Top Post Ad

विनायक दामोदर सावरकर

  विनायक दामोदर सावरकर यांना `वीर' हे विशेषण 1920 मध्ये प्रथम लावण्यात आले. `भाला'कार भोपटकरांनी ते पहिल्यांदा वापरले. आणि ते रूढ झाले. अगदी आजसुद्धा त्यांना   वीर सावरकर म्हणूनच ओळखले जाते. परंतु सावरकरांच्या अस्सल कागदपत्रांच्या आधारे सावरकर हे `स्वातंत्र्यवीर' नव्हे, तर `माफीवीर' असल्याची मांडणी अभ्यासक करतात. `द वीक' या देशातील जबाबदार नियतकालिकाने जानेवारी 2016 मध्ये यासंदर्भातील माहिती पुढे आणली आहे. ती ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे मांडली आहे. आणि ती आजवर कुणी खोडून काढल्याचे ऐकिवात नाही. केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार असताना 2003मध्ये संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सावरकरांचे तैलचित्र लावण्यात आले. महात्मा गांधींच्या तैलचित्राच्या अगदी समोर. भारतीय संसदेच्या इतिहासात काँग्रेस आणि इतर विरोधकांनी बहिष्कार घातलेला हा एकमेव समारंभ आहे. हा विरोध केवळ राजकीय स्वरुपाचा नव्हता तर, स्वातंत्र्यचळवळीला विरोध करणाऱ्या सावरकरांना विरोध करण्याची भूमिका त्यामागे होती.  

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या वेबसाइटचे अनावरण झाले, तेव्हा त्यांनी पहिला ब्लॉग सावरकरांना अर्पण केला. यावरून लक्षात येते की ते भाजपवाल्यांना प्रिय आहेतच, परंतु कोणत्याही प्रकारच्या अभ्यासाचे आणि अभ्यासावर आधारित वस्तुनिष्ठ माहितीचे वावडे असलेल्या शिवसेनेलाही ते तेवढेच प्रिय आहेत. त्याचमुळे शिवसेना अनेक वर्षांपासून सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करीत आहे.सावरकरांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च पुरस्कार देण्याची मागणी जोर धरू लागल्यावर `द वीक' या साप्ताहिकाने अस्सल कागदपत्रांच्या आधारे सावरकरांच्या `वीर' विशेषणाचा तपशीलवार उलगडा केला. या साप्ताहिकाचे तत्कालीन प्रतिनिधी निरंजन टकले यांनी हा विशेष स्पेशल रिपोर्ट लिहिला आहे. टकले हे मूळचे नाशिकचे. त्यांना सावरकरांच्याबद्दल प्रेम आणि आपुलकी होती. त्यापोटीच ते सावरकरांच्यासंदर्भात माहिती घेत, कागदपत्रे तपासत राहिले. प्रेमापोटी केलेला प्रयत्न होता. मात्र त्या प्रयत्नामध्ये त्यांना जी माहिती मिळत गेली, ती पाहिल्यानंतर त्यांचा या स्वातंत्र्यवीराच्या कथित पराक्रमाच्या गोष्टींबद्दल पुरता भ्रमनिरास झाला. ब्रिटिश सत्तेविरुद्ध त्यांनी संघर्ष केला नाही, तर शिक्षेतून माफी मिळण्यासाठी वारंवार दया याचिका केल्या.  

केंद्रातील सरकार नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासंदर्भातील कागदपत्रांवरून राजकारण करीत असतानाच निरंजन टकले सावरकरांच्या कागदपत्रांकडे वळले होते. त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर येत गेल्या.सावरकरांच्यासंदर्भात श्रीकांत शेट्ये यांचे `माफीवीर सावरकर' नामक पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यात त्यांनी सावरकरांचे माफीनामेही दिले आहेत. ते असे आहेत मी घराबाहेर पडून बिघडलेला उधळ्या खर्चिक मुलगा आहे. मायबाप ब्रिटिश सरकारच्या पंखाखाली सुरक्षित रहाण्यासाठी माझी अंदमानच्या तुरुंगातून सुटका करावी. मी 1911 मध्येही दयेचा अर्ज केला होता. त्याचाही सहानुभुतीपूर्वक विचार करून दयाळू आणि परोपकारी ब्रिटिश सरकारने माझी सुटका केली तर इंग्रज सरकारचा मी जन्मभर पुरस्कर्ता राहीन. जोपर्यंत आम्ही (नागरिकच) तुरुंगात आहोत, तोपर्यंत इंग्लंडच्या राजेसाहेबांच्या भारतातील रयतेच्या लाखो घरकुलात आनंद आणि समाधान कसे लाभेल? कारण ते आणि आम्ही एकाच रक्ताचे आहोत. पण आमची सुटका झाली तर सारी रयत हर्षाने आरोळ्या ठोकील आणि शिक्षा सूडबुद्धी न ठेवता माफी आणि पुनर्वसनावर भर देण्राया सरकारचा जयजयकार करील.'  

एकदा मी स्वत:च सरकारच्या बाजूने झालो, की मला गुरूस्थानी मानून रक्तरंजित क्रांतीचे स्वप्न बघणारे भारतातील व परदेशातील हजारो तरुण पुन्हा ब्रिटिश सरकारच्या बाजूने येतील.'  माझी भविष्यातील वागणूक सरकारला अनुकूल राहील. इंग्रज सरकारला ज्या पद्धतीने माझ्याकडून सेवा करून घ्यावीशी वाटेल, त्या पद्ध्तीने काम करण्यास मी तयार आहे. मला तुरुंगात ठेवून सरकारला काय मिळेल? यापेक्षा मला सोडाल तर त्याहीपेक्षा जास्त फायदा सरकारचा होईल. माझ्यासारखा वाट चुकलेला पुत्र आपल्या पितारुपी ब्रिटिश सरकारच्याच दरबारात नाही येणार तर कुठे जाणार?'

सावरकरांचा 14 नोव्हेंबर 1913चा हा माफीनामा भारत सरकारच्या अर्काइव्हजमध्ये असल्याचे शेट्ये यांनी नमूद केले आहे. टकले यांनी म्हटले आहे की, सावरकरांनी इंग्रज सरकारकडे एखादे-दुसरे माफीपत्र दिले नाही, तर एकूण सात माफीपत्रे दिली आहेत.  

सावरकर चार जुलै 1911 रोजी तुरुंगात दाखल झाले. आणि माफी मागणारे पहिले पत्र त्यांनी 30 ऑगस्ट 1911 रोजी लिहिले. पहिले सहा महिने सावरकरांना एकट्याला एका सेलमध्ये ठेवले होते. त्या काळात त्यांना कोणतेही काम सोपवले नव्हते. म्हणजेच त्यांचा छळ वगैरे काही होत नव्हता. फक्त त्यांना कुणाला भेटता येत नव्हते.  

सावरकरांनी सुमारे पंचवीस वर्षे तुरुंगात काढल्याची चर्चा केली जाते. प्रत्यक्षात ते नऊ वर्षे दहा महिने तुरुंगात होते. या काळात त्यांनी स्वत सात माफीपत्रे लिहिली. आणि त्यांच्या पत्नीने त्यांच्यातर्फे मुंबई सरकारकडे तीन माफीपत्रे लिहिली. सावरकरांच्या पत्रांची भाषा पाहिली तर ती किती आर्जवी आणि ब्रिटिश सरकारची भलावण करणारी आहे, हे लक्षात येते आणि ती वाचून आश्चर्यही वाटते.  

महत्त्वाची बाब म्हणजे हे सावरकरांच्यावरचे आरोप नाहीत. इतिहासाच्या पानांमध्ये दडलेले हे पुरावे कागदपत्रांच्या आधारे पुढे आणण्यात आले आहेत. यातील काही गोष्टी जुन्या असल्या तरी काही नव्याने पुढे आल्या आहेत. टकले यांनी त्यासाठी 21 हजार कागदपत्रांचा अभ्यास केला.सावरकरांनी इंग्रजांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, `येण्राया काळात ब्रिटिश साम्राज्याला हिंदूंच्या मदतीनेच समान ध्येय ठरवावे लागेल. हिंदू महासभा आणि ब्रिटिशांनी समान उद्देश ठेवून काम केले पाहिजे.'सावरकरांच्या या पत्रातून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे, काँग्रेस ही त्या काळात राष्ट्रीय चळवळ होती. रुढार्थाने राजकीय पक्ष नव्हता. म्हणजेच काँग्रेस आणि मुस्लिमांना विरोध करणे हा समान उद्देश सावरकरांनी सूचित केला होता. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये 1942च्या चलेजाव चळवळीला विशेष महत्त्व आहे. या चळवळीला सावरकरांनी जाहीरपणे पत्रक काढून विरोध केला होता. 

एवढेच नाही, तर त्या काळात सावरकरांचे कार्यकर्ते राष्ट्रीय चळवळीच्या विरोधात पोलिसांना म्हणजे ब्रिटिश सरकारला माहिती पुरवत होते. म्हणजे महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य चळवळीच्या विरोधात, ब्रिटिशांचे खबरे म्हणून सावरकरांचे अनुयायी काम करीत होते. `रिस्पॉन्सिव्ह को-ऑपरेशन' अंतर्गत ब्रिटिश सरकारला मदत करायची, असे त्यांचे धोरण होते.

दुस्रया महायुद्धाच्या काळात इंग्रज सैन्यात लष्कर भरतीसाठी हिंदू महासभेने रिक्रूटमेंट बोर्डस् तयार केली होती. जपान भारतावर आक्रमण करणार, असा प्रचार केला जात होता. जपान त्यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मदत करत होता आणि भारताला मदत करण्यासाठी नेताजी जपानच्या मदतीने आक्रमण करणार होते. म्हणजे नेताजींच्या विरोधात सावरकर उभे ठाकले होते.तुरुंगातून सुटल्यानंतर कोणत्याही राजकीय आंदोलनात सहभागी होणार नसल्याची हमी सावरकरांनी दिली असली तरी सामाजिक सुधारणेच्या नावाखाली त्यांचे राजकीय कार्य सुरूच होते. हिंदू महासभेचे अनेक राजकीय कार्यक्रम होत होते. आणि ब्रिटिशांना सोयीचे असतील अशा कार्यक्रमांना परवानगीही मिळत होती. हिंदू महासभेच्या धर्मांतराच्या किंवा शुद्धीकरणाच्या कार्यक्रमांना परवानगी मिळत होती.  

सावरकरांच्या अटकेसंदर्भातही विविध प्रवाद आहेत. नव्या माहितीनुसार त्यांना 13 मार्च 1910 रोजी लंडनमध्ये अटक झाली. नाशिकचे तत्कालीन कलेक्टर जॅक्सन यांच्या हत्येसाठी मदत केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. अनंत कान्हेरेनी ज्या पिस्तूलाने जॅक्सनची हत्या केली ते पिस्तूल सावरकरांनी लंडनहून पाठवले होते. त्यांच्यावर दोन आरोप होते. खून आणि खुनाचा कट रचणे. त्यासाठी प्रत्येकी पंचवीस वर्षांच्या अशा दोन जन्मठेपेच्या शिक्षा त्यांना सुनावण्यात आल्या होत्या.  काळ्यापाण्याची शिक्षा झालेल्या प्रत्येक कैद्याचे जेल हिस्टरी तिकीट असायचे. त्यामध्ये त्याचा गुन्हा, शिक्षा आणि त्याला दिलेल्या कामाचा उल्लेख असायचा. सावरकरांच्या या तिकिटावर कैदी नंबर 32778, सेल 52, लेव्हल 3 असा उल्लेख होता. त्यांचा भाऊ गणेश आणि बाबाराव हेसुद्धा त्यांच्यासोबत तुरुंगात होते.

स्वातंत्र्यसैनिक त्रैलोक्यनाथ चक्रवर्ती यांनी लिहिले आहे की, जेलमधील राजकीय कैदी दोन गटामध्ये विभागले होते. नेमस्त आणि जहाल किंवा अतिरेकी (मॉडरेट आणि एक्सट्रिमिस्ट). सावरकर बंधू, बंगाली क्रांतिकारक बरिंद्र घोष आणि इतर काही कैदी जे आधी आले होते, ते छळवणुकीने त्रासले होते. ते आमच्या संभाव्य चळवळीत सहभागी झाले नाहीत.  सावरकर बंधू आम्हाला खासगीत प्रोत्साहन देत होते, परंतु उघडपणे आमच्यासोबत येण्यास तयार नव्हते.अंदमानमध्ये आलेल्या राजकीय कैद्यांपैकी फक्त सावरकर बंधू आणि बरिंद्र घोष या दोघांनी इंग्रजांकडे दयेची याचना केली. 

सावरकरांनी केलेल्या दयेच्या याचनेच्या सहा तारखा उपलब्ध आहेत, त्या- तीस ऑगस्ट 1911, चौदा नोव्हेंबर 1913, चौदा सप्टेंबर 1914, दोन ऑक्टोबर 1917, चोवीस जानेवारी 1920 आणि तीस मार्च 1920. याशिवाय सावरकरांच्या पत्नीनेही जुलै 1915, ऑक्टोबर 1915 आणि जानेवारी 1919 मध्ये मुंबई सरकारकडे तीन माफीपत्रे सादर केली होती.  

विजय चोरमारे - ज्येष्ठ पत्रकार 

---------------------------------------------------


काँगेसचे नेते राहूल गांधी यांच्या वि.दा.सावरकर यांच्या बाबतीतील कथित वक्तव्यावरून सध्या देशभरात वाद सुरू झाला आहे.महाराष्ट्रात सुध्दा या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढविला आहे.महाराष्ट्राच्या विधानसभेत ज्या त्वेषाने आणि तळमळीने देवेंद्र फडणवीस यांनी वि.दा.सावरकर यांची बाजू मांडली,त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन.देवेंद्रजी इतक्या आवेशात सावरकरांची बाजू मांडत होते की,एक महिन्यापूर्वी हीच व्यक्ती महाराष्ट्राची मुख्यमंञी होती यावर सुध्दा विश्वास बसत नव्हता.खरोखरच देवेंद्रजींचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.          

सध्या सुरू असलेले सावरकर प्रकरण हे वेगळ्या अंगाने अतिशय महत्वाचे आहे.सावरकरांच्या माफीचा मुद्दा थोडा बाजूला ठेवून सध्याच्या प्रकरणाकडे समस्त बहुजन समाजाने जातीय अस्मितेच्या संदर्भात फार गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.कारण आम्ही वेळोवेळी समतावादी भूमिका घेत असतांनाही जातीयवादी ठरत असतो आणि ते प्रत्येक वेळी जातीयवादी भूमिका घेत असतांना माञ समतावादी ठरत असतात.त्यामुळे सर्वच पक्षातील बहुजन समाजाच्या नेत्यांनी,आमदार व खासदारांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे.परंतु आमचे नेते काहीच शिकणार नाही किंवा बोध घेणार नाही हे सुध्दा तेवढेच सत्य आहे.

आपल्या जातीच्या श्रध्दास्थानांचा कसा आणि किती आदर करायचा हे फडणवीसांनी आम्हा सर्व बहुजनांना दाखवून दिले आहे.एखादी खोटी गोष्टही कशी खरी करून सांगायची हे देवेंद्रजी कडून आपण शिकलो पाहिजे.ते विधानसभेत सावरकरांची बाजू घेतांना इतक्या जोरात ओरडत होते की,त्यांच्या कुटुंबातीलच एखाद्या जवळच्या व्यक्तीचा घोर अपमान झालेला आहे आणि त्याचा आपण बदला घेतलाच पाहिजे अशी त्यांची कृती आणि हावभाव होते.आमच्या बहुजन नेत्यांमधे माञ आमच्यासाठी संपूर्ण आयुष्याचा होम केलेल्या बहुजन महापुरुषांकरीता इतका जिव्हाळा,प्रेम आणि आपुलकी कधी निर्माण होईल हा चिंतेचा आणि चिंतनाचा प्रश्न आहे.         

या राज्यात अनेकदा छ.शिवाजी महाराज,संभाजी महाराज,जिजाऊ,महात्मा फुले,शाहू महाराज,डा?.बाबाबाहेब आंबेडकर व अनेक संत महापुरूषांचा शेकडो वेळा अपमान झालेला आहे,चारित्र्यहनन झाले आहे.तेव्हा देवेंद्र फडणवीस व त्यांच्या समर्थकांमधे कधीच असा जोश आणि त्वेष संचारला नव्हता.छिंदम सारख्या नालायकाने छ.शिवरायांबद्दल अत्यंत अपमानजनक उद्गार काढले होते,तेव्हा माञ देवेंद्रजी मधे इतकी शक्ती का संचारली नव्हती हा प्रश्न आमच्या बहुजनांच्या मेंदूत कधी निर्माण होईल ? परंतु आमचे बहुजन नेते इतके लाचार,भेकाड आणि गुलाम आहे की त्यांना आपल्या महापुरुषांच्या अवमानाचे काहीच सोयरसुतक वाटत नाही.त्यांना आमच्या महामानवांचा इतिहास आणि कार्य सुध्दा माहीत नाही आणि माहिती करून घेण्याच्या फंदातही ते पडत नाही.

एखाद्या जितेंद्र आव्हाडचा अपवाद सोडला तर बाकीच्यांना आमच्या महापुरुषांच्या अपमानाशी काहीच घेणेदेणे नसते.या महापुरुषांच्या त्यागामुळे आणि बलिदानामुळेच आपण ही मोठमोठी पदे भूषवित आहोत,आमदार-खासदार झालेलो आहोत हेच आमच्या लाचार बहुजन नेत्यांना समजत नाही.म्हणूनच ते सावरकरांचा तथाकथित अपमान झाला की मी सावरकर च्या टोप्या घालतात. परंतु शिवरायांचा,तुकोबांचा,फुले-शाहू-आंबेडकर यांचा अपमान होतो तेव्हा माञ ...............शेपूट घालून बसतात.इतके लाचार आणि स्वार्थी नेते ज्या समाजात जन्माला येतात,तो समाज जन्मभर मानसिकदृष्ट्या गुलाम असतो.तो समाज कितीही शिकला,कितीही श्रीमंत झाला तरी त्यांचे मेंदू दुसऱ्यांकडे गहाण असतात व आपल्या शञूंच्या ओंजळीने पाणी पिण्यातच त्यांना धन्यता वाटते.          

आमच्या बहुजनांना सावरकरांच्या तथाकथित उडीचे फारच कौतुक आहे.परंतु इंग्रजांविरुध्द स्वतचे प्रती (पञी) सरकार उभारणाऱ्या क्रांतीसिंह नाना पाटलांची अटकेत असतांना रेल्वेतून कृष्णा नदीच्या पाञात मारलेली उडी माञ माहीत नाही.इंग्रजांचा गोळीबार चुकवत दुथडी भरलेल्या कृष्णेत वसंतदादा पाटलांनी 40 फुटावरून मारलेली उडी, सातारचा सेल्यूलर जेल फोडून नागनाथ अण्णा नायकवडी यांनी कारागृहाच्या भिंतीवरून मारलेली उडी आणि शिवाजीराव पाटलांनी धुळ्याच्या जेलमधील भिंतीवरून मारलेली उडी आमच्या लोकांना माहीत करून घेण्याची गरजही वाटत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे.त्यामुळे देवेंद्रजी,आमच्या शिकलेल्या बहुजन समाजाचे अज्ञान हीच तुमची खरी शक्ती आहे.तुम्ही पुन्हा पुन्हा आमच्या श्रध्दास्थानांचा कितीही अपमान केला तरी आम्ही पेटून उठू शकत नाही.पण गोडसे आणि सावरकरांसाठी माञ आमचे बहुजन प्राणही द्यायला तयार होतात हीच आमची कमजोरी आणि तुमची शक्ती आहे.     

 या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांना मानलेच पाहिजे.त्यांचे चूक की बरोबर यावर कीस पाडण्यापेक्षा ते आपल्या श्रध्दास्थानांचा आदर व सन्मान कसा करतात हे आपण त्यांच्या कृतीवरून शिकले पाहिजे.आपल्या महापुरुषांची बाजू,मग ती खोटी का असेना कशी घ्यायची असते हे खरोखर वाखाणण्याजोगे आहे.समस्त बहुजन समाजासाठी देवेंद्र फडणवीसांनी एक आदर्श व उत्तम उदाहरण सादर केले आहे.त्याबद्दल त्यांचे पुनश्च अभिनंदन व मानाचा मुजरा

डिसेंबर:२०१९  

अमोल धवसे 
(शहर अध्यक्ष काँग्रेस नां. खं. )  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com