Top Post Ad

इंदुरी गावात वगसम्राट दादू इंदुरीकर यांचा अभिवादन दिन सभेचे आयोजन

मुंबई- गाढवाचं लग्न या अजरामर वगनाट्यासह आपल्या कलाकृतीने  नाट्यक्षेत्रात  आपल्या कलेचा ठसा उमटविणारे राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त  वगसम्राट दिवंगत दादू सरोदे - इंदुरीकर यांच्या  ४२ व्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या जन्मगाव इंदुरी (पुणे जिल्हा ) येथे सोमवार दिनांक  १३ जून रोजी सकाळी ११ वाजता अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे . 

वगसम्राट दादू इंदुरीकर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर . जेष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे , दादू इंदुरीकर यांचे द्वितीय  पुत्र राजू दादू इंदुरीकर , गाढवाचं लग्न फेम दिवाणजी वसंत अवसरीकर ,वंचितचे  नेते वसंतराव साळवे , विठ्ठलराव शिंदे ,बबनराव ढोरे ज्योतीताई शिंदे यांच्यासह कलाक्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत . 

दादू इंदुरीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षात येणाऱ्या या स्मृतिदिनी त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी कलाक्षेत्रातील व इंदुरीकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेने सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वगसम्राट दादू इंदुरीकर प्रतिष्ठानचे संस्थापक सरचिटणीस अशोक सरोदे - इंदुरीकर व आयोजन समितीने केले आहे 



दादू इंदूरीकर : अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
   
G PAY : 8108603260


बातम्या तसेच संस्था संघटनांचे वृत्त प्रसिद्धीकरिता इमेल....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रतिनिधी / पत्रकार होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1