अतिवृष्टी भागाची शासनाने तात्काळ दखल घेऊन तात्काळ पॅकेज जाहीर करण्याची मागणी

  लातूर जिल्ह्यातील जोमात आलेल्या सोयाबीन पिकाला अखेर ग्रहण लागलच.आधीच मोठ्या प्रमाणावर करपाचा प्रादुर्भाव ओसरताच तोच आठवड्याभरात पासून लागून बसलेल्या पावसाने उभ्या सोयाबीन पिकांमध्ये पाणी थांबले असून शेतकऱ्यांवर आता आणीबाणी वेळ आली आहेसोयाबीन मध्ये पाणीच पाणी झाली असून ऐन काढणीच्या महिन्यात जिल्ह्यात सरासरी दीडपट पाऊस झाल्याने शेतकऱ्यांवर ओला दुष्काळाचे सावट दिसून येत आहे. लातूर जिल्ह्यात सोयाबीन उत्पादन घेणारा मराठवाड्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील अग्रणी जिल्हा आहे. 

अनेक ठिकाणी काढणीला सुरुवात होते तोच पावसाने तोंड काढल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले गेल्या आठ दिवसापासून जिल्ह्यात पावसाने कमी-अधिक प्रमाणात दररोज हजेरी लावली आहे परिपक्व झालेल्या सोयाबीनच्या काढण्याची तयारी शेतकरी करीत असताना ऐन वेळी पाऊस लागून असल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी उभे सोयाबीन पीक पाण्याखाली गेले आहे. सोयाबीन पीक जोमदार आले होते मात्र सुरुवाती ला दीर्घकाळ पावसाने ओढ दिल्याने मार खाल्लेला सोयाबीन पावसानंतर पुन्हा हळव्या व करपा या रोगाने ग्रासले परिणामी पक्वतेचा घटीचा फटका शेतकऱ्यांना बसला. एन काढणीच्या मुहूर्तावर पहिला घासाला खडा लागावा तसा हा पाऊस लागुन बसल्याने परिपक्व झालेल्या सोयाबीनची काढणी आलेले सोयाबीन हे खालून पुढे खुजली आहे पावसामुळे वातावरणात सातत्याने आद्रता वाढली असल्याने व बिया ओलसर राहून व दाणे फुगत असून अनेक ठिकाणी आता  मोड बाहेर येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे 

परिणामी शेतकरी आता गर्भगळीत झाला आहे सोयाबीन काढणीची योग्य वेळ असताना पाऊस लागून बसल्याने उभ्या सोयाबीनकडे केवळ पाहण्या पलिकडे शेतकरी काही करू शकत नाही. शेतात पाऊल घालता येत नाही, पाय ठेवला की दीड वीत चिखलात रुतून बसत आहेत अशा परिस्थितीत सोयाबीन काढणे मोठे जिकरीचे काम झाले असून मजुरीही सोयाबीन काढणीस कोणी तयार नाही . 
कोड कुजल्याने कमकुवत झाड पुन्हा पाण्यात आडवे होत आहे तर  यातून मोड येत असल्याने सोयाबीनला कितपत हाती लागेल हाच एक प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे. अशा परिस्थितीत शासनाने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी.अशी मागणी सुदर्शन बोराडे लातूर प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ यांच्या वतीने करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA