Top Post Ad

खरे क्रांतीकारक, स्वातंत्र्यवीर ...?



विनायक आणि बाबाराव असे एकाच वेळी दोन दोन सावरकर भाऊ काळ्या पाण्याची सजा भोगत होते, काय क्रांतीकारक घराणं ? असा प्रचार केला जातो. पण गांधीजींचं सारं कुटुंबच्या कुटुंब स्वातंत्र्याच्या लढ्याला वाहून घेतलेलं होतं. दक्षिण आफ्रिकेच्या लढ्यात एकाच वेळी तीन-तीन, चार-चार गांधी तुरुंगात होते. मोतीलाल, जवाहरलाल, त्यांची पत्नी, बहीण असे सर्व नेहरु भारतीय स्वातंत्र्यलढ्यात लढत होते. अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. प्रभावती आणि जयप्रकाश, उत्तमराव पाटील, शिवाजीराव पाटील त्यांच्या मातोश्री आणि लिला पाटील तर पत्री सरकाराच्या काळात हाती बंदुका घेवून लढले. शहिद शिरोमणी सरदार भगतसिंग यांच्या तर तीन पिढ्या स्वातंत्र्यासाठी लढल्या. आजोबा अर्जुनसिंग, वडिल किसनसिंग, चुलते अजितसिंग आणि भगतसिंग, भगतसिंग यांच्याबद्दल निदान बहुतेकांना थोडंफार माहीत असतं. पण अजितसिंह यांच्याबद्दल क्वचितच कोणाला काही माहिती असेल.

सरदार अजितसिंग यांनी स्वातंत्र्य चळवळीत कारावास भोगला होता. त्यांना पंजाबमधून हद्दपार करण्यात आलं होतं. ते बोटीतून कराची मार्गे निसटले. इराण, तुर्कस्तान, स्वित्झर्लंड, फ्रांस, जर्मनी अशा विविध देशांत जाऊन स्वातंत्र्यलढ्यासाठी कुमक मिळवण्याचा आणि स्वातंत्र्यलढा उभारण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. पण पहिल्या महायुद्धात जर्मनीची पिछेहाट झाली आणि अजितसिंगांना ब्राझीलला जावं लागलं. तिथे सोळा वर्षे राहून ते पुन्हा पॅरीस, फ्रान्सला आले. १९३२ साली सुभाषबाबू औषधोपचारासाठी व्हीएन्नाला गेले असतांना अजितसिंगांनी त्यांची तिथे जाऊन भेट घेतली. रोमला जाऊन मुसोलिनीची भेट घेतली. इंग्रजांच्या नजरकैदेतून निसटलेल्या सुभाषबाबूंची त्यांनी हिटलर-मुसोलिनीशी भेट करवून दिली आणि नेताजींना एक लाख रूपयेही दिले. आझाद हिंद सेनेच्या निर्मितीच्या कार्यात अजितसिंगांनी मोलाची कामगिरी बजावली. पण पुन्हा जर्मनीचा पाडाव झाल्याने त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. अजितसिंग दोस्त सेनेच्या तावडीत सापडले आणि त्यांची तुरूंगात रवानगी झाली. तुरूंगात त्यांचे खूप हाल झाले. पुढे १९४६ साली भारताचं स्वातंत्र्य जाहीर झाल्यावर त्यांची सुटका झाली. पंडीत नेहरूंनी त्यांना दिल्लीला आणण्याची व्यवस्था केली. दिल्लीच्या नागरिकांनी मानपत्र देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या लाहोरच्या सत्कार सभेला पाच लाख लोक जमले होते.

"भारतीय युवक भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांसारखे कुर्बानीचे पुतळे होवोत आणि 'इन्किलाब जिंदाबाद' चा नारा बुलंद करत क्रांतीसाठी प्राणार्पण करोत," असं आवाहन त्यांनी १९४७ साली भारतीय युवकांना केलं होतं. आपलं घरदार आणि आजारी पत्नीला सोडून ते चाळीस वर्षे परदेशात राहिले. धडपडत राहिले. त्यांचा त्याग, त्यांचं स्वातंत्र्यलढ्याप्रतीचं समर्पण, त्यांनी सोसलेल्या हालअपेष्टा, आशानिराशेच्या वावटळीत त्यांच्या वाटेला आलेला वनवास यांचा विचार केला तर त्यापुढे माफीवीर सावरकरांचं लढणं म्हणजे लुटूपुटूची लढाईच वाटते. चाळीस वर्षांच्या धकाधकीच्या जीवनाने अजितसिंगाचं शरीर इतकं खंगलं होतं की ते परतले तेंव्हा त्यांच्या पत्नीलाही ते ओळखू आले नाहीत. १४ ऑगस्ट १९४७ च्या रात्री ते झोपले नाहीत. त्यांनी माऊंट बॅटन यांचं भाषण ऐकलं. पंडित नेहरूंचं भाषण ऐकलं. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं, ते झोपी गेले. पहाटे चार वाजताच उठून त्यांनी सर्वांना बोलावलं. माझं आयुष्याचं ध्येय पूर्ण झालं, मी आता निघालो असं ते म्हणाले. "फाळणीमुळे रक्ताचे पाट वाहतील याची ना नेहरूंना ना जिनांना कल्पना. माझ्याच्याने हे पाहवणार नाही, 'मी निघून जाईन' असं ते म्हणाले. ते पुन्हा परदेशात निघून जातात की काय असं घरच्यांना वाटलं, त्यावेळी अजितसिंगांनी आपल्या जगभराच्या साथीदारांना शेवटचा संदेश देण्यासाठी त्यांचा शेवटचा निरोप लिहून घ्यायला सांगितला. पण डॉक्टरांनी मनाई केली. अजितसिंग म्हणाले, “ठिक आहे! नका लिहू! जगातले लोक नंतर तुम्हाला दोष देतील." त्यांनी आपल्या पत्नीला बोलावलं आणि म्हणाले, "मी तुझ्याशी लग्न केलं होतं. तुझी सेवा माझं कर्तव्य होतं. पण मी भारतमातेच्या सेवेत मग्न राहिलो. मला माफ कर." अजितसिंहांनी सर्वांना हात जोडले. 'जयहिंद'ची घोषणा दिली. तुम्हाला माझा शेवटचा नमस्कार म्हणाले... आणि तक्क्यावर मान टाकली. आपल्या गण्यातूनच नाही तर मरण्यातूनही क्रांतीकारकाचं दर्शन घडवलं सरदार अजितसिहांनी, सरदार भगतसिंहांनी! १२२ 

भगतसिंग, सुखदेव, राजगुरू असो की अजितसिंग, क्रांतीसिंह नाना पाटील व त्यांचे साथीदार असो, ते निधड्या छातीचे क्रांतीकारक होते. त्यामुळे खोटेपणा, लबाडीला त्यांच्या विचारविश्वात स्थान नव्हतं. समोरासमोर लढून छातीवर वार करणाऱ्या या योद्ध्यांची मने माथेफिरू गुन्हेगारांप्रमाणे कोणाच्या तरी खुनाच्या कल्पनेने पछाडलेली नव्हती. त्यांच्यापुढे सुखी, समताधारीत शोषणमुक्त नवसमाज निर्मितीचं स्वप्न होतं. याउलट मानसिकता सावरकर आणि सावरकरवाद्यांची आहे. त्यांचा परमशिष्य, गांधीजींच्या हत्येत सहभागी एक खुनी, गोपाळ गोडसे आपल्या एका मुलाखतीत म्हणतो, "राजकारणात तुम्ही अहिंसेचे पालन नाही करू शकत. प्रामाणिक नाही राहू शकत. प्रत्येक क्षणी तुम्हाला हातात बंदूक घ्यावी •लागते व कुणाला तरी ठार करावे लागते..."  ही केवळ गोपाळ गोडसेची मानसिकता नाही. ही केवळ नथुराम वा सावरकरी मानसिकता नाही तर प्राचीन काळापासून आजपावेतो चालत आलेल्या संपूर्ण सनातनी ब्राह्मणी परंपरेची मानसिकता आहे. सम्राट बृहद्रथाचा खून करून, हजारो बौद्धांच्या हत्या करणाऱ्या पुष्यमित्र शुंगापासून, छत्रपती शिवराय, संतश्रेष्ठ नामदेव महाराज, जगत्गुरू तुकाराम महाराज, संत चोखोबा, महात्मा गांधी ते थेट दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेशच्या हत्येमागे हीच खुनी ब्राह्मणी मानसिकता आहे. महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू छत्रपती यांच्या खुनाचे प्रयत्न करणाऱ्यांमागे हीच मानसिकता होती. हेमंत करकरेंनी हिंदू दहशतवाद्यांच्या सर्व कारस्थानांचा दंभस्फोट करेपर्यंत असं सांगितलं जात होत की प्रत्येक मुसलमान अतिरेकी नाही, पण प्रत्येक अतिरेकी मुसलमान आहे. हिंदुत्ववादी असा प्रचार करून जनसामान्यांना भ्रमित करतात आणि मुस्लिम द्वेष भडकवतात. याच चालीवर म्हणायचं झालं तर प्रत्येक ब्राह्मण अतिरेकी नाही, पण बहुजन हिताचा विचार मांडणाऱ्या, जन्माधिष्ठीत श्रेष्ठतेवर आधारीत ब्राह्मणी हितसंबंधांना धोका निर्माण करणाऱ्या प्रत्येक विचार आणि प्रत्येक महापुरूषाची हत्या करणारे वा करवणारे ब्राह्मणच आहेत.

खरे क्रांतीकारक कसे असतात? कसे जगतात? कसे लढतात? ते समजून घ्यायचं असेल तर १९४२ चा प्रतिसरकारचा लढाही समजून घ्यायला हवा. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातलं एक धगधगतं पर्व म्हणजे प्रतिसरकार! ९ ऑगस्ट १९४२ या दिवशी मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर भरलेल्या प्रचंड सभेत महात्मा गांधीजींनी, इंग्रजांना 'भारत छोडो' चा आदेश दिला आणि भारतीयांना 'करेंगे या मरेंगे' चा संदेश दिला. उभा देश पेटून उठला. सभा, मोर्चे, हरताळ यांना पूर आला. इंग्रजांचं शासन ठप्प करण्यासाठी रेल्वेगाड्या, रेल्वेस्टेशन, शासकिय कचेऱ्या, पोष्ट कचेऱ्या, पोलिसचौक्या उध्वस्त करण्याची लाटच उसळली होती. या लढ्याचे नायक होते क्रांतीसिंह नाना पाटील! नाना पाटील यांनी आठ वेळा स्वातंत्र्यासाठी तुरूंगवास भोगला होता. स्वातंत्र्यासाठी आयुष्य वाहून टाकलं होतं. स्वतःच्या कुटुंबाकडे पाठ फिरवून, गोरगरिबांना सुखाचे दिवस यावेत यासाठी स्वातंत्र्याच्या लढ्यात उभं आयुष्य झोकून दिलं होतं. नाना पाटील आणि त्यांचे सहकारी असलेल्या जी. डी. लाड बापू, नागनाथ अग्णा नाईकवाडी, यशवंतराव चव्हाण, बर्डे मास्तर, रामभाऊ लाड, किसन वीर, वसंतदादा पाटील, उमाशंकर पांड्या, पांडू मास्तर, धोंडीराम माळी, उत्तमराव पाटील, लिला पाटील अशा अनेक सहकाऱ्यांनी त्यागाचे, पराक्रमाचे, सोशिकतेचे, हालअपेष्टा सहण्याचे अनेक नवे मापदंड निर्माण केले. सांगली, सातारा या मोठ्या इलाक्यातून इंग्रज शासन पूर्णत: नष्ट केलं. संघटन, नियोजन आणि कृतीच्या माध्यमातून त्यांनी आपली जिद्द, हिम्मत, त्याग आणि शौर्याचं जे दर्शन घडवलं, ते विस्मित करणारं होतं. यात केवळ पुरूषच नव्हते तर कॅ. लिला पाटील, राजमती पाटील, गंगूताई लाड (क्रांतीसिंहांच्या भगिनी) त्याचप्रमाणे हौसाबाई पाटील (क्रांतीसिंहांची मुलगी), लक्ष्मीबाई नाईकवाडी (नागनाथ अण्णांची आई), विजयाताई लाड (जी. डी. बापूंच्या पत्नी), नगा अक्का यांच्या बरोबरच गीताबाई खरे, सरस्वती कुलकर्णी, ताराबाई गुरव, हिराबाई जोशी, इंदिराबाई देशपांडे, सिंधू नलावडे, सोनूताई देशपांडे, मुक्ताबाई नारकर, इंदुमती पाटणकर, गंगूताई पाटील, गीता पाटील, धोंडूताई मस्कर, सीताबाई माळी, कमलाबाई मोरे, मैनाताई यमगर, इंदूबाई वाळवेकर, रतनबाई शहा अशा असंख्य स्रिया या क्रांतीयज्ञात सामील झाल्या होत्या. या स्त्रियांनीही अतुलनीय धाडस आणि पराक्रमाचा इतिहास रचला. धोंडिराम वडार, निवृत्ती कळके, गोपाळ वडार, शंकरराव नाईकवाडी, शंकर इनामदार, एस. बी. पाटील, आप्पा धनगर, शामराव जाधव, सावळेराम एडके, ज्ञानू वस्ताद, दत्तू जाधव, बाजीराव पाटील, बाबूराव परीट अशा असंख्य स्वातंत्र्यवीरांनी पराक्रमाची शर्थ केली. ज्यांनी हिटलर, मुसोलिनीला पराभूत केलं, दोन महायुद्धे जिंकली, त्या इंग्रजांना या साध्याभोळ्या स्वातंत्र्यवीरांनी अक्षरश: धूळ चारली. हा सारा इतिहास जितका रोमहर्षक आहे, तितकाच वेदनादायी आहे.

प्रतिसरकारच्या 'तुफान महिला दला'च्या कॅप्टन लिलाताई पाटील होत्या. त्यांचे पती उत्तमराव पाटील 'तुफान दलाचे कॅप्टन होते. त्यांनी धुळ्याचा खजिना लुटला होता. उत्तमरावांच्या मातोश्री वेणूताई स्वातंत्र्यासाठी तुरूंगात गेल्या. तिथेच त्यांचं निधन झालं. उत्तमरावांचे धाकटे भाऊ दशरथ आणि शिवाजीसुद्धा स्वातंत्र्यासाठी तुरुंगात गेले होते. बेचाळीसच्या लढ्यात साने गुरुजींच्या आवाहनानंतर अमळनेर पेटलं. स्वातंत्र्यसैनिकांनी पोष्ट ऑफिस जाळलं. कोर्टकचेरीची राखरांगोळी केली. पोलिसांच्या गोळ्यांच्या वर्षावात हाती तिरंगा घेऊन लिलाताई निर्भयपणे पुढे सरकत होत्या. पोलिसांनी त्यांना बंदुकीच्या दस्त्याने मारहाण केली. दीर, भावजयांसह सर्वांना अटक करुन तुरुंगात टाकलं. मारहाणीमुळे लिलाताईंचा गर्भपात झाला. असह्य वेदनांनी त्यांना भ्रमिष्ट झाल्यासारखं झालं. अमळनेर जळीत खटल्यात त्यांना साडेसहा वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा झाली. ' तुरुंगात खूप यातना सहन कराव्या लागल्या. अंधार कोठडीत ठेवण्यात आलं. आंघोळीला साबण नाही, केसांना तेल नाही, एकांतवासाची शिक्षा. साने गुरुजींनी प्रयत्न करुन त्यांची येरवड्याला बदली केली. बंदुकीच्या दस्त्याच्या माराने कंबरदुखी मागे लागली. ताप येऊ लागला. शेवटी त्यांना ससून रुग्णालयात ठेवण्यात आलं. एके दिवशी कडक पोलिस बंदोबस्तात असतांना भर दिवसा लिलाताईंनी पोलिसांच्या हातावर तुरी दिली आणि त्या फरार झाल्या. त्यांचा दिर शिवाजीही तुरुंग फोडून फरार झाला होता. हे सावरकर भक्तहमा का दान दान भाऊ तुरुंगात. दोन दोन भाऊ तुरुंगात. आणि ऐकणाऱ्यांनाही खूप कौतुक वाटतं. पण इथे आख्खी घरंच्या घरं तुरुंगात जात होती, छळ सहन करत होती. धारातिर्थी पडत होती, त्यांच्या शौर्याची, लढ्याची, त्यागाची साधी दखलही इथल्या लेखणी बहाद्दरांनी घेतली नाही हे समजल्यावर आजही समाज कशी खोटी दैवतं पुजतो आहे vec delta लक्षात येऊन मन खिन्न झाल्याशिवाय रहात नाही आणि त्याचवेळी या क्षुद्र आणि नीच वृत्तीची चीडही आल्याशिवाय रहात नाही. या वीर स्त्री-पुरुषांच्या पराक्रमांपुढे सावरकरांचे तथाकथित पराक्रम म्हणजे फुळ्ळुक पाणीच ?

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनाही या भूमिगत काळात आपला भाऊ गमवावा लागला. यशवंतरावांना पकडण्यासाठी वेणूताईंनाही अटक करण्यात आली होती. लग्नानंतर काही महिन्यातच बेचाळीसचा लढा सुरू झाल्याने यशवंतराव भूमिगत होते. ते प्रतीसरकारचे पहिले डिरेक्टर होते. त्यांना पकडण्यासाठी बक्षिस लावण्यात आलं होतं. यशवंतराव सापडत नाहीत म्हणून कुटुंबातल्या लोकांना अटक करुन पोलीस छळत होते. धाकट्याला सोडवण्याच्या तीव्र इच्छेपायी यशवंतरावांच्या थोरल्या भावाने डॉक्टर नको नको म्हणत असतांना स्वतःचं ऑपरेशन करुन घेतलं. पण जखमेत सेप्टीक होऊन त्यात या थोरल्या भावाचा मृत्यू झाला. वेणूताई अटकेत असतांना शिपायाने जोरात पोटावर लाथ मारल्याने वेणूताईंचा गर्भपात झाला, पुन्हा आयुष्यभर त्यांना मूल झालं नाही. त्यांनी कधीही या घटनेचं भांडवल केलं नाही. पण अत्रेंनी असभ्यपणे यशवंतरावांच्या निपुत्रिकपणावर शेरेबाजी केली तेव्हा यशवंतरावांनी दु:खाने या घटनेचा उच्चार केला. तोही अतिशय संयमीत व सभ्य भाषेत ! सावरकरांच्या कुटुंबातल्या कोणत्या स्त्रीने असा त्रास कधी सहन केला? तरीही सावरकर स्वतःलाच दिवे ओवाळून घेतात या वृत्तीने त्यांच्याबद्दलचा आदर आणखीनच घटला.

प्रतिसरकारचा जोर सांगली, सातारा इलाक्यात जास्त असला तरी कोल्हापूर, नगर, नाशिक, बेळगाव, धुळे, विदर्भ, गोवा, तेलंगणापर्यंत त्याचीव्याप्ती वाढत गेली. मुंबईच्या चाळीचाळीतून युवक संघटना स्थापन झाल्या. २२६ त्यात चाळीस हजार युवक सामील झाले होते.'नागनाथअण्णा नाईकवाडी यांच्या तुकडीने तर पोलिसांशी युद्धच केलं. पोलीस पळून गेले. पण किसन अहिर आणि नानक सिंग हे दोन स्वातंत्र्यसैनिक तारळेकर कॉन्स्टेबलने शरण यायचं नाटक करून अचानक केलेल्या गोळीबारात ठार झाले.ऑक्टोबर १९४२ ते जानेवारी १९४३ दरम्यान कोरेगांव ते मिरज, मिरज vec d कोल्हापूर, सांगोल्यापर्यंत मिरज वगळता सर्व रेल्वे स्टेशनं जाळून टाकण्यात आली होती. रेल्वेरूळ उखडण्यात आले होते. रेल्वे, तार, फोन, वाहतूक कुचकामी झाली होती. तार व्यवस्था, टपाल व्यवस्था नष्ट करण्यात आल्या. सरकारी कचेऱ्या, डाकखाने, दप्तरं जाळून टाकण्यात आली.
तूफान है हम, तूफान है। राख करेंगे, खाक करेंगे, मिटा देंगे।
प्रतिसरकारच्या तुफान सेनेचं हे स्फूर्तीगीत होतं. भूमिगत असताना पकडले गेलेले उत्तमराव पाटील पोलिसाला ठोसा मारून निसटले. जुन्या संडासच्या मागील घाणीचं दार उघडून त्या घाणीत लपून बसले. तिथून घाणीने बरबटलेल्या अवस्थेत बाहेर पडले आणि एका घराच्या जिन्यावरून उडी मारली ती पडली थेट आबीर बुक्याच्या ढीगात पडली.. मग अंगावरचे कपडे फाडून, नुसती लंगोटी लावून वेडयाचं सोंग करून भाकरी मागत मागत त्यांनी पंढरपूरहून आटपाडी गाव गाठलं.

जी. डी. लाड overline 91q , नागनाथअण्णा नाईकवाडी, उत्तमराव पाटील आणि सहकाऱ्यांनी धुळ्याचा खजिना रेल्वे थांबवून लुटल्यावर त्यांचा पाठलाग सुरु झाला. क्रांतीकारक खजिन्याचं ओझं घेऊन पळत होते. वीस पंचवीस हत्यारी पोलीस, आड हत्यारी पोलीस आणि दीड-दोनशे जागले त्यांचा पाठलाग करत होते. त्यांच्याजवळ घोडी होती. पोलिसांकडे २५ रायफली तर क्रांतीकारकांकडे फक्त दोन रायफली आणि वीस गोळ्या... पण प्रत्येक गोळी पोलिसाला निशाणा करत होती. फक्त जी. डी. बापू लाड आणि नागनाथअण्णा यांनी एवढा जमाव रोखून धरला होता आणि बाकीच्यांना निसटून जायला मदत केली होती. पोलिसांची एक गोळी जी. डी. लाडबापूंची पिंढरी फोडून गेली. दुसरी एक नागनाथ अण्णांच्या खांद्याला आघात करुन गेली. पण शेवटच्या दोन गोळ्यांनी दोन पोलिसांचा वेध घेतला आणि पोलीस हादरले. सर्व गावाकडे पळाले. रात्र झाली. पोलीस गावाकडे परतले. अनवाणी, पिंढरी फुटलेल्या पायाने, ठणकणाऱ्या खांद्यासह ही जोडगोळी आपल्या वाटेला लागली. लुटलेला खजिना नानासाहेब देवरेंच्या देऊर गावी, त्यांच्या घरी लपवून, तिथे जेवण करुन मंडळी तळोद्याला गेली.'

उत्कृष्ट नियोजन, पराकोटीचे धाडस आणि अभिनव युद्धशास्त्राचा परिचय करून देणारे असे शेकडो प्रसंग या प्रतिसरकारच्या काळात घडले. त्यातून या क्रांतीकारकांच्या धाडसाचं, शौर्याचं, बुद्धिमत्तेचं दर्शन घडतं. या क्रांतीकारकांच्या पराक्रमाच्या इतिहासाच्या उजळण्या किमान या मराठी मातीतल्या घराघरातून व्हायला हव्या होत्या. पण आज जर पहाणी केली तर असं दिसेल की पाच-दहा लाखात एखाद्यालाच या गौरवशाली इतिहासाचं भान असेल. ज्या क्रांतीकारकांनी स्वातंत्र्यासाठी आपली आयुष्यं उधळून दिलीत, संसार वाऱ्यावर सोडले, रक्त सांडलं, बलिदान केलं, अपरिमित हालअपेष्टा सोसल्या त्यांच्या पराक्रमाच्या गाथा विस्मरणाच्या जळात बुडून जाव्यात आणि एक माफीवीर क्रांतीकारक स्वातंत्र्यवीर म्हणून समाजात प्रस्थापित व्हावा यासारखी अन्यायाची पराकोटी कोणती? हिणकस, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कलमकसायांची ही दुष्ट कृत्ये समाजाला कधी उमजणार? कधी लोक शहाणे होणार? कधी खरा इतिहास समजावून घेणार? कधी असत्याची पुटं दूर होऊन निर्मळ सत्याचं समाजाला दर्शन घडणार? किती काळ अजून या देशात असत्याची चलती राहणार? या विचाराने मस्तक भणाणून जातं.

हजारो वर्षे उलटूनही, वर्णव्यवस्थेचा पगडा किती भक्कम आहे; विज्ञानयुगातही या वर्णव्यवस्थेच्या समर्थकांचे मेंदू कसे सडलेले आहेत, याचाच प्रत्यय जगतांना असा पुन्हा पुन्हा येत असतो. युगपुरुष छत्रपती शिवरायांच्या न भूतो न भविष्यती अशा कर्तृत्वावरती माती टाकणाऱ्या या सावरकरी परंपरेने जी. डी. (बापू) लाड, क्रांतीसिंह नाना पाटील, नागनाथअण्णा नाईकवाडी, किसन वीर, किसन आहीर, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, उत्तमराव पाटील, लिलाताई पाटील, राजमती पाटील यासारख्या असंख्य बहुजन नायक आणि नायिकांचा इतिहास दुर्लक्षित करून, त्यांच्या त्यागाची, पराक्रमाची, यशाची उपेक्षा करून सुमार बुद्धीच्या सुमार कुवतीच्या, अपयशी ठरलेल्या सावरकर, राघोबा, झाशीच्या राणीचा केलेला उदोउदो अक्षम्य आहे. चीड आणणारा आहे. डोळे उघडणारा आहे. बहुजन समाज अजूनही जागा झाला नाही तर येत्या काही वर्षातच या सर्व क्रांतीकारकांचं पूर्ण विस्मरण होऊन जाईल यात शंका नाही. बहुजनांसाठी केवळ रात्रच नाही तर शतकं आणि सहस्त्रकंही वैऱ्याची होती आणि पुढेही राहतील हाच याचा बोध आहे.

सावरकरांच्या पराक्रमासंबंधी भ्रम बाळगणाऱ्यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांचं चरित्र अभ्यासायला हवं. सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातल्या येडेमच्छिंद्र गावी एका कोरडवाहू शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या एका तरुणाने बेचाळीसच्या स्वातंत्र्यलढ्यात दैदिप्यमान पराक्रम करून इंग्रज सत्ता किमान सांगली, सातारा इलाख्यातून पूर्ण नष्ट केली, जन्मतःच वारकरी संप्रदायाची माळ गळ्यात पडलेल्या या युवकाने आपण लढावू संत जगत्गुरू तुकाराम महाराजांचे आणि युगपुरूष छत्रपती शिवरायांचे वारस आहोत हे सिद्ध केलं ते आपल्या कर्तृत्वाने! हे क्रांतीकारक म्हणजे प्रतीसरकारचे सरसेनापती क्रांतीसिंह नाना पाटील! क्रांतीसिंह नाना पाटील यांचं चरित्र अत्यंत रोमहर्षक आणि प्रेरणादायी आहे. ज्ञानाची परंपरा नाही. शिक्षण फक्त फायनल म्हणजे सातवीपर्यंत. महात्मा गांधीजींच्या प्रभावाने ते स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले. घरचं दारिद्र्य, बिकट कौटुंबिक स्थिती असूनही त्याकडे पाठ फिरवून क्रांतीसिंह नाना पाटील यांनी स्वत:ला स्वातंत्र्य चळवळीत झोकून दिलं.

ज्ञानाची प्रदीर्घ परंपरा असलेल्या, परदेशात जाऊन उच्च शिक्षणाची संधी लाभलेल्या, जग पाहण्याची संधी लाभलेल्या तथाकथित स्वातंत्र्यवीरांपेक्षा त्याग, हालअपेष्टा सहण्याची ताकद, चातुर्य, बुद्धीमत्ता, संघटन कौशल्य या सर्वात सर्वार्थाने सरस असलेल्या क्रांतीसिंहांनी जो पराक्रम गाजवला, त्यांच्या नखाचीही सर ज्या बोलबच्चन माफीवीराला नव्हती त्याचे पुतळे गावागावात आणि क्रांतीसिंह अज्ञातवासात हे वास्तव खुपणारं, अस्वस्थ करणारं, चीड आणणारं आहे. क्रांतीसिंह आठ वेळा तुरुंगात गेले. नवव्या वेळी त्यांनी अटक व्हायचं नाही असं ठरवलं आणि इंग्रजांनी जंग जंग पछाडलं तरी ते सापडले नाहीत. नुसते शब्दांचे फुगे फुगवणाऱ्या तथाकथित क्रांतीकारक सावरकरांना ना अटक टाळता आली, ना तुरूंगातून निसटता आलं. लिलाताई पाटील या स्त्रीने स्वत:ची सुटका करून घेण्यात दाखवलेली कल्पकता, बुद्धी वा शौर्यसुद्धा सावरकरांच्या सुटकेच्या फुसक्या प्रयत्नांपेक्षा सरस होतं. पण अशा लिलाताई पाटील, राजमती पाटील, लक्ष्मीबाई नाईकवाडी, विजयाताई लाडांसारख्या वीरांगणांची कोणाला साधी माहितीही नाही आणि फुसक्या स्वातंत्र्यवीराचा उदोउदो करायला त्यांची भक्त मंडळी थकत नाही. क्रांतिसिंह म्हणाले होते, “४२ च्या चळवळीत रक्त सांडलं सातारी फाकड्यांनी आणि लोण्याचा गोळा हाणला त्या बामणगड्यांनी. क्रांतिसिंहांच्या या उद्गाराचं प्रत्यंतरच वारंवार येत असतं.

क्रांतिसिंह नाना पाटील यांना जिवंत वा मृत पकडण्याचा आदेश इंग्रजांनी काढला होता. पण काही झालं तरी इंग्रजांच्या हाती सापडायचं नाही असा क्रांतिसिंहांचा निर्धार होता. क्रांतिसिंह भूमिगत अवस्थेत राहत असतांना सातत्याने जागा बदलाव्या लागत. अशाही अवस्थेत रात्री गुप्त बैठका घेऊन तरूणांना स्वातंत्र्यलढ्यासाठी उद्युक्त करण्याचं काम सुरूच होतं. डिसेंबर १९४२ मध्ये अचानक हजार बाराशे पोलिसांनी कुंडल गावाला वेढा घातला. पण वेढ्याची बातमी आधीच कळाल्याने क्रांतिसिंहांना हलवलं, सावळाराम धनगर यांच्या पत्र्याच्या कुटीत त्यांना लपवून बाहेरून गंजकं कुलूप लावण्यात आलं होतं. पोलिस घराघरात घुसून झडती घेत होते. जी. डी. (बापू) लाड, आप्पासाहेब लाड, रामभाऊ पवार, शाहिर निकम यांच्या घरातील लोकांना चौकशीच्या नावाखाली मारहाण करण्यात आली. इकडे दुपारच्या रणरणत्या उन्हाने पत्र्याची खोली इतकी तापली की गुदमरायची वेळ आली. अशातच कोपीतल्या बिळातून एक भला मोठा नाग बाहेर आला. फणा काढून उभा राहिला. बाहेर पोलीस आत नाग! क्रांतिसिंहांना दरदरून घाम फुटला. पण पोलिसांच्या हाती पडण्यापेक्षा नाग चावून मेलेलं बरं असा निर्धार करून क्रांतिसिंह बसून राहिले. काही वेळाने नाग परत बिळात निघून गेला..

दुसऱ्या एका प्रसंगी पांडू गुरव यांची खोली जरा आडबाजूला होती म्हणून एकदा क्रांतिसिंहांना तिथे ठेवलं होतं. पांडू गुरव बाहेर रहायचे. पण खोलीवर लक्ष ठेवायचे. मधून मधून चकरा मारायचे. नैसर्गिक विधीची सोयही केली होती. गाव गुडूप झोपल्यावर पांडू गुरव खोलीवर येतं, क्रांतिसिंहाना गावाबाहेर नेत, शौच्च, आंघोळ उरकून चिटणीसाच्या घरून आलेलं जेवण करत. पुन्हा खोलीत बंद! खोली दिवसरात्र बंदच रहात असल्याने पिसवांनी भरून गेलेली असायची. पिसवा इतक्या डसायच्या की खाजवून खाजवून क्रांतिसिंहांच अंग सुजायचं. सतत अंधारात राहिल्याने डोळेही अधू झाले होते. बोलणं अतिशय कमी झाल्याने घशावरही परिणाम झाला होता. भेटायला येणारे थोड्याच वेळात पिसवांनी बेजार होऊन जात. क्रांतिसिंह या खोलीत दिवसरात्र कसे राहतात याचंच त्यांना नवल वाटायचं." क्रांतिसिंहांनी त्या खोलीत दोन महिने काढले, पण तक्रार केली नाही. एकदा पारेगावात रामभाई गुजरांच्या घरात क्रांतिसिंह रहात होते. एके दिवशी रात्री एक वाजता ते राजाराम कौर यांच्या आग्रहाखातर त्यांच्या घरी जेवायला गेले. आणि त्याचवेळी पोलिसांनी पारेगावाला वेढा दिला. घराघराची झडती घेण्यात आली, पण राजाराम कौर यांच्या घरातून पोलिसांना चहापाणी जात असल्याने आणि ते घर पोलिस स्टेशनच्या समोरच असल्याने त्यांच्या घराची झडती घेतली नाही. त्यामुळे क्रांतिसिंह बचावले. पण गावातले पोलिस संशयितांना पकडत होते आणि त्यांचा भयंकर छळ करत होते. राजाराम कौर यांच्या पत्नीने क्रांतिसिंहांना दूध घ्यायचा आग्रह केला. पण क्रांतिसिंह म्हणाले, "माझ्यासाठी लोक बाहेर जीवघेणा मार खात आहेत. त्यांच्या किंकाळ्यांनी माझं मन विदीर्ण झालं आहे. मी दूध कसं घेऊ? सात जन्मी त्यांची ऋणं माझ्याने फिटणार नाहीत.'''''.

पोलिसांनी वेढा उठवला. पण पारेगावावर पाच हजार रुपये सामूहिक दंड ठोठावला. " तरीही, कोणीही पोलिसांना क्रांतिसिंहांचा ठावठिकाणा सांगितला नाही. असंच घोटीला एक महिना राहिल्यावर क्रांतिसिंहांना नरसेवाडीच्या शिवारात आणण्यात आलं. त्यांना एका शेरडाच्या छपरात ठेवून मंडळी दूसरी जागा बघायला गेली. शेरडाच्या छपरात इतक्या पिसवा होत्या की क्रांतिसिंहांचा पांढरा शर्ट थोड्याच अवधीत काळा होऊन गेला. साऱ्या अंगावर पिसवाच पिसवा. खाजवून खाजवून अंग रक्तबंबाळ झालं. तशा अवस्थेत क्रांतिसिंह तीन तास त्या छपरात राहिले.

लेखक बा. ग. पवार लिहितात, "नाना पाटील यांनी अज्ञातवासाचा काळ मरणप्राय यातनांनी घालवला. हलाहल पचविले. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सोसला. स्वातंत्र्य हे सुखासुखी मिळालेलं नाही. स्वातंत्र्यासाठी अनेकांनी कुर्बानी दिलेली आहे याची जाण देशवासियांना, तरूणांना नित्य असावी हीच अपेक्षा!""

क्रांतिसिंह नुसते लपून रहात नव्हते. भूमिगत अवस्थेतही एकाद्या गावी सभा आयोजित केली जाई. हातोहात निरोप जात. पाच-सहा हजार लोक जमत. टेबल, खुर्ची, बत्ती वगैरे काही नसायचं. सारे उत्सुकतेने नाना पाटील यांची वाट पाहत असत आणि अचानक 'भारत माता की जय'! 'महात्मा गांधी की जय'! 'वंदे मातरम'! अशा घोषणा देत आणि मांडीवर शड्डू ठोकत नाना पाटील जनसमुदायापुढे हजर होत. सारा समुदाय नाना पाटलांचा जयजयकार करी. टाळ्यांचा कडकडाट होई. नाना पाटलांच्या आवेशपूर्ण भाषणांनी सारा समुदाय थरारून जाई. आवेशाने पेटून उठे. कुठल्याही क्षणी पोलिसांची धाड पडायची शक्यता असे. कधी गोळीबार होईल याची शाश्वती नसे. 'करेंगे या मरेंगे', 'इंग्रजांनो चालते व्हा' या घोषणात सभा संपे आणि घोषणा सुरू असतांनाच नाना पाटील दिसेनासे झालेले असत.

भूमिगतांच्या एका सभेतलं क्रांतीसिंहांचं मनोगत त्यांच्या शूर मानसिकतेचं दर्शन घडवतं. १००-१५० तरुण कार्यकत्यांशी बोलतांना क्रांतीसिंह म्हणाले, “... तुम्ही जे जे केलं त्याला माझा आशीर्वाद होताच. तुम्ही जे जे केलं त्याची जबाबदारी माझ्यावर येते... तुमचं धाडस, कर्तृत्व, बुद्धिमत्ता जो इतिहास घडवेल तो माझ्या नावावर जमा होतोच आहे आणि होईल. याप्रसंगी मी एवढंच सांगतो, तुम्ही साम्राज्य सत्तेचे जे राजकीय गुन्हे कराल, त्याबद्दल येणारी शिक्षा मी माझ्या माथी घेईन. तुमच्या कर्तृत्वाच्या ज्वलज्जहाल देशभक्तीच्या शिगेवर इंग्रजी सत्तेचा गळफास लोंबत असणारच. तो गळफास माझ्या कोवळ्या साथीदारांच्या गळ्याला येऊ देणार नाही. तो फास घ्यायला या नाना पाटलाचा गळा सदैव हजर आहे. तुम्ही लढत रहा.'

सावरकरांच्या प्रेरणेने अनंत कान्हेरेने जॅक्सनचा खून केला आणि फाशी गेला. सावरकरांचा अनुयायी नथुराम गांधीजींचा खून करुन फासावर गेला. सावरकर मात्र करुन सवरुन नामानिराळे राहिले. अंदमानमधून सुटका करुन घेतांना याला माफ केलं, त्याला माफ केलं आणि मला नाही केलं म्हणून गान्हाणं गाणारे सावरकर, अनुयायी फासावर जात असताना स्वतःची कातडी बचावणारे सावरकर आणि साऱ्या सहकाऱ्यांच्या आणि अनुयायांच्या कृत्याची जबाबदारी स्वत:वर घेऊन त्यासाठी स्वतः फासावर जाण्याची तयारी असलेले क्रांतीसिंह यात खरे क्रांतीकारक, स्वातंत्र्यवीर कोण हे सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट आहे.

  • सावरकर-  भ्रम आणि निरास
  • लेखक - उल्हास पाटील
  • पुस्तक विकत घेण्यासाठी संपर्क
  • प्रदीप पाटील.... मोब- 9860831776
  • पुस्तके कट्टा, ३२, राजश्री कॉलनी,  दस्तूर नगर, अमरावती 
  • सगळ्यात कमी पोस्टेज खर्च

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या

  1. हा लेख म्हणजे केवळ ब्राम्हण द्वेषातून लिहीला आहे. भगतसिंग किंवा मदनराव धिंग्रा हे धनाजी संताजी सारखे मावळे आहेत. त्यांचा राजा सावरकर. जसे निवारणासाठी मावळे 'कामी' आले. पण स्वतः शिवरायांचं गृहकलहात गेले. तसेच आपले आदरणीय सावरकर.

    उत्तर द्याहटवा
  2. सुबोध जी, जरा फोन घेत जा. लोकांच्या प्रतिक्रिया ऐका. बरे वाटेल. तुम्हाला जे वाटेल ते छापून मोकळे नका होऊ. दुसरी बाजूही ऐका. तुम्ही ज्या बाबासाहेब ना मानता, त्यांचे सावरकरांबदलचे आणि लोकमान्य टिळक यांच्याबद्दल चे लेख वाचा.

    उत्तर द्याहटवा
  3. सुबोध जी, तुम्ही आता खूप मोठे संपादक झाले आहात. आमच्या सारख्या गरीब मित्रांना विसरलात. पण एक विनंती. टिळक, सावरकर आणी आंबेडकर यांना एकत्रित नीट वाचा. तुम्हाला गांधी काय होता ते कळेल.

    उत्तर द्याहटवा

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com