Top Post Ad

इतिहासाची सतत मोडतोड करणे... व्यापक षडयंत्राचा भाग


  समर्थ रामदास नसते तर शिवराय नसते, चाणक्य नसते तर सम्राट चंद्रगुप्त नसते, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबादेत झालेल्या जाहीर कार्यक्रमात केले. त्यांच्या या विधानावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. शिवप्रेमींसह संपूर्ण महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रया उमटत आहेत. राजकीय नेत्यांसह कलाकारांनीही कोश्यारी यांच्यावर टीका करत निषेध नोंदवला आहे.  ‘खोटं बोल पण रेटून बोल’ हे सूत्र वापरून इतिहासाची सतत मोडतोड करणे हे आरएसएस आणि भारतीय जनता पक्षाचे व्यापक कारस्थान आहे, असा आरोप प्रशांत जगताप यांनी केला आहे. महान राष्ट्रपुरुषांचा सतत अवमान करणे व ज्यांचे इतिहासात काडीचे योगदान नाही त्यांचे उदात्तीकरण करणे ही भाजपची मोहीम आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काल केलेलं वक्तव्य हे काही अनावधानाने केलेलं नाही, भाजपच्या व्यापक षड्यंत्राचाच तो भाग आहे, असे ते म्हणाले.

भगतसिंग कोश्यारींच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारात आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे मावळे या स्वराज्यात आहेत तोपर्यंत हे षडयंत्र कधीही यशस्वी होणार नाही असे जगताप यांनी यावेळी ठणकावून सांगितले. “छत्रपतींचा आशीर्वाद” म्हणत साळसूदपणाचा आव आणणारे भारतीय जनता पक्षाचे नेते वास्तवात किती टोकाचे शिवद्रोही आहेत हे वारंवार सिद्ध होत आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता होण्यापूर्वी आपण सगळेच शिवाजी महाराजांचे निष्ठावान मावळे आहोत. 

हीच वेळ आहे सर्व मावळ्यांनी एकजूट होण्याची, भाजप व आरएसएस चे शिवद्रोही कारस्थान उधळून लावण्याची. यापुढे या मनुवादी विचारसरणीच्या विरोधातील आपला लढा अधिक तीव्र होणार आहे, मनुवादाचा समूळ नायनाट केल्याशिवाय आता आपण शांत बसायचं नाही हा संदेश सर्व उपस्थितांना दिला. यावेळी ज्येष्ठ नेते अंकुशआण्णा काकडे , विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष मृणालिणी वाणी, नगरसेवक योगेश ससाने , नगरसेवक सचिन दोडके , प्रदेश प्रवक्ते प्रदीप देशमुख, युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे, युवती काँग्रेसच्या शहराध्यक्ष सुषमा सातपुते, विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रम जाधव, समन्वयक अब्दुल हाफिज, महेश हांडे, दिपक कामठे, गणेश नलावडे, आदींसह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व शिवप्रेमी उपस्थित होते.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, ”देश गुलाम झाला होता, अन्याय-अत्याचार वाढत होते. त्याविरोधात लढण्याचा संकल्प छत्रपती शिवाजी यांनी केला. त्यांना समर्थ रामदासांसारखे गुरू मिळाले, ते सद्गुरू होते. त्यामुळे समर्थ रामदासांशिवाय शिवराय नाही. गुरूचे महत्व सांगताना राज्यपालांनी समर्थ रामदास आणि शिवाजी महाराजांचे उदाहरण दिले .सोबतच चाणक्य आणि चंद्रगुप्त मोर्य यांचाही उल्लेख केला राज्यपालांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे, असे ट्विट भाजपचे राज्यसभेतील खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले आहे. 

या प्रकरणी यशोमती ठाकूर यांनी ट्वीट करत कोश्यारी यांच्या विधानावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. वयाच्या आणि अधिकाराच्या या टप्प्यावर एखाद्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहित नसावा हे न पटण्यासारखं आहे. जाणीवपूर्वक चुकीचा इतिहास पसरवण्याचा उद्योग संघ परिवार अनेक वर्षे करत आला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, महाराजांच्या इतिहासासोबत छेडछाड कराल तर महाराष्ट्र माफ करणार नाही. अशा शब्दात यशोमती ठाकूर यांनी कोश्यारी यांच्यावर ट्वीट करत निशाणा साधला आहे

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानावरून महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी कोश्यारी यांच्याबरोबरच पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला आहे. पटोले यांनी राज्यपालांच्या व्हिडीओ पोस्ट करत महाराष्ट्रात आल्यावर उत्तर द्यावं लागेल, असं मोदींना म्हटलं आहे. मोदी सरकार आणि त्यांचे प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचा अपमान करून आमच्या स्वाभिमानाला सतत आव्हान देत आहेत. महाराष्ट्र हे कदापि सहन करणार नाही. मोदीजी, तुम्ही महाराष्ट्रात आल्यावर या धाडसीपणाबद्दल जनतेला उत्तर द्यावेच लागेल,” असं ट्विट नाना पटोले यांनी केलं आहे.

संजय राऊत म्हणाले की, भाजपने नवीन शिवव्याख्याते निर्माण केले आहेत. त्या संदर्भात भाजपनेच आता भूमिका स्पष्ट केली पाहिजे. अशा प्रकारचं विधान इतर कुणी केलं असतं तर भाजपने एव्हाना रस्त्यावर उतरून गोंधळ घातला असता. आम्हीच कसे महाराजांचे विचारक आणि वारसदार आहोत हे दाखवलं असतं. पण आता त्यांच्याच राज्यपालांनी हे विधान केल्याने महाराष्ट्रात संताप आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. यावर भाजपने ताबडतोब भूमिका घेणं महत्त्वाचं आहे.

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वक विनोद पाटील यांनी औरंगाबाद मध्ये एका कार्यक्रमात बोलत असताना राज्यपाल यांच्यावर जोरदार टीका केली आहे. म्हणाले राज्यपालांनी माफी मागावी, अन्यथा गरज पडली तर त्यांच्या वयाचा विचार न करता धोतरही फेडू, असा इशारा दिला. पाटील पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी काल शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केलं. माहिती नसलेला इतिहास आमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. खरं तर हे बघितल्यानंतर राज्यपालांच्या पोटात जे होतं, ते ओठावर आलेलं आहे. 

राज्यपालजी, आपल्याला जर छत्रपती शिवाजी महाराज कळले नसतील, तर कृपया त्या विषयात नाक खुपसू नका. चुकीच्या गोष्टी आमच्यासमोर मांडू नका, तुमच्या वयाचा विचार करता, तुम्हाला निवृत्तीची गरज आहे, हे कालच्या वक्तव्यावरून स्पष्ट झालं आहे. भारताचे पंतप्रधानांना विनंती आहे, आवाहन आहे की, तात्काळ अशा राज्यपालांची उचलबांगडी करावी. असे राज्यपाल महाराष्ट्राला नको. यांना छत्रपती शिवाजी महाराजच कळलेले नाहीत. राज्यपाल महोदय, आपण तत्काळ माफी मागावी, अन्यथा आम्ही तुमच्या वयाचा विचार न करता गरज पडली तर तुमचं धोतर फेडू. एक शिवभक्त म्हणून या ठिकाणी ठामपणे आपल्याला सांगतो.

स्वराज्याच्या संकल्पनेच्या आणि स्वराज्याच्या निर्मितीत समर्थ रामदास स्वामी यांचा कुठेही वाटा नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची कधीही भेट झालेली नाही. त्यामुळे समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू नव्हतेच. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे विधान हे घातकी, विषारी आहे, असे माजी संमेलनाध्यक्ष व ज्येष्ठ लेखक श्रीपाल सबनीस म्हणाले.

छत्रपती शिवाजीराजेंनी प्रत्यक्षात राजेशाही असतानाही तिचे रूपांतर लोकशाहीत करून एक आदर्श शासन व प्रशासन व्यवस्था तयार केली. त्यांचे कार्य लोकाभिमुख होते. परंतु, महाराज हे उच्चवर्णीय समाजातील नसल्याने त्यांना छत्रपती म्हणून तथाकथित उच्चवर्णीयांनी स्विकारले नाही. अशा मानसिकतेतील विकृत बुद्धीचे लोक महाराजांवर नेहमीच टिका करीत असतात. परंतु, आज संवैधानिक पदावर असलेल्या माणसाकडूनच टिका होत असणार तर  समाजात तेढ निर्माण होणार. राज्यपालांच्या वक्तव्याची राष्ट्रपतींनी दखल घेऊन कारवाई करण्याचे आवाहन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. याबाबत लवकरच पीपल्स रिपब्लिकन पार्टी राष्ट्रपतींना  निवेदन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राचे राज्यपाल हे नेहमीच वाद निर्माण करत असतात काल त्यानी देशाच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात केलेल विधान त्यानंतर उडालेल्या गदारोळ आणी संतप्त प्रतिक्रीया यानंतर केलेला खुलासा हा तर अतिशय संतापजनक आहे   कोणी माहीती दीली त्याचा खुलासा करावा  त्यापूर्वी राज्यपाल भगत सिंह कोशियारी यानी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी. राज्यपाल भगतसिंह कोशियारी यानी केलेला छत्रपति शिवाजी महाराजांचा अपमान आरएसएस भाजपशी सबंधित लोकानी मागील काही दिवसांत पहिल्यांदाच केलेला अपमान नाही .  28 ऑगस्ट 2021 रोजी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही छत्रपति शिवाजी महाराजांचा अपमान करताना  हेच उद्गार काढले होते. ह्याचा विस्मरण अजुन महाराष्ट्रातील जनतेला झालेल नाही.हे एक षडयंत्र आहे आणी ह्याच्यामागे कोण महाराष्ट्र द्रोही आहेत हे महाराष्ट्रातील जनतेला समजलेच पाहीजे

- .मिलिंद खराडे.सदस्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस


छत्रपती शिवाजी महाराज व रामदास यांची समोरासमोर भेट झाली होती. तसेच रामदास छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते , असे सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे कोणतेही रेकॉर्ड उपलब्ध नाही असे लेखी निवेदन महाराष्ट्र शासनानाच्या वकीलांनी औरंगाबाद हायकोर्ट मध्ये दाखल केलेले आहे . याचाच अर्थ असा होतो की छत्रपती शिवाजी महाराज व रामदास यांची समोरासमोर कधीच भेट झाली नव्हती . त्यामुळे रामदास छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू नव्हते , हेच स्पष्टपणे लक्षात येते . 

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ९९५/२००८ केसमध्ये निकाल देताना हे नमूद केले आहे .‌ १८-७-२०१८ रोजी हायकोर्टाचा निकाल वेबसाईट वर दिला आहे ..वरील माहिती मा उच्च न्यायालयात सादर करणारे वकील आर एस एस चे कार्यकर्ते होते . त्यांची मुलाखत आर एस एस च्या खास वकीलांनी घेतली होती . त्यांच्या नेमणूकीसाठी आर एस एस ची पूर्वपरवानगी मिळाली होती . एवढेच नाही तर ह्या वकीलांची निवड व नेमणूक आर एस एस चे कार्यकर्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केली होती.. .. म्हणजेच औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली माहिती आर एस एस ला मान्य आहे ..राज्यपालांनी केलेल्या अनैतिहासिक वक्तव्यामुळे सर्वांनाच आपापल्या परीने वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त करुन एक सकारात्मक जनजागृती करता आली . राज्यपालांनी लहानपणी वाचलेल्या इतिहासातील माहिती घेऊन बोलल्याचे जाहीर केले आहे . त्यांच्या चूकीमुळे पुन्हा एकदा इतिहास ढवळून निघाला आहे .

पुरुषोत्तम खेडेकर चिखली - दिनांक २८-२-२०२२ 


हे पण वाचा --- भवानीने तलवार दिली




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com