Top Post Ad

आमदाराला उध्वस्त करण्याचे ठाणे महानगर पालिकेच्या अधिकाऱ्याचे मनसुबे- ध्वनिफित व्हायरल


 ठाणे महानगर पालिका अतिक्रमण विभागाचे सहा.आयुक्त  महेश आहेर यांचा डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांस संपवण्याचा कट उघड.... स्पेन आणि ठाण्यात कांड करण्यासाठी शूटर नेमले.

डाॅ.जितेंद्र आव्हाड  आणि त्यांच्या कुटुंबाला संपवण्यासाठी तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर याच्या मदतीने शूटर तैनात केले असल्याची कबुली देणारी ठामपातील अधिकारी महेश आहेर यांची ऑडिओ क्लिप वायरल झाली आहे. या ऑडिओ क्लीपमुळे ठाण्यात खळबळ माजली आहे.  ठाणे पालिकेतील प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर आणि अन्य दोघांमधील हे संभाषण वायरल झाले आहे. या संभाषणात महेश आहेर यांनी डाॅ.जितेंद्र आव्हाड यांचा उल्लेख साप असा केला असून त्यांना ठेचण्याची भाषाही आहेर यांनी केली आहे.  ठाणे महानगर पालिकेत लिपिक पदावरून थेट सहा.आयुक्तापर्यंत मजल मारणाऱ्या आहेर यांच्या मागे कोणाचा हात आहे असा सवाल आता ठाणेकरांना पडला आहे.

या संभाषणात, " माझं जेव्हा प्रोटेक्शन काढलं.  तेव्हा  रात्री पावणे बारा वाजता सीएमनी जॉइन्ट सीपीना फोन केला होता.  माझ्या जीवाला जितेंद्र आव्हाडांकडून धोका आहे, असं मी क्रिएट करून ठेवलंय.पोलीस अधिकार्यांना  पटवून ठेवलं आहे . आव्हाड माझं केव्हाही काही करू शकतो...अस मी क्रीयेट करून ठेवलं आहे.    बाबाजीला सांगून आमचे शूटर स्पेनमध्ये कामाला लावले आहेत. नातशाचा पत्ता शोधला आहे.  त्याचा जावई ठाण्यात नाही आला. तर त्याच्या बापावर एक अटॅक केला ना,  तर तो एका दिवसात  येईल. मी एअरपोर्ट पासून फिल्डिंग लावली. तो असा नाही आला ना त्याच्या एरियाचा पत्ता शोधून ठेवला आहे स्पेन एवढं मोठं नाही. त्याचा विकास कॉम्प्लेक्स पत्ता आहे त्याच्या आई वडिलांच्या सोबत एक कांड केला. तर   तो आई बाबांच्या ओढीने लगेच येईल.  मी एअरपोर्टपासून फिल्डिंग लावली.   त्याची गेम करणार त्याच्या मुलीला रडायला लावणार , म्हणजे त्याला कळणार मुलीच दुःख काय असत?प्लानिंग केलं आहे. तो साप आहे  मि सर्व प्लान केला आहे. त्याला देखील कळले पाहिजे महेश कधीही स्पॉट होऊ शकतो.  आपली फॅमिली उध्वस्त होऊ शकते.   मुलीला काहीही होऊ शकते तेव्हा तो आटोक्यात येऊ शकतो तेव्हा तो शांत होईल. मला ठेचायचा आहे त्याला !  माझा माणसाला विचारा सुटकेस भरून बाबाजीकडून पैसे येतात. बाबाजी माझ्यासाठी लीगल प्रोपार्टी साठी काम करतो," असे महेश आहेर याने या संभाषणात म्हटले आहे. 

तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर याच्या मदतीने शूटर तैनात केल्याच्या संभाषणाची ध्वनिफीत व्हायरल झाल्यानंतर ठाण्यात पालिकेच्या मुख्यालयासमोरच आहेर यांच्यावर हल्ला झाला आहे. .आहेर कामकाज संपवून घरी जात होते.  पालिका मुख्यालय इमारतीच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादीच्या चार कार्यकर्त्यांनी येऊन त्यांना मारहाण केली. जितेंद्र आव्हाड यांच्या मुलींना मारण्याची धमकी देतो का असे बोलत कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. आहेर यांच्या बचावासाठी ते सुरक्षारक्षक धावले आणि त्यातील एकाने बंदुक बाहेर काढली. तरीही ते कार्यकर्ते त्याचठिकाणी उभे होते. काही वेळानंतर पालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि नौपाडा पोलीस पालिका मुख्यालयात दाखल झाले आणि त्यांनी पोलीस संरक्षणामध्ये आहेर यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले.  पालिका मुख्यालय इमारतीच्या प्रवेशद्वारावर हा प्रकार घडला असून याबाबत ठाणेकरांमध्ये उलट सुटल चर्चा रंगल्या आहेत. 

दरम्यान, व्हायरल झालेल्या ध्वनिफितीबाबत जितेंद्र आव्हाड म्हणाले,  अशा धमक्यांना आपण घाबरत नसून पोलीस तक्रारही करणार नाही. कारण, पोलीस काय करणार नाहीत, हे आपणांस माहित आहे, 

पदोन्नतीकरिता खोटे दस्तावेज सादर केेले. लिपिकपदावरून सहा. आयुक्तपदी   https://www.prajasattakjanata.page/2021/02/blog-post_23.html

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com