कल्पना सरोज ग्लोबल एव्हीएशन प्रा.लि.चा पहिला एरो-इंजिन दुरुस्ती प्रोजेक्ट नागपुरात


नागपूर - कल्पना सरोज ग्लोबल एव्हीएशन प्रा.लि.(केएसजीए) च्या नागपुरातील प्रस्तावित ‘इंजिन हॉस्पिटल एमआरओ’चे भूमिपूजन रविवारी संपन्न झाले. कल्पना सरोज एव्हिएशनने मिहान-सेझमध्ये १ एकर जमीनीवर हे केंद्र मार्च २०२३ पर्यंत सुरू केले जाणार आहे. देशात सध्या ६०० विमानाचे इंजिन देखभाल-दुरुस्तीसाठी प्रतीक्षा यादीत आहेत. यामुळे या क्षेत्रात मोठा वाव आहे. या केंद्रात वर्षांला ४० ते ६० इंजिनची देखभाल दुरुस्ती केली जाईल. यासाठी स्थानिक लोकांमधून टेक्निशियन घेतले जातील, असे कॅप्टन विनय बांबोळे म्हणाले.


या केंद्राचा संपूर्ण ढाचा उभा करण्यासाठी सुमारे १९ ते २५ कोटी रुपये लागतील. ही रक्कम कामिनी टय़ुब्स लि.कडून घेण्यात येणार आहे. या कंपन्याच्या सीएमडी देखील डॉ. कल्पना सरोज आहेत. संपूर्ण कर्जमुक्त आणि नफ्यातील कंपनी आहे. कॅप्टन विनय बांबोळे यांनी २०१० पासून या प्रकल्पाचा विचार मांडला होता. प्रारंभी त्यांना नागपुरात एव्हीएशन कॉलेज सुरू करण्याचे ठरवले होते. परंतु नंतर इंजिन दुरुस्तीचे केंद्र सुरू करून टप्प्याटप्प्याने वैमानिक प्रशिक्षण केंद्र, हवाई सुंदरी प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याची योजना आहे. त्यांनी प्रारंभी ३० एकर जमीन घेण्याचा विचार केला होता. परंतु नंतर सुरुवात १ एकर पासून करण्याचा निर्णय घेतला, असेही त्या म्हणाल्या. विदर्भातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प मिहानला कल्पना सरोज एव्हीएशनच्या माध्यमातून मोठे बळ मिळेल. यात रोजगार निर्मिती होऊन स्थानिकांना रोजगार मिळेल, असा विश्वास पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केला.

यासंदर्भात कल्पना सरोज ग्लोबल एव्हीएशन प्रा.लि.च्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कल्पना सरोज म्हणाल्या, समाजाचे ऋण फेडण्याची संधी म्हणून आम्ही या प्रकल्पाकडे बघतो. यातून मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मिती होईल आणि स्थानिकांना लाभ होईल, असा दावा त्यांनी केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA