Top Post Ad

डाॅ संजीव नाईक यांच्या वतीने व श्रीराम फाऊंडेशनतर्फे ठाण्यात संगीतमय श्रीराम कथा


 अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या २२ जाने. रोजी होणाऱ्या प्रतिष्ठापणा कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाण्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्यातील  श्रीराम फाऊडेशन व डाॅ संजीव नाईक यांच्या वतीने कासारवडवली येथील श्रीराम मंदिर प्रांगणात शनिवार दि.१३ ते शुक्रवार दि. १९ जाने. पर्यंत सात दिवस संगीतमय श्रीराम कथा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. अशी माहिती श्रीराम फाऊंडेशनचे अध्यक्ष राम ठाकूर यांनी दिली.

  अयोध्येतील प्रभु श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त अवघे ठाणे राममय बनले आहे. यांच्या वतीने  डाॅ संजीव नाईक व श्रीराम फाऊडेशन मार्फत घोडबंदर रोडवरील कासारवडवली येथील श्रीराम मंदिर प्रांगणात भव्य राम उत्सव होत आहे. या उपक्रमात रूद्र प्रतिष्ठान आणि जय फाउंडेशन संस्थापक व अध्यक्ष एडवोकेट धनंजय सिंह दीपक उपाध्ये, के. पी. मिश्रा, बी. के. तिवारी, अंजली शुक्ला, अरुण शुक्ला, रतन मिश्रा आदींचा सहभाग आहे. शनिवार १३ जानेवारी रोजी सकाळी १० ते १२ या कालावधीत भव्य कलश यात्रा निघणार असुन त्यानंतर राम चरित्र शिव विवाह कार्यक्रम होईल. रविवार १४ जाने. रामलीला, सोमवार १५ जाने. रोजी श्रीराम विवाह, मंगळवार १६ जाने.रोजी राम वनवास,भरत चरित्र, बुधवार १७ जाने.रोजी सीता हरण तसेच हनुमानजी द्वारा सीता स्तोत्र, गुरुवार १८ जाने.रोजी रावण वध व शंकरकांड तर शुक्रवार १९ जानेवारी सप्तम दिवशी श्रीराम राज्यभिषेक उत्सव आणि भंडारा आयोजीत करण्यात आला आहे.

 दरम्यान, या सात दिवसांच्या संगीतमय महोत्सवात जर कोणा महिला भगिनींना कलश यात्रेत सहभागी व्हायचे असेल, आणि होमावर किंवा सात दिवस पोथी पुजन होणार आहे. त्यामध्ये एक दिवस यजमान म्हणुन बसायचे असल्यास ९३२००१२२०४ /८४५०९११९६४ या नंबरवर संपर्क करून नाव नोंदणी करण्याचे आवाहन आयोजक राम ठाकुर यांनी केले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com