बी.एस.यू.पी योजनेतील लाभार्थ्यांना सदनिकांचे वाटप

 ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासन, ठाणे महानगरपालिका यांच्या आर्थिक सहभागातून जेएनएनआरयूएम अंतर्गत टेकडी बंगला पाचपाखाडी येथे बी.एस.यू.पी योजना राबविण्यात आली. या योजनेमध्ये एकूण 185 लाभार्थी आहे. यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या माध्मयातून 18 मजल्यांची बहुमजली इमारती उभारण्यात आली आहे. सदरचा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी स्थानिक नगरसेवक नारायण पवार, रुचिता मोरे यांनी सातत्याने प्रशासनासमवेत पाठपुरावा केला होता. अखेर  दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पाचपाखाडी येथील बी.एस.यु.पी 185 लाभार्थ्यांना सदनिकांचे सोडत काढून वाटप  करण्यात आले. तसेच येत्या 15 दिवसात घराचा ताबा देण्यात यावा असे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी ठामपाला  दिले. 


 ठाणे महानगरपालिकेच्या कै. अरविंद पेंडसे सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास सभागृह नेते अशोक वैती, उपमहापौर पल्लवी कदम, नगरसेवक नारायण पवार, नगरसेविका रुचिता मोरे, माजी परिवहन सदस्य राजेश मोरे, नगरअभियंता अर्जुन अहिरे, उपायुक्त वर्षा दिक्षीत, समाज विकास अधिकारी दशरथ वाघमारे, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, सुधीर गायकवाड, महापालिकेचे कर्मचारी व संबंधित सदनिकांचे लाभार्थी उपस्थित होते.  बी.एस.यू.पी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या इमारतीत 269 चौ.फूट चटई क्षेत्राच्या सदनिका असून रेनवॉटरहार्वेस्टिंग, सोलर वॉटर, डी.जी. सेट आदी अत्याधुनिक सेवेसहीत इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सोसायटी कार्यालय, व्यायामशाळा, बालवाडी आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या