तुमची काय इच्छा आहे. मी लटकून फाशी घेऊन टाकू


मुनव्वर फारुकीच्या शोदरम्यान काही हिंदू देवतांचा अपमान केल्याचा आरोप काही संघटनांनी केला. या आरोपांनंतर फारुकीला जानेवारीमध्ये तुरुंगात टाकण्यात आले होते. त्याला जवळपास महिनाभर तुरुंगात राहावे लागले होते.  सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर फारुकी सध्या जामिनावर बाहेर आहेत. तरीही काही जात्यांध संघटनांच्या धमक्यांमुळे स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचे २७ ऑक्टोबरला मुंबईतील तीन शो रद्द करण्यात आले होते. शो रद्द झाल्यानंतर त्याने एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे, ज्यामध्ये त्याने म्हटले आहे की जर तुम्हाला वाटत असेल मी फाशी घेतली पाहिजे तर मी फाशी देखील घेईल, पण त्याचा कोणावरही काही परीणाम नाही होणार. 

मुंबईतील रद्द झालेल्या शोबाबत तो म्हणाला की, मला रोज जीवे मारण्याच्या धमक्या येतात. मी  आतापर्यंत तीन नंबर बदलले आहेत, तरीही धमक्या थांबत नाहीत. तो म्हणाले की, देशातील तरुण जर कोणाला मत द्यायचे हे ठरवू शकत असेल तर काय बघायचे हे देखील ते ठरवू शकतो. सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतरही त्याला काम करू दिले जात नसल्याने त्याने हे म्हटले आहे.  मला दररोज ५० धमकीचे कॉल येतात, मला माझे सिम कार्ड तीन वेळा बदलावे लागले. माझा नंबर लीक झाल्यावर लोक मला फोन करून शिवीगाळ करतात, असे फारुकीने म्हटले आहे. हिंदू देवतांचा अपमान केल्याप्रकरणी फारुकीला अटक करण्यात आली होती. 

बुधवारी एका व्हिडिओमध्ये फारुकी म्हणाला, मी एक (हॅशटॅग) पाहिला ज्यामध्ये गो 'बॅक मुनव्वर' असे लिहिले आहे. असे म्हटले जात आहे की पाकिस्तानात जा, हा तुमचा देश नाही. ही गोष्ट मला टोचत आहे. मी काहीही केले नाही, जुन्या गोष्टी परत आणल्या जात आहेत. द्वेष पसरवला जात आहे. मला शिवीगाळ करण्यासाठी जमाव पाठवला जात आहे, परंतु यातून काय साध्य होईल हे मला समजत नाही.  मुनव्वर पुढे म्हणाला, मी एक सामान्य शो करत आहे, पण तरीही काही लोकांसाठी समस्या निर्माण होत आहेत. मी लोकांची मने जिंकत आहे, त्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. कलाकारावर दबाव आणू नका, नाहीतर मी कॉमेडी सोडेन. पण मी कॉमेडी सोडली तर जगू शकणार नाही.

कॉमेडियन पुढे म्हणाला, माझ्या शोमधून ४०-५० गरीब घरातील लोकांचे घर चालतात. दीड वर्षापासून माझे काम बंद आहे. असे करू नका, द्वेष वाढवण्याचे काम करू नका. लोकांना हसवून दाखवा. जे मला साथ देत आहेत. ते आंधळे नाहीत. काहीही संबंध नसताना माझ्यावर खोटा खटला चालवला गेला आहे. व्हिडिओ संदेशाच्या शेवटी मुनव्वर म्हणाला की, माझी मानसिक शांतता संपत आहे. तुमची काय इच्छा आहे. मी लटकून फाशी घेऊन टाकू. पण कोणाला काही फरक नाही पडणार. चार-पाच दिवस लोक बोलतील, त्यानंतर परत सर्व आधीसारखं होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या