Top Post Ad

भागवतांच्या शाब्दीक खेळाच्या जाळ्यात फसलेला बहुजन !


ब्राह्मणाचे चरित्र कायम लवचिक आणि अवसरवादी राहिले आहे.या देशात ज्यांची ज्यांची
आक्रमणे झालीत (तसे आर्य ब्राह्मणाने सुद्धा साडे तीन चार हजार वर्षांपूर्वी भारतावर आक्रमण केले आहे.आर्य ब्राहण विदेशी आहेत.) त्यांच्या सोबत सलगी ठेवून त्यांनी आपली सत्ता कायम ठेवली.या देशात पोर्तुगीज, डच, मुस्लिम आणि नंतर इंग्रज आलेत.यांच्यासाठी याच ब्राह्मणांनी पायघड्या अंथरल्यात. 'तुम्ही या, राज्य करा आणि त्या राज्यात कुठेतरी आम्हालाही स्थान द्या.तुम्हीच आमचे मायबाप'. अशी समरसतेची भूमिका घेत त्यांनी लाचारी स्वीकारत आपली बाजू हळूहळू मजबूत केली.आपल्या विकासात जर कोणी येत असेल तर त्याच्या विरोधात शस्त्र उचलण्याचाही त्यांनी कपटी डाव खेळला.हे सिद्ध करण्यासाठी पुष्यमित्र श्रुंग आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णी ही दोन उदाहरणे या ठिकाणी पुरेशी आहेत.हा वर्ग काळानुसार आपले साधन - संसाधन बदलतो,आपला उद्देश नाही.उद्देश पूर्तीसाठी तो काहीही करायला तयार असतो.तो जे करतो त्यामध्ये उद्देशाबरोबरच इतरांसाठी रचलेले षडयंत्र असते, एक जाळे टाकलेले असते.

नुकताच संत रविदास जयंती निमित्त आरएसएसचे संघ संचालक मोहन भागवत यांनी जाती पंडितांनी निर्माण केल्याचे आपल्या भाषणात सांगितले.यावर सोशल मीडिया आणि वृत्तपत्रात नेहमीप्रमाणे चर्चेला उधाण आले.मुळात वृत्तपत्रातील बातम्या ह्या जाणीवपूर्वक पेरल्या जातात.जो सत्ताधारी असतो त्यांच्या त्या बाजूच्या असतात.मीडियाने तटस्थ आणि निर्भीडपणे आपली भूमिका वटवायची असते.मात्र ही नैतिकता आता मीडियासाठी कालबाह्य झालेली आहे.आता ज्याची सत्ता त्याची मीडिया हे सूत्र बनले. भागवतांनी काय बोलावे आणि मीडियाने काय छापावे,हे आधीच ठरलेले असते.याला हवे तर आपण 'पेड न्यूज' म्हणू शकतो.सरकारी जाहिरातीच्या रूपात त्याची परत फेड केली जाते किंवा एखाद्या संपादकाला आमदारकी किंवा खासदारकी दिली जाते. म्हणूनच भागवतांचे कुठलेही भाषण बातमी मूल्य म्हणून बातमीच्या रूपात वर असते. हाच निकष संत रविदास जयंती निमित्त भागवतांनी केलेल्या भाषणाला लावण्यात आला. त्यामुळे ही बातमी देशात सर्वत्र पसरली. मुळात भागवतांना जाती पंडितांनी निर्माण केल्या आहेत याचा शोध आता का लागावा? हा प्रश्न आहे. भागवत ब्राह्मणी धर्मशास्त्राचे अभ्यासक आहेत. या धर्मशास्त्रांत जातीचा उल्लेख पानोपनी आला आहे. त्यांनी त्यांच्याच महापुरुषांची अनेक पुस्तके वाचली आहेत.इतकेच नाही तर त्यांचे आपले संपूर्ण आयुष्य ब्राह्मणांनी निर्माण केलेल्या संघटनांमध्ये खर्ची झालेे.अशा ब्राह्मण वर्गातील शीर्षस्थस्थानी असलेल्या नेतृत्वाला जाती पंडितांनी निर्माण केल्यात, असा शोध उशिरा का लागावा? आपल्या सबंध आयुष्यात आजपर्यंत त्यांनी कोठेही जाती व्यवस्था, वर्णव्यवस्थे बाबत वाचले - ऐकले नाही,असे होत नाही. ही माहिती ब्राह्मणी वर्गातला शेंबडा आणि मंदबुद्धीचा ब्राह्मण सुद्धा सांगू शकतो. भागवतांनी ही नवी खेळी खेळून नवीन व्युहरचना आखली आहे, हे समजणे अतिशय आवश्यक आहे.
मोहन भागवत यांनी ब्राह्मण शब्द न उच्चारता पंडित शब्द उच्चारलेला आहे.पंडित आणि ब्राह्मण हे दोन वेगवेगळे शब्द आहेत.अलीकडे पंडित शब्दापेक्षा ब्राह्मण शब्द जास्त बदनाम झाला आहे. ब्राह्मणी भाषेत पंडिताला ज्ञानी,अभ्यासक असे म्हटले जाते.पंडित हा जातीवाचक शब्द नाही. मात्र ब्राह्मण हा जातीवाचक आहे. भागवतांनी ब्राह्मण हा शब्द उच्चारला असता तर समस्त ब्राह्मण वर्ग दोषी ठरला असता.त्यांच्या या शाब्दिक खेळीला आपण समजले पाहिजे. मोहन भागवत संघ संचालक झाले तेव्हापासून कायम वेगवेगळी विधाने करून चर्चेत आहेत.या पूर्वीच्या संचालकांनी अशी विधाने केली नाहीत असे नाही.त्यांनीही वेगवेगळ्या भूमिका घेतल्याचे नमूद आहे. हिंदू राष्ट्र, धर्म संसद, जातीव्यवस्था आणि धर्म शास्त्रांचा पुरस्कार त्यांनी केला आहे.मात्र त्याकाळी इलेक्ट्रॉनिक मीडिया एवढा प्रचलित नव्हता.आज भागवताचे कोणतही विधान हे प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाची हेडलाईन बनते.
जातिव्यवस्थेच्या संदर्भात भागवत जे बोललेत काय त्यांना त्याचे प्रायश्चित्त करायचे आहे? मुळीच नाही. त्यांना माहित आहे येथील मूलनिवासी बहुजन समाज हा जवळपास साडे सहा हजार जातीत विभागलेला आहे. या सर्वांची टक्केवारी काढली तर ती 90% आहे. सत्तेत यायचे असेल तर जनमत महत्त्वाचे आहे. संख्या महत्त्वाची आहे. ही संख्या आणि जनमत ज्या बाजूचे असेल त्या बाजूची सत्ता.हे भारतीय राजकारणाचे समीकरण आहे.या समीकरणाला अमलात आणायचे असेल तर विखुरलेल्या जातीचे समर्थन अनिवार्य आहे. यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. देशात अलीकडे जी सामाजिक ध्रुवीकरणाची प्रक्रिया सुरू आहे या प्रक्रियेने सामाजिक आंदोलनाचे रूप धारण केलेले आहे.आपला शत्रू कोण, मित्र कोण? याची ओळख आता हळूहळू लोकांना होऊ लागली आहे. याचा धसका जसा प्रस्थापित राजकारण्यांनी घेतला तसाच आर्य ब्राह्मणांनी सुद्धा घेतला आहे.कारण या ध्रुवीकरणाचा फायदा बहुजन समाजाला होत असून आर्य ब्राह्मण आणि सत्ताकारण्यांसाठी ते फार मोठे आव्हान ठरत आहे. हे आव्हान परतुन लावण्यासाठी भावनिक मुद्दे उपस्थित करून आरएसएस आणि त्यांच्या प्रशाखा रात्रंदिवस कामाला लागल्या आहेत. बाबा,बापू, महाराज आणि राजकीय नेते विषारी प्रचार करित आहेत. ब्राह्मणांमध्ये धर्माची, जातीची डागडुजी करणारे असतीलही याबद्दल आम्हाला शंका नाही.परंतु ज्या धर्मात, ज्या जातीव्यवस्थेत विषमता आहे ती व्यवस्था उध्वस्त करणारा ब्राह्मण आजपर्यंत जन्माला आला नाही आणि पुढेही तो येणार नाही.या विषमतेवरच ब्राह्मणी आणि आताच्या हिंदू धर्माचा डोलारा उभा आहे.त्यामुळे त्यांच्याकडून असे क्रांतिकारी काम होणे शक्य नाही.म्हणूनच अभ्यास आणि अनुभवाअंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ब्राह्मणांमध्ये व्हॉल्टियर निर्माण झाला नाही.विषमतावादी ब्राह्मणी धर्मामुळे भारतीय मूलनिवासी लोकांना वेगळ धर्म स्वीकारला हा इतिहास आहे.
आपल्या वर्चस्वासाठी जसा ब्राह्मण सक्रिय आहे, तसाच समतावादी विचार स्थापित करण्यासाठी बहुजन सक्रिय आहे.ब्राह्मणी विचाराचा आधार कपट, विषमता कट, षडयंत्र, दैव, मोक्ष चमत्कार आहे. बहुजनांचा विचार प्रवाह मात्र मार्ग वेगळा आहे. सत्य,अनुभव आणि विज्ञान या कसोटीवर तो खरा उतरला आहे.म्हणूनच तो आजवर सक्षमपणे उभा आहे.मागील 70 वर्षात संविधानामुळे समतावादी विचाराचे पारडे जड झाले आहे.शिक्षण,नोकरी आणि वैचारिक परिवर्तनामुळे बहुजन समाज सक्षम झाला आहे.त्याचा दुसरा परिणाम असा झाला की या समाजात स्वातंत्र्य, समता, बंधूत आणि न्याय ही मानवीमूल्ये रुजायला लागली. हे परिवर्तन ब्राह्मणी व्यवस्थेला आव्हान देणारे ठरत आहे. त्यांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक व्यवस्थेला त्यामुळे हादरे बसायला लागले आहेत.ही परिस्थिती मूलनिवासी बहुजन समाजासाठी सकारात्मक असली तरी यामुळे ब्राह्मणांचे आसन डोळ्याला लागले आहे. ते साबूत आणि आणि कायम टिकवण्यासाठी अशी विधाने करून समाजामध्ये भ्रम तयार केला जात आहे. त्यसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.हे आम्ही समजून घेतले पाहिजे.ब्राह्मणी कट कारस्थानाला बळी न पडता सदसद विवेकबुद्धीने आपण आपला मार्ग निवडला पाहिजे.त्यातच आपले, समाजाचे आणि राष्ट्राचे कल्याण आहे

जीवन गावंडे,7350442920


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com