लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी कॉम्रेड एम.ए.पाटील

 लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलनाचे आयोजन या वर्षी ठाण्यात होत आहे. या निमित्ताने मागील काही दिवसांपासून सातत्याने बैठका होत आहेत. या बैठकीत उपस्थित असणाऱ्या अनेक मान्यवरांनी या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून सर्व श्रमिक संघाचे नेते कॉम्रेड एम.ए.पाटील यांचे नाव सुचवले. याबाबत पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी शनिवार दिनांक २३ ऑक्टोबर रोजी प्रमुख कार्यकर्ते कॉ. सुबोध मोरे, छाया कोरेगावकर, जगदीश खैरलिया, सुबोध शाक्यरत्न, रंगा आडागळे, विलास शंभरकर, बाळु उघाडे आदी एम. ए. पाटील यांना त्यांच्या ठाण्यातील कार्यालयात भेटले. त्यांना आगामी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पद स्वीकारण्याची विनंती केली. पाटील यांनीही या सर्वांची विनंती मान्य करून, " स्वागताध्यक्ष पद स्वीकारले आहे.  त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. साहित्य संमेलनाची बातमी प्रसिद्ध केल्याबद्दल प्रजासत्ताक जनता चे आभारी आहोत

    उत्तर द्याहटवा