तर आम्ही देशातील सर्व सरकारी कार्यालये जमीनदोस्त करू

 केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी मागील वर्षभरापासून दिल्लीत सीमांवर आंदोलन करत आहे. सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये अनेक वेळा बैठका झाल्या मात्र शेतकरी आपल्या मागणीवर ठाम आहेत. दिल्ली-गाझीपूर आणि टीकरी बॉर्डरवरील बॅरीकेट्स आणि रस्ता खुला केल्यानंतर राकेश टिकैत यांनी पोलीस प्रशासनाला  चेतावनी दिली की, कोणत्याही परिस्थित हे काळे कृषी कायदे रद्द करू, याशिवाय आम्ही येथून जाणार नाही. अशी ठाम भुमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. जर आम्हाला बळजबरी करून येथून काढण्याचा प्रयत्न केला तर आम्ही देशातील सर्व सरकारी कार्यालये जमीनदोस्त करून टाकू. असे शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले. 


 टिकैत म्हणाले की, सरकार आंदोलनकर्त्यांना हटवण्याचे प्रयत्न करत असून, जेसीबी साहाय्याने आमचे तंबू पाडण्याचे प्रयत्न करत आहे. जर असे झाले तर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आमचे तंबू तयार करू. असा थेट इशारा टिकैत यांनी पोलीसांना दिला आहे.  पोलीसांना बॅरीकेट्स काढून आंदोलनकर्त्यांना तंबू तोडण्याचे प्रयत्न केले आहे. मात्र पोलीसांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. पोलीस म्हणाले की, तंबू आम्ही तोडलेले नसून, फक्त शेतकऱ्यांना हकलण्याचा प्रयत्न आम्ही केला.

दिल्ली पोलीसांनी सांगितले, की जर शेतकऱ्यांनी दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न केला तर, आम्ही आमच्यापद्धतीने शेतकऱ्यांना थांबवू. दिल्लीतील सीमांवर शेतकरी आणि पोलीसांमध्ये मोठ्य़ा प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे की, आंदोलनस्थळावरील आजूबाजूच्या नागरिकांना या आंदोलनामुळे अनेक गोष्टीचे त्रास होत असून, शेतकऱ्यांनी रस्ता देखील बंद केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळावरून उठवण्याची मोहिम सुरु आहे. दोन दिवसांपासून दिल्ली पोलीस टीकरी बॉर्डर सीमांवर बॅरीकेट्स हटवतांना पाहायला मिळत आहे. सध्या या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरु आहे. मात्र मागील सुनावणीत सुप्रीम कोर्टाने म्हटले होते की, रस्तांना अशा प्रकारे बंद करणे हे चुकीचे आहे. दरम्यान, कोर्टात हे देखील स्पष्ट झाले आहे की, रस्ते शेतकऱ्यांनी नाही तर प्रशासनाने बंद केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या