उघड्या डोळ्यांचे निरिक्षण :- शेख सुभान अली
मराठा आरक्षण अमान्य...:- सर संघचालक मोहन भागवत (RSS )
जर सरसंघचालक मराठा आरक्षण विरोधात असेल तर भाजपा मराठा आरक्षणाच्या समर्थनात असेल काय? भाजपा केंद्र सरकार 102 घटना दुरूस्ती करून राज्य सरकारचे मागास जातींना मागास वर्गात समावेश करण्याचे अधिकार संपविते... मग फडणवीस सरकार गायकवाड आयोग स्थापन करते .....(अधिकार नसताना) फडणवीस यांच्याच माणसाकडून हायकोर्टोत आव्हाण देण्यात येते ... (मराठा आरक्षणाला विरोध करणारे सदावर्ते, तिरोडकर आणि श्रीहरि अणे हे सगळे फडनवीसांचे निकटवर्तीय आहेत हा निव्वळ योगायोग आहे का ?) फडणवीस मुख्यमंत्री असतानाच विशेष हायकोर्टात आरक्षणाच्या समर्थनात निर्णय येतो...फडणवीस ने आरक्षण दिल्याचा गवगंवा होतो... संपुर्ण महाराष्ट्रात फडणवीसांचे पोस्टर लागतात....
(44 मराठा बांधवांच्या बलीदानाची घोर थट्टा होते..)
मग फडणवीस प्रणीत मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हाण देण्यात येते....फडणवीस ची सरकार जाते ...फार प्रयत्न करून ही पुन्हा मुख्यमंत्री होता येत नाही...मग अचानक काल सर्वोच्च न्यायलयाचा मराठा आरक्षण रद्द केल्याचा निर्णय येतो... ( कोरोना माहामारीत हाहाकार माजलेला असताना) लगेच फडणवीस व मंडळी पुन्हा राज्य सरकार आरक्षणाची बाजू मांडण्यास कमी पडले म्हणून बोंबा मारतयं...
मला एक समजत नाही...राज्य सरकार कुठे कमी पडले? कायदेशीर बाजू काय असायला हवी होती? फडणवीस यांनी आपला वकिल किंवा केंद्र सरकारचे कायदे तज्ञ का मिळवुन दिले नाहीत...? फडणवीस एक वकिल आहेत मग ते का नाही सांगत कि कायदेशीर रित्या मराठा आरक्षण कसे मिळू शकते...विरोधी पक्ष नेता असताना त्यांनी सरकारला का नाही सांगितले कायदेशीर बाजू काय असावी..मग ते बाहेर समाजाला /मीडिया वर का बरं बोलत असतील? सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड आयोगाला मान्य केले का? नाही केले तर का नाही?
जर राज्य सरकारला १०२ घटना दूरूस्ती नंतर अधिकारच नव्हते तर यांचा अर्थ फडणवीसने माहीत असताना मराठा समाजाच्या ४४ बांधवांची भावणीक करून हत्याच केली म्हणावे लागेल...नंतर अवैधानिक पद्धतीने जे माहीत होते पुढे टिकणार नाही असे आरक्षण देऊन मराठा समाजाच्या भावणेशी क्रूर थट्टा केली....आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायधीश आपल्यात नाहीत... परंतू जस्टीस पी.बी.सावंत साहेबांनी त्याच वेळेस सांगितले होते फडणवीस ने मराठा समाजाला धोका दिला आहे ...परंतू मराठा समाजाच्या काही अनभिज्ञ मंडळीनी आपल्या समाजाच्या जगात नैतिक,प्रामाणिक तत्वनिष्ठ म्हणून प्रतिमा असलेल्या जस्टीस सावंत साहेबांनाच वेड्यात काढले ...व फडणवीस यांचा कृतज्ञतेचे कार्यक्रय घेऊ लागला ...
बांधवांनी भूतकाळातील घटनांचे चिंतन करून पुढील दिशा ठरवावी...
खालील घटनाक्रम पहा ...
गायकवाड आयोग कोणी नेमला.?-फडणवीस
कायदा कोणी केला.?-फडणवीस
उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकील कोणी नेमले.? - फडणवीस
१०२ वी घटनादुरुस्ती कोणी केली.?
प्रधानमंत्री मोदी साहेब
राज्यांचे आरक्षण देण्याचे अधिकार कोणी संपुष्टात आणले.? प्रधानमंत्री मोदी साहेब
मग आरक्षण रद्द झाले त्याला जबाबदार कोण ?
१) फडणवीस म्हणतात राज्यसरकार मराठा आरक्षण प्रकरणात निर्णय घेऊ शकत नाही..ते न्यायालयाच घेऊ शकते... २) न्यायालयात निर्णय कौण देतो तर न्यायधीश.....3) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायधीश पत्रकार परिषद घेऊन जनतेला विनंती करतात कि लोकतंत्र वाचवा...(आता कोणा पासुन वाचवा म्हणत आहेत, हे आपण समजलेच अससाल) 4 ) जस्टिस लोया प्रकरण तर आठवतयं ना ? न्यायाधिशाने प्रमाणिक निर्णय देण्याचे स्पष्ट केल्यावर काय झाले? जर असेच न्यायधीशांनी सत्य निर्णय घेतल्यावर जिव जात असेल तर न्यायधीश हा धोका पत्करतील का?
कोरोना काळात लाखोंच्या संख्येत मजूर हजारो किलोमीटर पायपीट करत असताना.. न्यायालयाने म्हंटले होते की आम्हाला तर रस्त्यावर मजूर दिसत नाही...ही गरीबांची/मजूरांची थट्टा नव्हती का? प.बंगाल मध्ये ममता बनर्जी स्वताच्या मतदार संघात आधी 1200 मतांनी विजयी घोषित झाल्या.सर्व प्रसार माध्यामांनी दाखवले सुद्धा ,इतकेच काय तर राज्यपालांनी फोन लावून शुभेच्छा ही दिल्या आणी नंतर अचानक सागण्यात येते कि नाही नाही ममता बनर्जी तर पराभूत झाल्या आहेत..जेव्हा ममता बैनर्जी फेर मत मोजनी करण्याचे सांगतात तर रिटर्निंग अधिकारी म्हणतो माझी लहान मुलगी आहे ,फेरमत मोजनी केली तर मला मारून टाकतील .मला आत्महत्या केल्या शिवाय पर्यात राहणार नाही ...
हे काय आहे .....
जी डोकि /सत्ता न्यायालयाचा आणि निवडणूक आयोगाचा असा अंसविधानिक वापर करत आहेत ते सहज उच्च न्यायालयात मिळालेले मराठा आरक्षण दबाव टाकून बदलू शकतात..केंद्रातील भाजप सरकारने राज्य सरकारला मराठा आरक्षण प्रश्नी कसलेही सहकार्य केले नाही. राज्य सरकारच्या लीगल टीमला केंद्र सरकारच्या वकीलाने वेळोवेळी भेट नाकारली. हे सर्वकाही फडणवीसांच्या सांगण्यावरुन घडले. सुप्रीम कोर्टात केंद्राने मराठा आरक्षण विरोधी भूमिका घेतली. खा.स़भाजी राजे भोसले यांनी स्पष्ट केले कि महाराष्ट्र सरकार ने पुर्ण प्रमाणिक पणे प्रयत्न केले ..राज्याचे मुख्यमंत्री यांनी प्रधान मंत्री यांना हाथ जोडले कि तुम्हीं संसदेत ५०% मर्यादा उठवण्याचा कायदा करा ...जे शक्य आहे.....आता जर खरच फडणवीस यांच्यात प्रमाणिक पणा असेल तर त्यांनी स्वत: राज्याचे मुख्यमंत्री व शिष्ठमंडळ घेऊन केंद्र सरकारला कायदा करायला भाग पाडावे.....
जर भाजपा केंद्र सरकार 370 कायदा रद्द करूं शकते? तलाकचा कायदा करूं शकते ..मागणी नसताना एका दिवसात 10%सवर्णांना आरक्षण देऊ शकते ...मग मराठा समाजाला का नाही..? या प्रश्नाचे उत्तर जेव्हा मराठा बांधवांना उमजेल तेव्हा मराठा समाज जागृत व उन्नत होईल..परंतू मोहन भागवत यांच्या विरोधात फडणवीस जातील अशी अपेक्षा करणे मुर्ख पणाचे ठरेल.... सर्व सामान्य मराठा समाजाला माझी कळकळीची विनंती तुम्ही जितके भावनिक झालात तितक्या राजकीय भाकरी भाजल्या गेल्या...काही नेते आणि भाजपा IT सेल मराठा समाजत निरशा पसरवण्याचे प्रयत्न करीत आहे...आपण छत्रपतींचे वारस आहात मित्र व शत्रू ओळख नसता तुम्ही हे युद्ध कधीही जिंकू शकणार नाही....अनेक वर्षापासून मराठा समाजाला इतर जाती पासून जाणीव पुर्वक दुर करण्याचे षड्यंत्र करण्यात येत आहे...
मराठा × दलीत ,मराठा × ओबिसी असा वाद काही सहजा सहजी निर्माण नाही झाला एका विशेष वर्गाने अथक परिश्रम केले आहे यासाठी...मराठा क्रांती मोर्चा मध्ये मुस्लिम समाजाने पुढाकार घेऊन समर्थन व मदत केल्याने या दो समाजात विश्वासाचे नाते तरी निर्माण झाले आहे परंतू मराठा समजाला आपले संविधानिक अधिकार प्राप्त करण्यासाठी इतर समाजाला विश्वासात घेऊनच पुढे जायचे आहे....माझी सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की आपापसात दोषारोप करून नका..आज कोरोना महामारीत आधीच समाज बेरोजगारी ,अर्थिक नुकसानीला तोंड देत आहे ..अशा परिस्थितीत आपण कोणाच्या राजकारणाचे भांडवल होऊं नये..जे नेते मागील वर्ष भरापासुन अर्थिक अडचणीत असताना गरीब मराठा समाजाच्या मदतीसाठी रस्त्यावर आले नाहीत आज जर ते आव्हाण करीत असतील कि आम्हाला समाजाची चिंता आहे यावर कितपत विश्वास ठेवावा...हे आपणच ठरवा...
मि सर्व सामान्य तरूणांना भावणीक करून त्यांचा बळी घेण्याच्या तीव्र विरोधात आहे...मराठा बांधवांनो आपण महाराष्ट्रात मला सामाजिक एकात्मता निर्माण करून दंगा मुक्त महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी खुप मौलाचे सहकार्य केले आहे....मि पुनः विनंती करतोय भावनीक होऊं नका,निराश होऊं नका एकत्र येऊन स़घर्ष करूया फक्त आरक्षणच नाही तर गुजरात्यांच्या तावडीतुन मुंबई आणि देश ही मुक्त करूया...आहे त्या परिस्थितीत आहे त्या स़साधनाचा वापर करून यश संपादन करने म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज...:
शेख सुभान अली
अध्यक्ष:-दंगामुक्त महाराष्ट्र अभियान
0 टिप्पण्या