Top Post Ad

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेकडून विद्यार्थ्यांची फसवणूक

 


 अभ्यासक्रम पूर्ण न करताच परीक्षेचे वेळापत्रक देऊन ते विद्यार्थ्यांना जबरदस्तीने थोपवले जात आहे. केवळ 20% पेक्षाही कमी अभ्यासक्रम पूर्ण करून  परीक्षेत बसवण्याची सक्ती विद्यार्थ्यांवर  केली जात असल्याचा आरोप टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडुन करण्यात आला आहे.

टाटा सामाजिक विज्ञान संस्था येथे स्कुल ऑफ व्होकेशनल एज्यूकेशन विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2022- 23 प्रवेशित असून त्याकरिता साठ हजार अधिक ,अनामत रक्कम पाच हजार रुपये (जे घेणे शासन निर्णय च्या विरोधात आहे ),अधिक परीक्षा फीस 5000  रुपये अशे एकूण 70 हजार रुपये फी च्या स्वरूपात घेतली जाते .सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयात प्रवेश  घेण्यासाठी करण्यात आलेल्या जाहिरात व समक्ष समुपदेशन केल्यानंतर तसेच माहिती पुस्तिकामध्ये दिलेल्या सविस्तर माहिती नंतर जेव्हा विद्यार्थी प्रवेशित झाले तेव्हा प्रत्यक्षात मात्र तसे काहीच नव्हते थेरी आणि प्रॅक्टिकल चे एकूण 30 क्रेडिटचे 720 तास होणे अपेक्षित होते 

परंतु एकूण सहा महिन्यात केवळ 122 तासांची शिकवणे किंवा प्रॅक्टिकल झालेले आहेत आणि आता अभ्यासक्रम पूर्ण न करताच परीक्षेचे वेळापत्रक दिले असून ते विद्यार्थ्यांना जबरदस्तीने थोपवले जात आहे केवळ 20% पेक्षाही कमी अभ्यासक्रम पूर्ण करून  परीक्षेत बसवण्याची सक्ती केली जात आहे . असे येथील विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

"कोर्स कॅरिकुलम बघून आणि तुमच्या समुपदेशनाला भूलून प्रवेश घेतला परंतु आमच्या पदरी निराशा आली आज आमचे भरलेले पैसे वाया गेलेले आहेत त्याचबरोबर अमूल्य वेळ सुद्धा वाया गेला आहे. शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करूनच परीक्षा घ्यावी अन्यथा आम्हाला आमची पूर्ण फीज आणि एक वर्षाची नुकसान भरपाई देण्यात यावी." अशी मागणी विद्यार्थी प्रकाश साळवे ,अफताफ अन्सारी आणि इम्रान अहमद यांनि .टाटा इन्स्टिट्यूट च्या संचालक प्रा.शालिनी भारत यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

"आम्ही यासंदर्भात अनेक वेळा डीन मधूश्री शेखर याना प्रत्यक्ष भेटून आणि मेल द्वारे तक्रार केली परंतु त्याचे निवारण न झाल्याने आम्ही संचालक यांच्याकडे दाद मागितली -असे विद्यार्थी अफताफ अन्सारी यांनी सांगितले.

सदरील तक्रारींवर कार्यवाही न केल्यास आपणास दफतर दिरंगाई कायद्यानुसार दोषी मानून योग्य ती कायदेशीर पावले उचलले जातील. त्याचबरोबर ग्राहक संरक्षण कायद्याच्या सेक्शन सहा दोन नुसार सेवेत कमकरता आणि खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याबद्दल मान्य ग्राहक संरक्षण न्यायालयात खटला दाखल करण्यात येईल याची नोंद असावी असा इशाराही दिला आहे .

त्याबरोबर विद्यार्थ्यांनि विविध विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी यांच्याकडे धाव घेतली आहे. नॅशनल स्टुडंट्स युनियनचे ऍड दादाराव नांगरे म्हणाले की आम्ही यासंदर्भात टाटा सामाजिक विज्ञान संस्था येथे स्कुल ऑफ व्होकेशनल एज्यूकेशन येथे प्रत्यक्ष तक्रार केली आहे .आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी असून विद्यार्थ्यांची फावणूक खपवून घेतली जाणार नाही त्यावर योग्य ती कायदेशीर पाऊले उचलली जातील .


दादाराव नांगरे....नॅशनल स्टुडंट्स युनियन. 7977043372

विद्यार्थी .... प्रकाश साळवे  7972585624

प्रा.शालिनी भारत,...संचालक

02225525202

02225525050

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com