दर्जा देण्यात येईल. इलेट्रीक व्होटींग मशीन (EVM) बंद करून मतपत्रिके द्वारा मतदान घेतले जाईल. मुस्लिम ओबीसी वर्ग जाती जमातीला 5 टक्के आरक्षण ठेवले जाईल. जे खोटे जातीचे प्रमाणपत्र घेऊन आरक्षण घेतलेले असतील किंवा घेत असतील त्यांना कायद्यात कडक शिक्षेची तरतुद केली जाईल. अशा प्रमुख मुद्यांवर ही आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.
तिसरी राजकीय आघाडीची लोकसभा निवडणुका - 2024 करीता पहिली यादी यावेळी जाहिर करण्यात आली. ज्यामध्ये लोक स्वराज्य पार्टी 7 जागा, लोकराज्य जनता पार्टी 2 जागा, सुराज्य सेना 2 जागा, समता पार्टी 7 जागा, ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडिया 3 जागा, न्यु राष्ट्रीय समाज पार्टी 4 जागा, मुस्लिम सेवा संघ 2 जागा, राष्ट्रमाता अहिल्यादेवी समाज परिवर्तन आघाडी 1 जागा, राष्ट्र निर्माण पार्टी 3 जागा, भारत जनसंग्राम पार्टी 1 जागा, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक 3 जागा, प्रजा सुराज्य पक्ष 4 जागा अशा तऱ्हेने अनेक पक्षांना जागावाटप करण्यात आल्याची माहितीही कोकरे यांनी दिली.
0 टिप्पण्या