मानपाडा, ठाणे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन दि.५. रोजी खुला रंगमंच देवी मंडप, कृष्णानगर परिसरात करण्यात आले. ह्या शिबिरामध्ये पित्ताशय, स्वादुपिंड, अन्न गिळताना त्रास, स्तानाचा कॅन्सर, पोटाची तपासणी, लिव्हर, ऍसिडिटी व अपचनाचा त्रास, हर्निया, हायड्रोसील, थायरॉयड, शरीरातील गाठी व खूप दिवसांची जखम, तज्ज्ञ डॉक्टरांचा मोफत सल्ला आदी. मोफत आरोग्य तपासणी शिबिरात देण्यात आल्या. भारतीय जनता पार्टी (ठाणे शहर जिल्हा) व नवयुग मित्र मंडळ (रजि.) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराला स्थानिक नागरिकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला.
भा.ज.पा ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष व कोकण पदवीधर मतदार संघांचे आमदार सन्माननीय निरंजन डावखरे साहेब आणि ठाणे शहर लोकप्रिय आमदार सन्माननीय संजय केळकर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली सौं. स्नेहा (ताई) आंब्रे (ठा.म.पा प्रभाग क्र. ४ च्या नगरसेविका) व रमेश आंब्रे (भाजपा ठाणे शहर (जिल्हा) उपाध्यक्ष) ह्यांच्या पुढाकाराने नवयुग मित्र मंडळ सरचिटणीस डॉ.सागर रमेश आंब्रे (एम. एस., एम.बी.बी.एस.जनरल सर्जन, फिलो इन ओन्को सर्जन, फिलो इन ब्रेस्ट कॅन्सर सर्जरी, टि.एन.एम.सी नायर हॉस्पिटल,) व डॉ. श्रुती सागर आंब्रे (एम.बी.बी.एस., डी.एम.आर.ई., रेडिओलॉजिस्ट) आणि डॉ. स्नेहल गीत अविनाश (एम.बी.बी.एस., डी.एम.आर.ई., रेडिओलॉजिस्ट) ह्यांच्या माध्यमातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
ह्यावेळी भाजपा पोखरण मंडल संघटन सरचिटणीस दिनेश दाभोळकर, पोखरण मंडळ उपाध्यक्ष अखिलेंद्र मिश्रा, न्यू बंगाल समाज अध्यक्ष तमन्जीत मुखर्जी, युवराजजी कदम, शिवाजी मोरे, मुन्ना बजरंगी, राजा देशमुख, चामुंडाजी, हनुमंत काटे, विजय विश्वकर्मा, संजय सूर्यवंशी, रतन पवर, कृष्णा यादव, दिनेश बनसोडे, दिनेश रसाळ, अजय पंडित, विजय निकम, विजय भवताळे, राकेश बोऱ्हाडे, भाजपा मंडळातील समस्त समिती/ मोर्चा/ प्रकोष्ठ/सेल/ शक्तीकेंद्र प्रमुख/ बूथ प्रमुख/ भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते / नवयुग मित्र मंडळ सदस्य उपस्थित होते.
0 टिप्पण्या