अक्षय भालेरावचा जातीयवादी गावगुंडांनी अतिशय निर्घृणपणे खून केला. मात्र सध्या सोशलमिडीयात अक्षय विरोधात चुकीचे बदनामीकारक स्टेटमेंट फेसबुक अकाऊंटवरून व्हायरल केल्या जात आहे. याची नोंद घेण्यात आली आहे. बोंडार येथे दिवंगत अक्षयच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी उपस्थित कुटुंबीय, गावकरी, कार्यकर्त्यांना संबोधित करताना मा बाळासाहेबांनी सांगितले की, अक्षय भालेराव यांच्या मारेकऱ्यांना वाचवणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांना सुद्धा सहआरोपी केलं पाहिजे. तसेच जे अक्षयबाबत बदनामीकारक मजकुर सोशलमिडीयात लिहीत आहेत त्यांची चौकशी पोलीस जरूर करतील. कारण ते अक्षयला ओळखत असावेत, त्यांचा या खूनाशी संबंध आहे म्हणूनच ते लिहीत असावेत.म्हणून त्यांची सुध्दा सखोल चौकशी करण्यात येईल.
मागे दुर्गादेवी मिरवणुकीत आक्षयवर हल्ला करण्यात आला होता त्याने शिताफीने समोरच्या व्यक्तीच्या हातातील खंजीर हिसकावून घेतला आणि स्वसंरक्षणार्थ फिरवला म्हणून तो वाचला. शूटिंग करणाऱ्याने अक्षयच्या हातात खंजीर गेल्यावर शूटिंग केले आधीचे शूटिंग नाही केले. आता हाच व्हिडिओ त्याच्या विरोधात वापरला जात आहे.संभाजी ब्रिगेड असो वा इतर मराठा संघटना यांना आव्हाहन करतोय कि जातभाई म्हणून जर आरोपींना पाठीशी घालत असाल तर याद ठेवले जाईल !आंबेडकरी तरुण आणि समाज कधीच चुकीला माफी देत नाही ! गावात मराठा समाजातील तरुण नंग्या तलवारी, कोयते, खंजर घेऊन मिरवणूक काढतात ! शिवाय आरोपीपैकी काही जण वेल्डिंग दुकानात अवैध्य हत्यार बनवतात याची खबर गावच्या पोलिस पाटील व इतर मंडळींना होती त्यांनी वारंवार आरोपींना पाठीशी का घातले ?एक माणूस मारला जातोय तरीही जातभाई म्हणून आरोपींच्या पाठीशी उभं रहायचं हे खैरलांजी, खर्डा आणि आज अक्षयच्या घटनेतही दिसतेय !- प्रसाद देठे (Ambedkarite Squad)
मी समक्ष पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे हजर राहून विचारले वरून जबाब देतो की, मी परिवारासह वरील ठिकाणी राहत आहे.मी माझा मयत झालेला भाऊ अक्षय तसेच अन्य भाऊ गौतम आणि अजय, आई वंदना व वडील श्रावण यांचेसह राहतो. सर्व जण मोल मजुरी करून जगतात. आज आमचे गावातील मराठा समाजातील नारायण विश्वनाथ तिडके याचे लग्न बामणी येथे झाल्यावर त्याने बोंढार हवेली गावात वऱ्हाडासह येऊन सायंकाळी वरात काढली होती. त्यात त्याने डी. जे. लावून डान्स करत करत मुख्य रस्त्याने हातात तलवार, खंजर, लाठ्या-काठ्या घेऊन ओरडत ओरडत चाललेले होते. त्या दरम्यान विठ्ठल तिडके याचे घरासमोरील कामाजी तिडके यांच्या दुकानावर मी व माझा भाऊ अक्षय श्रावण भालेराव आम्ही किराणा सामान आणण्यासाठी गेलो होतो. तेथे लाईटचा लख्ख उजेड होता. सायंकाळी अंदाजे साडे सात वाजण्याची वेळ असावी. आम्हास तेथे बघून संतोष संजय तिडके हा मोठ मोठयाने ओरडून आम्हाला जातीवरुन शिव्या देवून, यांना तर जीव मारलं पाहिजे.. गावात भीम जयंती काढता का? असे मोठ्याने म्हणत होता. त्यानंतर कृष्णा गोविंद तिडके, निळकंठ रमेश तिडके, नारायण विश्वनाथ तिडके, शिवाजी दिगंबर तिडके या सर्वांनी लाठ्या-काठ्यांनी व लाथाबुक्यांनी माझ्या भावास मारहाण केली. त्यानंतर वरील सर्वांनी माझ्या भावाचे हात व पाय धरून ठेवले आणि त्यातील संतोष म्हणाला- दत्ता खतम करुन टाक याला...
तेव्हा संतोष व दत्ता यांनी त्यांच्या हातात असणाऱ्या खंजरने माझ्या भावाच्या पोटात सपासप वार केले. तेव्हा माझा भाऊ मेलो-मेलो वाचवा वाचवा... असे म्हणत होता. तेव्हा मी माझ्या भावाला वाचविण्यासाठी मध्ये पडलो असता तेथे असलेले महादू गोविंद तिडके, बाबुराव सोनाजी तिडके व बालाजी मुंगल या सगळ्यांनी 'खतम करुन टाका', असे म्हणत मलाही लाथा बुक्यांनी मारहाण केली. तेव्हा दत्ता विश्वनाथ तिडके याने त्याचे हातात असलेल्या खंजीरने माझ्या डाव्या दंडावर वार केला. त्यात मी जखमी होऊन माझे रक्त वाहू लागले. त्यानंतर वरील सर्वांनी एकत्र येऊन आमचे बौद्ध वस्तीवर जोरदार दगडफेक केली. माझी आई वंदनाने माझ्या लेकरांना सोडा असं म्हणत विनवणी केली. पण अशाही परिस्थितीत महादु गोविंद तिडके, बाबुराव सोनाजी तिडके यांनी लाठ्या-काठ्या व दगडाने माझ्या आईस मारहाण केली. मी यातील सर्व लोकांना प्रत्यक्ष माझे भावावर, आईवर व माझेवर खंजर, लाठ्या-काठ्या व दगडाने हल्ला करुन खून करताना पाहिले आहे. मी वरील सर्वांना ओळखतो. मी वरील सर्वांना माझे भावाला मारु नका, त्याला सोडा अशी अनेकदा विनंती केली. तेव्हा या महाराला आता सोडून उपयोग नाही, असे म्हणून वरील सर्वांनी सामूहिकपणे जोरदार प्राणघातक हल्ला करुन माझ्या भावाचा निर्घृण खून केला असून मलाही खंजरचा वार करून जखमी केलेले आहे. यावेळी आम्हास वाचवण्यासाठी आमचे मदतीला निलेश सुरेश भालेराव, संदेश सुरेश भालेराव, धम्मानंद चांगोजी भालेराव आले व त्यांनी सोडवा सोडव केली. वरील सर्वांविरोधात माझी कायदेशीर तक्रार आहे.
नोट:-अक्षय भालेरावच्या भावाचा जवाब!
व्यवसाय-टेन्ट हाऊस मजूर
रा. बोंडार हवेली ता. जि. नांदेड.
------------------------------------------------
नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली येथील अक्षय भालेराव हत्या प्रकरणात शिवसेना (शिंदे गट ) जिल्हाप्रमुख आनंद बोंडारकर यांचा हात असल्याचा गंभीर आरोप भीम आर्मी या संघटनेने केला आहे ईतर आरोपीसोबत बोंडारकर यांना देखील या प्रकरणात आरोपी करण्यात यावे अशी मागणी या संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देवून करण्यात आली आहे . सदर प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात ९ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ७ आरोपी अटकेत आहेत सदर ९ आरोपीसोबतच शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद बोंडारकर हे या प्रकरणातील मास्टर माइंड असल्याने त्यानादेखील आरोपी करावे भालेराव यांच्या कुटुंबीयास तातडीने नुकसान भरपाई म्हणून अर्थिक मदत देण्यात यावी. भालेरावचा भाऊ जखमी आकाश यास शासकीय नोकरी देण्यात यावी.भालेराव प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे.सरकारी वकीलाची नियुक्ती करण्यात यावी भालेराव यांच्या कुटुंबास तात्काळ कायमस्वरुपी पोलीस संरक्षण देण्यात यावे. प्रत्येक ग्रामीण भागातील बौद्ध वस्तीत पोलीस चौकीची स्थापना करण्यात यावी.सर्व आरोपींची मालमत्ता जप्त करण्यात यावी.कार्यकर्त्याचा समावेश असलेल्या अनुसूचित जाती जमाती आयोगा मार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आशा मागण्या भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी केली आहे
नांदेड जिल्हा आणि अत्याचार हे समीकरण बनले असून, मागील दहा वर्षांत अत्याचाराच्या वारंवार घटना घडल्या. हदगाव तालुक्याने तर कळस गाठला. काँग्रेस नेते अशोक चव्हाण हेतूतः डोळेझाक करत आहेत. २०११ मध्ये नांदेडमध्ये सर्वाधिक दारूच्या भट्ट्या आढळल्या. जनतेचा महानायक मध्ये आम्ही " दारूत सुखाने नांदे- ड " असे शीर्षक असलेला सणसणीत अग्रलेख लिहिला. तथापि नांदेडमधील जातीय तथा धर्मप्रामाण्याची सूज मात्र आजही कायम आहे.२०१० मध्ये हदगाव येथे मातंग समाजावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. शेवटी कंटाळून मातंग समाजातील २५० मातंगांनी धर्मबदल केला. बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्याचा आजही राग कायम आहे. - गुणाजी काजिर्डेकर
0 टिप्पण्या