Top Post Ad

अश्वघोष जन्मदिन भारतीय कला दिन आणि अभिजात मराठी भाषा दिन साजरा व्हावा !

माजी नाट्यसंमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

मुंबई : भारतीय रंगकला - रंगभूमीचा पाया घालणारा थोर नाटककार अश्वघोष यांच्या जन्मदिवस १ जानेवारी हा "भारतीय कला दिन" आणि १ मे हा दिवस "अभिजात मराठी भाषा दिन" म्हणून राज्यात साजरा करण्यात यावा, अशी मागणी  ज्येष्ठ साहित्यिक तसेच ९९वे अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. 

   मंत्रालयात आपले लेखी निवेदन सादर केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. पुढे ते असेही म्हणाले की, माणसाला दोन गोष्टींचे प्रचंड वेड असते. एक राजकारण आणि दुसरे नाटक. महाराष्ट्रात स्थापत्यकला, शिल्पकला, संगीतकला, तमाशा, दंडार, द्शावतार, किर्तन अशा अनेक कला आहेत. तरीही महाराष्ट्रदेशी कला दिन म्हणून साजरा केला जात नाही. तसेच तो भारतातही साजरा केला जात नाही. त्यामुळे उर्वशीवियोग, राष्ट्रपाल, सारीपुत्र प्रकरण अशी नाटके लिहिणारे आणि स्वतः काव्यकार, गायक तसेच संगीतकारही असेलेले नाटककार अश्वघोष यांचे भारतीय रंगकला - रंगभूमीचे कार्य खूप मोठे आहे. त्यांचा कार्यस्मृतीला वंदनीय ठरेल म्हणून त्यांचा जन्मदिन १ जानेवारी "भारतीय कला दिन" म्हणून साजरा केला गेला पाहिजे. बौधी नाट्य संस्था तो २०११ सालापासून साजराही करीत असल्याचे प्रेमानंद गज्वी यांनी सांगितले.

शिवाय मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळावा म्हणून रंगनाथ पठारे अहवाल केंद्राकडे मान्यतेसाठी वाट पाहत पडला आहे. तेव्हा मराठी भाषेविषयी मराठीमनात आपुलकी निर्माण व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्य निर्मिती दिवस म्हणजे १ मे "अभिजात मराठी भाषा दिन" म्हणून साजरा करण्यात यावा, अशी ही मागणी त्यांनी आपल्या लेखी निवेदनात केली असल्याचे सांगितले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com