पदोन्नतीकरिता खोटे दस्तावेज सादर केेले. लिपिकपदावरून सहा. आयुक्तपदी

 

ठाणे
महेश भाऊराव आहेर हे एसएससी पासच्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर माजिवडा प्रभाग समिती कार्यालयामध्ये लिपिक म्हणून 22/1/1986 रोजी कामावर रुजू झाले.  त्यांनी अतिक्रमण, जकात विभागात सेवा केली. कार्यालयीन पगाराबरोबरच त्यांनी अतिरिक्त कमाई करुन आपले राहणीमान क्लासवन अधिकाऱ्याच्या तोडीचे बनविले. नोकरी आधी कोपरीगावात भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या या लिपिकाचे नावावर ठाण्यात किती प्रॉपर्टी आहे याची चौकशी व्हायलाच हवी अशी मागणी सध्या ठाण्यातील जनता करत आहे. 

शाहू मार्केट प्रभागात कर विभागात कार्यरत असताना त्याच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई झाली. 4/9/2000 मध्ये निलंबीतही करण्यात आले होते. अधिकारी वर्गाची मर्जी सांभाळण्यात माहिर असल्याने 23/4/2001 रोजी त्यांचे निलंबन तात्पुरते मागे घेऊन वाडिया रुग्णालयात कामावर रुजू करुन घेतले तरीही चौकशीचा ससेमीरा पाठीमागे कायम होता, त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्याना मॅनेज करुन त्यातूनही ते सहिसलामत बाहेर पडले.  स्वार्थ मतलब साधण्याचा ध्येय धोरणामुळे सहकाऱ्याचे त्याचे कधीच पटले नाही. सहकाऱ्यांकडून भ्रष्ट्राचार केला जात असल्याची खोटी माहिती अ़ँटिकरप्शन अधिकाऱ्यांना पुरवून अनेक अधिकाऱ्यांना गोत्यात आणले असल्याचीही माहिती मिळत आहे. जकात चोरी प्रकरणी अनेक तक्रारी वेळोवेळी करण्यात आल्या मात्र आहिरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण संगनमताने त्यांना निकाली काढले असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. 

 

एका लीपिकच्या पदावरून सहायक आयुक्त पदावर बसणारे दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त महेश भाऊराव अहेर यांच्या शैक्षणिक पात्रतेचे दस्तावेज यांची चौकशी व्हावी अशी मागणीही होत आहे. १९८५ मध्ये ज्ञानसाधना कॉलेज, ठाणे इथे ११वी आर्ट्स मध्ये महेश भाऊराव अहेर हे नापास झाले होते. त्यानंतर त्यांनी २०१७ मध्ये विनायक मिशनस सिक्कीम युनिव्हर्सिटी, सिक्कीम इथून कॉमर्स मध्ये ग्रॅज्युएशन केल्याची मार्कशीट ठाणे महानगरपालिकेच्या कार्यालयात सादर केले आहे. ज्याच्या आधारावर त्यांना सहायक आयुक्तपद प्राप्त झालं. विनायक मीशनस सिक्कीम युनिव्हर्सिटी, सिक्कीम यांच्या २०१६-२०१७ चा परीक्षेच्या परिनामच्या लिस्ट मध्ये महेश भाऊराव अहेर नावाच्या कुठे ही उल्लेख नाही. मग या सर्व घडामोडींबाबत असा प्रश्न निर्माण होते की. काय अहेर यांनी  पदोन्नती करीता खोटे/बनावट मार्कशीट दिली आहे की का?ठाणे महानगरपालिकेने अहेर यांनी सादर केलेलं दस्तावेज यांची व्हेरिफिकेशन का केली नाही?  काय ठाणे महानगरपालिका महेश अहेर यांच्यावर खोटे कागदपत्र सादर करण्यासाठी गुन्हा दाखल करतील? अशी व्यक्ती सहा.आयुक्त पदासाठी लायक आहे का?

महानगर पालिकेतील अतिक्रमण, जकात या मलाईदार खात्यात लिपिक म्हणून काम करणाऱ्या महेश आहेर या कर्मचाऱ्याने आपल्या कर्तबगारीने करोडो रुपयाची माया जमविली आणि आज त्याचा वापर करून सहा.आयुक्तपद मिळवले आहे. महापालिकेच्या लिपिक पदावर काम करणाऱ्या महेश आहेराकडे एवढी संपत्ती आली कुठून?  इतकेच नव्हे तर  क्लास वन अधिकाऱ्याचा तोरा मिरविणाऱ्या या लिलिकाने रिव्हॉल्वर परवानाही मिळविला आहे. महापालिकेतील साध्या कर्मचाऱ्याला रिव्हॉल्वरची गरज काय असा प्रश्न सध्या ठाणेकरांमध्ये चर्चा होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या