Top Post Ad

फुले-आंबेडकरी चळवळीसमोरची आव्हाने


ज्या विचार व तत्त्वाज्ञानामागे संकल्प केलेली जनता उभी असते तो परिवर्तनाच्या चळवळीचे नेतृत्त्व करीत असतो. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्त्व महात्मा गांधी यांनी केले; आणी त्यांचे साधन होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. त्यावेळी या स्वातंत्र्य लढ्याला सामाजिक समतेची जोड मिळावी व लोकशाही संकल्पना अधिकाधिक आशयघन आणि स्त्राrशुद्रादिशूद्र केंद्रीत व्हावी म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पूर्वास्पृश्य स्त्री-पुरुषांना संघटित करून प्रभावी चळवळ उभी केली. त्यावेळी गांधी आणि आंबेडकर हे दोघेही नेते परिवर्तनवादी चळवळींचे नेतृत्व करीत होते. त्यांच्यासमोर प्रमुख आव्हान  होते -  

एक : महात्मा गांधींजीसमोरील आव्हान :  उच्च वर्ग-वर्ण-राजे-राजवाडे यांच्या प्रभावाखालील मारा काँला स्त्री - शूद्रादिशूद्र स्त्रीयांप्रती अधिकाधिक सजग करणे. त्यासाठी या समूहांमध्ये परिवर्तनची प्रक्रिया सुरू करणे आणि त्याचवेळी ब्रिटिश साम्राज्यावाद्यांविरुद्धचा लढा अधिकाधिक तिव्र करण्याचे मोठे आव्हान होते. 

दोन : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसमोरील आव्हान :  पिढ्यान् पिढ्यापासून वर्ण-जाती व स्त्राr दास्यामध्ये अडकवलेला स्त्री-शूद्रातिशूद्र समाज जागा करून ब्राह्मणी धर्म-संस्कृती व व्यवस्थेविरोधात उभा करणे आणी ब्रिटीश साम्राज्यवाद्यांविरोधातील  चळवळ व सर्वोच्च नेते महात्मा गांधी यांच्याशी संवाद-वादविवाद या मार्गांनी सामाजिक समतेचे - स्त्री-पुरुष समतेचे महत्त्व पटवून देणे आणि भविष्यातील स्वतंत्र भारतातील लोकशाही व्यवस्था अधिक समाताधिष्ठीत बनविणे व स्त्री-शूद्रादिशूद्रांना सन्मानाचे कायचे स्थान प्राप्त करणे हे खूप जिकीरीचे -महाकठीण आव्हान डॉ.बाबासाहेबांसमोर होते. त्याचवेळी कोणत्याही अर्थाने ब्रिटीश साम्राज्यवाद्यांच्या विरोधातील लढ्याला खीळ बसणार नाही याचे भान शेवटपर्यंत आंबेडकरांनी ठेवले व हे आव्हान यशस्वीपणे पेलले. 

या पार्श्वभूमीवर फुले-शाहू-आंबेडकरी चळवळी समोरील आव्हाने पहायला हवीत. 

वैचारिक आव्हान  -  डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध, कबीर व फुले यांना आपले गुरू मानले. याचा अर्थ इतिहासातील समतावादी प्रवाह, त्यानंतरचा सांस्कृतिक-अध्यात्मिक प्रवाह आणी अठराव्या शतकातील स्त्राr शुद्रादीशूद्रांचा समतवादी प्रवाह यांच्याशी आपले नाते जोडले आणि वर्तमानातील चळवळीचे तत्त्वज्ञान-विचारसरणीचा पाया भक्कम केला. त्यामुळेच बाबासाहेबांनी स्वातंत्र्य - समता  आणि परस्पर स्नेहभाव  ही आधुनिक मानवी मूल्य फ्रेंच राज्यक्रांतीपासून घेतली नसून भारताच्या वर उल्लेखिलेल्या परंपरेतून स्विकारली असे विधान केले.  याच आधारावर इतिहासाचे मूल्यमापन, वर्तमानाची रणनिती व भविष्याचा वेध घेता येतो. 

आज फुले-आंबेडकरी चळवळ केवळ `राजकीय सत्ता म्हणजे विधानसभा व लोकसभा निवडणूख आणि ही केवळ दोनच सभागृहे' यात अडकलेली दिसते. आणि याही आघाडीवर ती एका `अनाकलन्यी चक्रव्यूहात' अडकल्याचे दिसते. याचे वैचारिक व तत्त्वज्ञानाच्या पातळीवर तटस्थपणे - गांभीर्याने विश्लेषण करण्याची ऐतिहासिक निकड निर्माण झाल आहे. नसता सत्ताधारी राजकीय पक्षांसमोर `राजकीय कटोरा' घेऊन उभे राहण्याची पाळी येत आहे. त्याला प्रस्थापित पक्ष नेते जबाबदार नाहीत तर फुले-आंबेडकरी चळवळीतील नेते व पक्ष-संघटना जबाबदार आहेत.  हे वैचारिक आव्हान फुले-आंबेडकर - मार्क्स-विचारांचा समन्वय साधू पहाणारे आणी भारतीय संदर्भात गांधी-आंबेडकर-लोहिया परंपरा जपणारे नेते, कार्यकर्ते, अभ्यासक, विचारवंत, लेखक, कवी, चित्रकार, कलाकार या साऱ्यांनी स्विकारायला हवे. 

संघटनात्मक आव्हान -  परिवर्तनाचस्या प्रक्रियेत जागृत जनसमुहांबरोबरच नेता आणि संघटनेचे महत्त्व खूप आहे. बाह्य परिस्थिती समजून घेऊन तिच्यातील अंतर्विरोध जाणून घेऊन त्यानुरुप संघटना उभारावी लागते. हे साधन स्विकृत विचारसरणी-तत्त्वज्ञानावर हुकूम असावी लागते. हे संघटना साधन विविध पातळयांवर विकसीत करावे लागते. तेव्हाच नेत्याची शक्ती व क्षमता प्रचंड वाढताना दिसते. व ती पक्ष-संघटनेमार्फत अविष्कृत झालेली दिसते. 

याचा आलेख मार्क्स-लेनिन यांनी पक्ष-संघटनेवरील टिपणात मांडलेला आहे. आरएसएसच्या डॉ.हेडगेवार व  गोळवलकर यांनी `एकचालकानुवर्तीत्वाधारित' पक्ष-संघटनेचा सिद्धांत मांडला व तशी पक्ष-संघटना उभारण्याचा प्रामाणिक प्रयत्नही केला. डॉ.राम मनोहर लोहिया यांनी `साध्य-साधन' सिद्धांतानुसार समाजवादी पक्ष उभारण्याचा प्रयत्न केला. महात्मा गांधींच्या स्वप्नातील भारत, समाजसेवी पक्ष-संघटना व सत्ता राबविणारा पक्ष प्रत्यक्षात कधी आलाच नाही. मात्र सर्व सेवा संघ व सर्वोदय मंडळ काही प्रमाणात त्यांच्या व्यासपीठावर सक्रिय राहिले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाचा कार्यक्रम तयार केला. भारतीय संविधान बनविण्यात मोठे ऐतिहासिक योगदान दिले आणि शेवटी भारतीय जनतेला उद्देशून एक खुले पत्र लिहिले. या पत्रात बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (भारतीय रिपब्लिकन पक्ष) ची संकल्पना मांडली. 

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला समर्थ पर्याय म्हणून बाबासाहेबांनी भारिपकडे पाहिले होते. त्या आधारावर त्यांच्या अध्यक्षतेखाली व समाजवादी नते डॉ.राम मनोहर लोहिया यांच्या सरचिटणीस पदाखाली `नवा पक्ष' उभारण्याचा निर्णयही झाला होता. ही संकल्पना व संघटना समजून घेण्यात तमाम समाजवादी व आंबेडकरवादी कमी पडले हे मात्र येथे विनम्रपणे नमूद करीत आहे.  फुले-आंबेडकरी चळवळ अन्याय अत्याचाराच्या विरोधात केवळ एक तात्कालीक-प्रतिक्रिया म्हणून बोलताना व क्षणिक कृती करताना दिसते. त्यातून राजसत्तेला-प्रस्थापिताला या `प्रतिक्रियेला' साजेशी `प्रतिक्रिया' देवून हा प्रश्न `अराजकीय व भावनिकतेच्या पातळीवर' न्यायला संधी व उसंत मिळते. नामांतर, खैरलांजी आणि रमाबाईनगर चे प्रकरण ही उत्कृष्ट उदाहरणे आहेत. या विचारभ्रमातून आपण कधीच खरीखुरी फुले-आंबेडकरवादी पक्ष-संघटना उभारणार नाही. 

14 एप्रिल, 6 डिसेंबर व धम्म चक्र प्रवर्तन दिनादिवशी लोटणारा आंबेडकरी जन महासागर म्हणजेच पक्ष-संघटना हे आपण मानतो ही मोठी चूक आहे. आंबेडकरी जनतेचा घोर अपमान आहे. यातून आपण लवकर बाहेर यायला हवे. फूले-आंबेडकरी चळवळी बाहेरील सर्वांनाच `दलित ऐक्य-रिप.ऐक्य' हवे आहे. मात्र रिपब्लिकनांच्या -फुले-आंबेडकरवाद्यांच्या-दलितांच्या-बहुजनांच्या नेतृत्वाखाली सर्व परिवर्तनवादी एकत्र यायला तयार आहेत का हे मोठे प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे रिपब्लिन पक्ष-संघटना उभी करताना प्रथम संकल्पना स्पष्ट केली पाहिजे. ती सर्व बहुजन स्त्राr-पुरुषांसह तमाम जनतेची प्रतिनिधी कशी होईल याची कार्यपद्धती, रणनिती व कार्यक्रम तयार करणे आणि राबविणे यासाठी खूप मोठी कार्यकर्त्यांची फळी हवी. 

साधनसामुग्री म्हणजे काय। -सध्या `राजकारण' म्हणजे `सत्ता' म्हणजे `निवडणूक' म्हणजे `पैसा' आणि त्यातील एक साधन `गुंडगिरी व जात' तीही `वरिष्ठ' जात असे समीकरण प्रस्थापित वर्ण-जातींनी मांडले. ते शोषित-उपेक्षित-बहुजनांनीही तसेच उचलले. परिणामी बहुजनांचे, फुले-आंबेडकरवाद्यांचेही तेच `मॉडेल' बनण्यासाठी जिवाचा आटापिटा चालू आहे. परंतु एक वास्तव विसरून चालणार नाही. मोगल-इंग्रजांपासून भारतीय शासन सत्तेवर व संस्कृतीवर, साधन सामुग्रीवर मांड ठोकून बसलेल्या उच्च वर्ण-जातींना 500-600 वर्षे मिळाली. स्वातंत्र्यानंतर तर 45 वर्षे लाभली. त्यात त्यांनी त्यांची मनुष्यबळासह सर्व संस्था व साधन सामुग्रीवर कब्जा मिळविला. त्यांना हवे तसे विकासाचे मॉडेल -रस्ता तयार केला. 

या प्रस्थापिता विरोधात जाऊन बहुजनांची तीही फुले-आंबेडकरवादी बहुजनांची सर्वंकष सत्ता उभी करायची आहे. आणि त्यासाठी 500-600 वर्षे सोडाच पण 40-45 वर्षेही थांबायला कुणाला वेळ नाही. सर्वच जण `हातघाईला' आले आहेत. त्यातूनच आजचा `संसदीय खेळ' चालू आहे. प्रस्थापिताच्या मैदानात त्यांच्या नियम व कार्यपद्धतीने खेळून फुले-आंबेडकरवादी बहुजन कधीच सर्व सत्ताधीश बनणार नाहीत. त्यासाठी खूप तयारी करावी लागेल. साधनसामुग्रीची व्याख्या करताना पैसा, अशिक्षित कार्यकर्ता फळी, गाव-वाडी-तांडा-वॉर्ड निहाय मजबूत संघटन, महिला, युवक, विद्यार्थी, आदिवासी, भटक्या-विमुक्तांचे प्रभावी संघटन व चळवळ, स्वत:ची अभिनव कार्यपद्धती, संवाद माध्यमे, प्रसिद्धी-जनसंपर्काची आधुनिक माध्यमे, संस्था-व्यासपीठ, उद्योगधंदे (कृषीसह) याचा विचार केला पाहिजे. स्वतंत्र नवे नेतृत्व उभे करावे लागेल. याचा अर्थ स्वत:ची साधन सामुग्री स्वत:च उभी करावी लागेल. प्रस्थापितांवर अवलंबून राहून तशीच उभी करायला गेलो तर प्रस्थापितांचे बाहुले-पोपट-मांजर पर्यायाने गुलाम बनून आयुष्य काटावे लागेल. परिवर्तनवाद्यांमध्ये रिपब्लिकनांमध्ये याचे `उत्कृष्ट आदर्श नमुने' ह्यात आहेत.  हे नवे आव्हान पेलण्याची बौद्धिक, वैचारिक, संघटात्मक व साधनसामुग्रीसह शक्ती आपण उभे करणार का? 

शिका-संघटीत व्हा-संघर्ष करा - बाबासाहेबांनी या मार्गांचा अवलंब केला. त्यांच्या हयातीत काही प्रयोग व परिणामही दाखविले. आपल्याला स्वातंत्र्यानंतरच्या स्वराज्यात शिक्षण, अर्थव्यवस्था, शअसनसंस्था, उद्योग व्यवसाय, सामाजिक राजकीय व्यवस्था कशी असावी याविषयी काही मांडणीही केली. या चळवळीत भारतीय इतिहासात प्रथमच महिला मोठ्या संख्येने आल्या. डॉ.बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतातील `मूक' महिलांना `नायक' बनविले. स्वत:ची अस्मिता व अस्तित्व दाखवून दिले. त्यांना गुलामीत लोटणाऱ्या चातुर्वर्ण्याधिष्टीत व्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या मनृस्मृतीचे महाडला दहन केले. एवढी वैचारिक झिणझिण्या आणणारी चळवळ बाबासाहेबांनी उभी केली. या महिला त्याच प्रेरणेने, तडफेने बाबासाहेबांच्या 53व्या महापरिनिर्वाण दिनानंतरही फुले-आंबेडकरी चळवळीत आहेत. किंबहुना 25 डिसें. मनुस्मृतीदिन हा भारतीय स्त्री-पुरुष समता दिन पर्यायाने भारतीय स्त्री-मुक्ती दिन मानण्यासाठी हजारोंच्या संख्येने दरवर्षी एकत्र जमत आहेत. राजकीय समतेबरोबरच सामाजिक-लैंगिक व आर्थिक समतेचे चक्र फीरविण्याच्या प्रक्रियेत आपल्या वाटा उचलत आहेत. या महिला समूहाने आजपर्यंत अशी एकही कृती केली नाही जी समता, स्वातंत्र्य व लोकशाही विरोधी आहे. तरीही दोन-चार महिला नेत्या वगळता फुले-आंबेडकरी चळवळीतून महाराष्ट्रात महिला नेत्या का पुढे आल्या नाहीत? याचे उत्तर शोधणे हे एक मोठे आव्हान आहे. 

आज फुले-आंबेडकरी चळवळ अन्याय अत्याचाराची वाट पाहताना दिसते. तशी निवडणुकीचीही वाट पहाते. स्त्री-शूद्रातिशूद्रांसह तमाम जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठवून शक्तीशाली जनचळवळ उभे करण्याची क्षमता असतानाही तात्कालीन प्रतिक्रियावादी बनली आहे. गावरान-जंगल जमिनीचा प्रश्न, सहकारी साखर कारखानदारीतील भ्रष्टाचार व घराणेशाही, नामांतर व मंडलची सांगड घालून त्यामागील राजकारण उघड करण्याची प्रदीर्घ प्रक्रिया, राज्यव्यापी - गाव - तांडा - वाडीपासून शहरापर्यंत नेते व कार्यकर्त्यांची सतत फिरणारी जनसंवाद करणारी फळी, फुले-आंबेडकरी विचारांचा राजकीय-पक्ष संघटना व कार्यकर्त्यांची प्रचंड फळी उभी करण्याचा भाबम चा संकल्प आणि लोकसभा निवडणुकीत पराभव, विधानसभेत मूठभत विजय पण स्थानिक स्वराज्य संस्थांमधआये जिप.पं.स., ग्रा.प. मध्ये विजयाची साखळी उभी राहात होती. हे सारे तटस्थपणे समजून घेण्याची तयारी आहे का? 

येत्या दोन दशकांचा राजकीय-सामाजिक सत्तेचा आराखडा मांडून नव्याने खेळ सुरू करण्याचे आव्हान फुले-आंबेडकरी समूह स्विकारणार का? जनता वारंवार संधी देत आहे. 

शांतराम पंदेरे - औरंगपुरा,  औरंगाबाद-431001 

 91-9421661857 


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. A boring tool enlarges holes which have already been drilled to create even greater precision. Factories want to improve their production by adopting automation applied sciences. The desire of factories to provide work pieces effectively and efficiently is the CNC machine market driving components. From cutting, designing, drilling, turning operation are easy with a CNC lathe. The ease of working with these automation devices function a serious market driving factor. CNC lathes typically only have two primary axes of motion, with the stationary tool moving linearly in X and Y while the workpiece Direct CNC spins.

    उत्तर द्याहटवा

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com