राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार - 2022 करिता प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन


 28 नोव्हेंबर हा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन म्हणून आपण सर्वांनी साजरा केला पाहिजे. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी शिक्षण आणि समाज परिवर्तनामध्ये मूलभूत व क्रांतिकारी कार्य केले आहे. त्यांच्या विचारांना आदर्श मानून कार्यरत असणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील शिक्षक/शिक्षिका यांना प्रागतिक लेखक संघ व निर्मिती विचारमंच, कोल्हापूर यांच्या वतीने राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार देऊन 28 नोव्हेंबर, 2022 रोजी कोल्हापूर येथे सन्मानित करण्याचे नियोजित आहे. यनिमित्ताने आपल्या कार्याचा परीघही वाढण्यास मदत होणार आहे.

आपण जाणताच प्रागतिक लेखक संघ व निर्मिती विचारमंच, कोल्हापूर या दोन्ही संस्था पुरोगामी, परिवर्तनवादी, विज्ञाननिष्ठ, तथागत बुद्ध, जगतज्योती बसवण्णा, राष्ट्रमाता जिजाऊ, राजमाता अहिल्याबाई होळकर, माता सावित्रीमाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, विद्रोही संत तुकाराम, समतावादी वारकरी परंपरा, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, लोकराजे राजर्षी शाहू महाराज, शहीद भगतसिंग, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसिंह नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना अभिप्रेत अशा प्रबोधनाच्या क्षेत्रात कृतिशील पद्धतीने कार्यरत आहेत.

आपणास विनंती अशी की, राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार - 2022 या पुरस्कारासाठी आपल्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा लेखी प्रस्ताव आमच्याकडे दि. 15 नोव्हेंबर, 2022 पर्यंत पाठवून आपल्या कार्याचा सन्मान करण्याची संधी आम्हाला उपलब्ध करून द्यावी.

---------------------------------

सूचना

1. शिक्षण क्षेत्रातील कोणतीही भारतीय नागरिक असणारी व्यक्ती आपला प्रस्ताव पाठवू शकते. यासाठी जाती-धर्माचे कोणतेही बंधन नाही.
2. प्रस्तावासोबत आयडेंटिटी साईज फोटोसह आपला बायोडाटाही पाठवावा.
3. प्रस्ताव पाठवण्याची अंतिम तारीख : दि. 15 नोव्हेंबर, 2022
4. प्रस्ताव पाठवण्यासाठी पत्ता : प्रागतिक लेखक संघ, निर्मिती विचारमंच, कोल्हापूर आदित्य सभागृह  तळमजला, 873, क/2, सी वॉर्ड, सिध्दीश्री प्लाझा, राजाराम रोड, उमा टॉकीज चौक जवळ, सिद्धिविनायक मंदिरासमोर, कोल्हापूर - 416002
5. पुरस्कार वितरण समारंभ 28 नोव्हेंबर, 2022 रोजी कोल्हापूरमध्ये आयोजित केला जाईल.
6. पुरस्काराचे स्वरूप : कोल्हापुरी फेटा, सन्मानचिन्ह आणि पाच हजार रुपयांची पुस्तके.
7. राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार - 2022 या पुरस्कारासाठी कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. परंतु आमच्या मानवतेचे सोबती या गरीब विद्यार्थी दत्तक सामाजिक उपक्रमासाठी आपण एका विद्यार्थ्याचा वार्षिक खर्च उचलण्यासाठी स्वइच्छेने ऐच्छिक अर्थसहाय्य करु शकता.
अधिक माहितीकरिता - 09529574475  /  09822472109  /  09420361122  /  09420371122

मानव धर्माचा साज : सत्यशोधक समाज!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA