Top Post Ad

सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? - राहूल गांधी अडचणीत


 सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? असे विधान करत खासदार राहूल गांधी यांनी  निवडणुकीच्या प्रचारयात्रेच्या निमित्ताने कोलर येथील प्रसारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर राहुल गांधी यांच्या विरोधात गुजरातमधील मोदी समाजाने मानहानीचा गुन्हा दाखल केला होता,  भाजपाचे माजी आमदार पुनरेश मोदी यांनी सुरत न्यायालयात हा खटला दाखल केला होता.  याप्रकरणी न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवलं असून त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र त्यांना लगेच जामीनही मंजूर करण्यात आला. सुरतमधील सीजेएम न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. 

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या वक्तव्याबाबत मागील आठवड्यात याप्रकरणी सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाच्या सुनावणीवेळी आज राहुल गांधी स्वत: सुरत न्यायालयात हजर होते. यावेळी न्यायालयाने राहुल गांधी यांना काही म्हणणे आहे का अशी विचारणा केली, त्यावर राहुल गांधी म्हणाले, मी नेहमी भ्रष्टाचाराविरोधात बोलतो. मी कोणाच्या विरोधात मुद्दामहून बोललो नाही. यामुळे कोणाला नुकसान झालेले नाही, असे न्यायालयाला सांगितलं   न्यायालयाच्या निर्णयानंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा यांनी ट्वीट करत हल्लाबोल केला आहे. घाबरलेलं सरकार साम, दाम, दंड, भेद वापरून राहुल गांधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. पण, माझ्या भावाला कधी भीती वाटली नाही आणि वाटणारही नाही. सत्य बोलत जगलो आणि सत्य बोलतच राहणार. देशातील जनतेचा आवाज बुलंद करत राहू… करोडो देशवासीयांचं प्रेम राहुल गांधींच्या पाठीशी आहे, असं प्रियंका गांधींनी ट्वीट करत म्हटलं.

मानहानीच्या या प्रकरणात दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनाण्यात आल्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी जाणार अशी चर्चा सुरू करण्यात आली आहे. सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सातत्याने बेनकाब करणाऱ्या राहुल गांधी यांचे घटनात्मक लोकप्रतिनिधीपद ऐनकेन प्रकारे काढून घेण्याच्या पवित्र्यात असलेली भाजपायी मंडळी आता खासदारकी काही राहणार नाही, अशी बोंब उठवत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सर्वत्र शहनिषा होत आहे. 

सुरत जिल्हा न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेमुळे राहुल गांधी यांच्या संसद सदस्यत्वावर परिणाम होईल का? हाच सध्या चर्चेचा विषय आहे. ‘मोदी आडनाव’ प्रकरणात सुरत कोर्टाने दिलेल्या या निर्णयामुळे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या अडचणी वाढल्या आहेत, हे नक्की. खरेतर, सुरत जिल्ह्याने राहुल गांधींना गुन्हेगारी मानहानीच्या प्रकरणात दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. मात्र, नंतर राहुल गांधींना कोर्टातून जामीन मिळाला. राहुल गांधींना 30 दिवसांचा जामीन मंजूर करून त्यांना उच्च न्यायालयात या निर्णयाविरुद्ध अपील करण्याची परवानगी सुरत न्यायालयाने दिली आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 499 आणि 500 ​​(मानहानी) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता राहुल गांधींना शिक्षेला स्थगिती मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात जावे लागणार आहे. यासाठी त्यांच्याकडे एक महिन्याचा कालावधी आहे.

ट्रायल कोर्टाने राहुल गांधी यांना गुन्हेगारी मानहानीप्रकरणी दोषी ठरवले आणि त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली. सर्वोच्च न्यायालयाने 10 जुलै 2013 रोजी दिलेल्या ऐतिहासिक निकालानुसार, राहुल गांधी यांना खासदार म्हणून तात्काळ अपात्र ठरवावे, अशी मागणी आता भाजप करणार आहे. 10 जुलै 2013च्या लिली थॉमस विरुद्ध भारत सरकार या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला होता. ‘कोणताही खासदार किंवा आमदार एखाद्या गुन्ह्यासाठी दोषी ठरला आणि त्याला किमान 2 वर्षांचा तुरुंगवास दिला गेल्यास त्यांचे सभागृहाचे सदस्यत्व काढून घ्यायला हवे,’ असे न्यायालयाने म्हटले होते. याचा आधार घेत ही मागणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.

लिली थॉमस खटल्यातील या निकालापूर्वी, खालच्या (ट्रायल), उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायिक प्रक्रिया संपेपर्यंत दोषी खासदार, आमदार यांचे पद कायम राखले जात होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या 10 जुलै 2013 च्या निकालाने ही पूर्वीची स्थिती बदलून टाकली. सुप्रीम कोर्टाच्या 10 जुलै 2013 च्या निकालाने लोकप्रतिनिधी कायद्याचे कलम 8(4) रद्द केले. या कलमामुळे लोकप्रतिनिधींना सुनावली गेलेली शिक्षा ‘असंवैधानिक’ ठरवून त्यांच्या विरोधातील निकालासंदर्भात अपील दाखल करण्यासाठी 3 महिन्यांची मुदत दिली जात होती.

समाजवादी पार्टीचे आमदार अब्दुल्ला आझम खान यांना एका फौजदारी खटल्यात कनिष्ठ न्यायालयाने 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर लगेचच त्यांना उत्तर प्रदेश विधानसभेतून अपात्र ठरवले गेले होते. लोकशाहीत कोणीही कायद्याच्या वर नाही. कायद्यापुढे सर्व समान आहेत, म्हणून राहुल गांधींनाही सपाचे अब्दुल्ला आझम खान यांच्यासारखेच कायद्याचे तत्त्व लागू आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनाही तात्काळ खासदारकी गमवावी लागेल, असा दावा भाजपायी मंडळी करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न  M : 8108658970
click here 👉 Join Our WhatsApp Channel
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com