सावरकर यांच्याबाबत मी जे वक्तव्य केले होते त्यात चुकीचे काहीच बोललो नाही, जे ऐतिहासिक सत्य आहे तेच मी मांडले असे राहूल गांधी यांनी पत्रकार परिषदेदरम्यान स्पष्ट केले. भारत जोडो यात्रेदरम्यानची राहुल गांधी यांची ही सहावी पत्रकार परिषद चानी फाटा वाडेगाव, जिल्हा अकोला येथे पार पडली. आपले मत अधिक स्पष्ट करताना विनायक दामोदर सावरकर यांनी ब्रिटीश सरकारला लिहिलेले पत्र दाखवून त्यातील काही मजकूरही वाचून दाखवला. या माफीनाम्यातील शेवटची ओळ वाचून दाखवली. मी तुमचा नोकर राहू इच्छितो, असे सावरकर यांनी माफीनाम्यात म्हटल्याचे त्यांनी अधोरेखित केले. देवेंद्र फडणवीस यांनीही हा माफीनामा बघावा. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रजांची मदत केली, याचा पुनरुच्चार राहुल गांधी यांनी केला.स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी घाबरल्यामुळे इंग्रजांना माफीनामा लिहला. महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल यांनाही इंग्रजांनी अनेक वर्ष तुरुंगात डांबले होते. पण त्यांनी ब्रिटीश सरकारला पत्र लिहून आपली सुटका करुन घेतली नाही. कोणताही माफीनाम्याची कोणतीही चिठ्ठी लिहली नाही. पण सावरकरांनी घाबरल्यामुळेच माफीनाम्यावर सही केली. सावरकरांनी त्यावेळी एकप्रकारे स्वातंत्र्यलढ्यातील इतर नेत्यांना दगा दिला, असेही राहुल गांधी यांनी म्हटले.
हा या दोन विचारधारेतील फरक आहे. एक गांधींची विचारधारा तर दुसरी सावरकरांची असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. मागील काही दिवसापासून वि.दा.सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून भाजपासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाला सावकरांच्या माफीनाफ्यावरून खुल्या चर्चेचे आव्हान देत सावरकरांनी ब्रिटीशांकडे माफी मागितल्याचे पत्रच जाहिर करून टाकले.
राहुल गांधी यांनी ४० मिनिटे पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. व महाराष्ट्रातील पत्रकारांसमवेत छायाचित्रही काढले. या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, मीडिया विभागाचे प्रमुख जयराम रमेश, प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रवक्ते डॅा. राजू वाघमारे, कपिल ढोके, डॅा. सुधीर ढोणे आदी उपस्थित होते.
भारत जोडो यात्रा हा एक विचार आहे, प्रवास आहे. शेतकरी, कष्टकरी, तरुण, दुकानदार सर्वांच्या समस्या, वेदना, व्यथा लोक या पदयात्रेत मांडत आहेत. ही पदयात्रा देश जोडण्याच्या उदात्त हेतूने निघाली आहे. पदयात्रेतून प्रेमाचा संदेश दिला जात आहे, द्वेष पसरवला जात नाही, असे असतानाही जर सरकारला ही पदयात्रा रोखावी असे वाटत असेल तर त्यांनी खुशाल रोखावी, असे आव्हानही त्यांनी दिले. देश तुटलेला नाही तर मग भारत जोडो पदयात्रेची गरज काय असा प्रश्न भाजपा करत आहे. पण मागील ८ वर्षात देशातील वातावरण पूर्णपणे बदलेले आहे.जनतेचा आवाज ऐकला जात नाही, शेतकरी, तरुण, कष्टकरी यांचा आवाज सरकार ऐकत नाही. संसदेत विरोधकांना बोलू दिले जात नाही. देशात अनेक समस्या आहेत पण त्या सरकार ऐकून घेत नाही, द्वेष, हिंसा पसरवून भीतीच्या सावटाखाली जनतेला ठेवले जात आहे. स्वायत्त संस्थांवर सरकारचा दबाव आहे. न्यायपालिकाही यातून सुटलेल्या नाहीत अशा परिस्थितीत जनतेचा आवाज ऐकण्यासाठी ही भारत जोडो यात्रा आहे. दररोज हजारो लोक त्यांच्या व्यथा, वेदना, समस्या मांडत आहेत, त्यासाठीच ही पदयात्रा असल्याचे त्यांनी सांगितले.
देशात एक द्वेष पसरवणाऱ्यांची विचारधारा आहे तर दुसरी विचारधारा देश जोडणाऱ्यांची आहे. द्वेष पसरवून देश भक्कम कसा होतो ? त्यामुळे तर देश कमजोर होतो. विविधतेत एकता ही या देशाची ओळख आहे, ही ओळख कायम ठेवण्यासाठी, देश जोडण्यासाठी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत ही पदयात्रा जाणार आहे. महाराष्ट्रात या पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला व यातून मला खूप काही शिकायला मिळाले. महात्मा गांधी यांनी देशातून वर्धा येथेच राहण्याचा विचार का केला असावा? याचे उत्तर मला या विदर्भाच्या भूमित आल्यानंतर कळले. खरी काँग्रेस विदर्भात, महाराष्ट्रात आहे. काँग्रेसच्या विचारांची ही भूमी आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
हे पण् वाचा..... वि.दा.सावरकर
------------------------------------------------
- सावरकरांवर टीका करणारे लोक खालील प्रश्न सतत विचारत असतात. सावरकर प्रेमी अभ्यासकांनी त्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांना चूक ठरवावे.
- १) सावरकरांना "स्वातंत्र्यवीर/ वीर" ही पदवी पहिल्यांदा कुणी व कधी दिली?
- २) सावरकर बॅरिस्टर असूनही त्यांनी वकिली का केली नाही? त्यांनी विकीलीची परीक्षा कधी पास केली? व त्यांना विकिलीची सनद कधी मिळाली? सनद मिळाली नसेल तर ती का?
- ३) सावरकरांना ब्रिटन मध्ये अटक का झाली होती व त्यात तीन महिन्याची शिक्षा सुद्धा झाली होती, ती का?
- ४) सावरकरांना इंग्रज सरकार कडून महिना ६० रू. पेन्शन मिळत होती की नाही?
- ५) ते वीर होते तर त्यांनी इंग्रजांना ६-६ माफीनामे लिहून का दिले?
- ६) इंग्रज राजवटीला गुंगारा देण्यासाठी त्यांनी माफीनामे दिले असतील तर सुटून आल्यावर त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्याची उदाहरणे का नाहीत?
- ७) स्वातंत्र्याच्या पूर्व संध्येला काँग्रेस, पटेल, नेहरू देशातील सर्व रियासती एक करून एकसंघ भारत उभा करण्यासाठी झटत असताना सावरकरांनी काही रियासतींना "तुम्ही भारतात विलीन होउ नका" म्हणून पत्रे लिहून का उकसवत होते? ही कोणती देशभक्ती?
- ८) जिनांनी वेगळ्या पाकिस्तानची मागणी करण्या पूर्वीच सावरकरांनी द्वीराष्ट्राची संकल्पना २० एक वर्षांपूर्वी त्यांच्या पुस्तकात मांडली होती की नाही?
- ९) पर धर्मातील स्त्रियांचा सन्मान करणाऱ्या शिवाजी महाराजांना सावरकरांनी "सद्गुण विकृती" म्हणणे तुम्हाला योग्य वाटते का?
- १०) मुस्लिम स्त्रियांवर बलात्कार करण्याचं आवाहन करणारा माणूस आदर्श असू शकतो काय?
- ११) अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा केवळ सावरकरांनाच झाली होती काय? कोलू ओढण्याचं काम फक्त त्यांनाच दिलं होतं काय?
- १२) इतर स्वातंत्र्य सैनिक ज्यांनी इंग्रजांची माफी न मागता तिथेच स्वाभिमानाने मृत्यूला सामोरे गेले असे हजारावर शहीद वीर सावरकरांपेक्षा जास्त देशभक्त आणि साहसी वीर नव्हते काय? त्यांची नावे तरी देशातील जनतेला माहीत आहेत का?
Vedant Chitre यांची पोस्ट,
0 टिप्पण्या