जालन्यातील अंतरावली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीकरिता आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे आंदोलकांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस होता. चार दिवसांपासून मराठा आंदोलक आंदोलन करत होते. यावेळी आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली. जरांगे यांना उपचार घेण्याची विनंती करण्यात आली. गुरुवारी रात्री जरांगे यांना उपचारासाठी नेण्यात आले. यावेळी पोलिसांची जादा कुमक मागवण्यात आली. यानंतर 5 ते 10 हजार कार्यकर्ते येथे जमा झाले. शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असतानाच या आंदोलनाला हिंसक वळण लागले. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यात काही आंदोलक आणि पोलीसही जखमी झाले आहेत. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जमुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. अंतरावली सराटी येथे पोलीस, ग्रामस्थ, आंदोलक यांचात वाद पेटला आहे. गावकऱ्यांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आला. आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी पोलिसांच्या व्हॅन गावाबाहेर काढल्या.
“हरेगाव प्रकरणात गायकवाड नावाचा विद्यार्थी आहे. तो गरीब मराठ्यांमधील विद्यार्थी आहे. त्यालाही उलटं टांगून मारलं आहे. त्याच्याही मनात त्या तिघांसारखीच भीती आहे. तो मला म्हणत होता की, माझ्या आई-बापाला मारलं जाईल. इथल्या गब्बर झालेल्या मराठ्यांची युती ब्राह्मणशाहीशी झाली आहे हे लक्षात घ्यायला हवं. खालच्या कोर्टाने गरीब मराठ्याला आरक्षण दिलं. ते आरक्षण कुणाच्या राजवटीत गेलं. गरीब मराठ्यांनी विचार केला पाहिजे. त्यावेळी केंद्रात राज्य कुणाचं होतं. तेव्हा सत्तेत भाजपा होता. इथल्या गरीब मराठ्याकडे श्रीमंत मराठा बघायला तयार नाही, त्याला उमेदवारी द्यायला तयार नाही, श्रीमंत मराठे गरीब मराठ्याला ग्रामपंचायत निवडणुकीतही उभं करायला तयार नाहीत. त्याला आरक्षणाच्या माध्यमातून फायदा होणार होता. मात्र, त्याच्यासमोरील ताट कुणी काढलं. असं असताना आज तोंडदेखलेपणा केला जातो. आज हेच श्रीमंत मराठे सांगतात की, आम्ही गरीब मराठ्यांसाठी लढतो. जेव्हा लढायचं होतं तेव्हा हे श्रीमंत मराठा का लढले नाहीत. आता सगळं संपलं आहे, तेव्हा हे सांगतात लढा. माझं शरद पवार आणि या सगळ्या मंडळींना आव्हान आहे की, त्यांनी गरीब मराठ्यांचा प्रश्न कोर्टाच्या ऐरणीवर कसा आणणार हे आधी सांगा. केवळ आम्ही लढणार, आम्ही लढणार सांगत आहेत. पाच वर्षे झालीत. मी गरीब मराठ्यांना आवाहन करतो की, त्यांनी वंचितबरोबर यावं. गरीब मराठ्यांचा प्रश्न पुन्हा राज्यपालांमार्फत कोर्टाच्यासमोर घेऊन जाऊ शकतो,”- वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (राहुरी )
मुळात भाजपाला आरक्षण द्यायचेच नाही म्हणून ते चालढकल करत आहेत. मविआचे सरकार असताना हेच फडणवीस मराठा समाजाला फक्त मीच आरक्षण देऊ शकतो अशी राणा भिमदेवी थाटात घोषणा करत होते पण दीड वर्ष झाले आरक्षणावर चकार शब्द काढलेला नाही. फडणवीस व भाजपा खोटारडे आहेत, त्यांनी मराठा, धनगर समाजाला आरक्षणाचे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा गुंता वाढवण्यास फडणवीस व मोदी सरकारच जबाबदार आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर ५० टक्क्यांची मर्यादा काढण्याचा निर्णय केंद्र सरकारला घ्यावा लागेल पण केंद्रातील भाजपाचे सरकार त्यासाठी काहीच हालचाल करत नाही. राज्यात सत्तेवर असलेल्या तिन्ही पक्षातील कोणाचीही मोदींसमोर बोलण्याची हिम्मत नाही त्यामुळे केवळ समिती, बैठका व चर्चेचे गाजर दाखवून चालढकल केली जात आहे. आजच्या घटनेचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत असून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे - नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र
महाराष्ट्रात स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन करणंही अशक्य झालंय, दडपशाही करणारं मिंधे भाजपा सरकार युवकांच्या जीवावर उठलंय. जालन्यात आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या समुदायावर झालेला लाठी हल्ला हा संतापजनक आहे. लोकशाही पद्धती चिरडून हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल सुरु आहे,' पहिला हल्ला वारकऱ्यांवर, आता मराठा समाजातील तरुणांवर. मिंधे-भाजपा राजवट म्हणजे सध्याची मुघलाईच! आपलं राज्य लुटायचं, दिल्लीसमोर राज्य झुकवायचं, सरकारं पाडायची. निर्लज्जपणाचा कळस गाठलाय! पण महाराष्ट्र फार काळ हे सहन करणार नाही, परिवर्तन अटळ आहे,' - आमदार आदित्य ठाकरे
. 'पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीहल्ला करण्यात आला आहे. एकदा चर्चा केल्यानंतर बळाचा वापर करण्याची आवश्यकता नव्हती. मात्र हल्ली सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे कोणतेही प्रश्न असले आणि त्याचे उत्तर न मिळाल्याने रस्त्यावर आले तर बळाचा वापर करावा, अशी सूचना गृहमंत्र्यांकडून असावी, राज्याच्या गृहमंत्र्यांच्या मनात काही घटकांबद्दलची जी भावना आहे ती पोलिसांच्या कृतीतून दिसत असते. हे चित्र आता जालन्यात दिसलं आहे. यात पोलिसांना काय दोष द्यायचा? पोलिसांना वरून अशा सूचना आल्या आणि त्यांनी कामगिरी केली. यामुळे पोलीस आणि तरुणांमध्ये कारण नसताना कटुता वाढली आहे. परंतु याची पूर्ण जबाबदारी राज्य सरकार आणि गृहखात्याची जबाबदारी सांभाळणाऱ्यांची आहे - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार
'मराठा आरक्षणाबाबत सर्वच राजकीय पक्षांनी समाजाच्या तोंडाला पाने पुसली आहेत. आरक्षणाची मागणी लावून धरणाऱ्या माझ्या भावा बहिणींना लाठ्या काठ्या खाण्याची वेळ या सरकारने आणली आहे. मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर सरकारने केलेल्या लाठीहल्ल्याचा मी निषेध करतो. माझा राज्य सरकारला खडा सवाल आहे की, मराठा आरक्षण कसे देणार हे तातडीने स्पष्ट करा, नाहीतर असा उद्रेक होतच राहणार. दुसरीकडे माझी मराठा समाज बांधवांना अशी विनंती आहे की, आरक्षणाची मागणी आपण ज्या शांततामय आणि कायदेशीर मार्गाने लावून धरली होती तशीच ती नेटाने लावून धरु आणि त्यात आपण तसूभरही मागे हटणार नाही. मराठा आरक्षणाचे आंदोलन आपल्याला शांततेनेच करायचे आहे. या आंदोलनाला वावगे वळण लागता कामा नये असे माझे आवाहन आहे,' - मराठा आरक्षणाची कायदेशीर लढाई लढणाऱे विनोद पाटील
अनेदा मराठा आंदोलांकसह बैठका घेतल्या आहेत. अनेकवेळा चर्चा झाल्या आहेत. कोर्टाचा निकाल लागेपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या जातील असे आश्वासन देण्यात आले आहे. सरकार मराठा समाजाच्या पाठीशी आहे. अनेक सवलती तसेच मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या मान्य करण्याबाबात सरकार सकारात्मक आहे. पोलिसांनी लाठीचार्ज का केला हे माहित नाही. आंदोलकांनी शांतेतेच्या मार्गाने जावे. - कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई
मागणी नसताना एका दिवसात 10% आरक्षण, वाचा...https://www.prajasattakjanata.page/2021/05/10.html
0 टिप्पण्या