Top Post Ad

राज्याच्या मुख्य सचिवांच्या उपस्थितीत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची आढावा बैठक संपन्न

    आज ठाण्यासह अहमदनगर, पुणे, नाशिक, सातारा या जिल्ह्यांचा राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला. राज्यात काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे नविन रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवितानाच जिल्ह्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त यांच्याशी संवाद साधत कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला. जिल्ह्याचा पॉझीटिव्हीटी दर दोन टक्क्यांहून कमी आहे. मात्र जिल्ह्याच्या लगत असलेल्या मुंबईत रुग्णसंख्या काहीशी वाढत असून ठाणे जिल्ह्याने अधिक सतर्कता बाळगावी. चाचण्यांचे प्रमाण वाढवितानाच जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आदी महापालिका क्षेत्रात देखील रुग्णसंख्या वाढणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी दिले. कोरोनासोबतच काही जिल्ह्यात डेंग्यू, चिकनगुनिया या आजारांचे रुग्ण वाढत आहेत. त्यासाठी महापालिका आणि ग्रामीण क्षेत्रात संबंधित यंत्रणांनी डास उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करण्यावर भर दिला पाहिजे. डास निर्मुलन मोहिम प्रभावीपणे राबविली पाहिजे, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यास यांनी सांगितले.


दरम्यान आज एका पत्रकार परिषदेत बोलताना भारतीय जनता पक्षाचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी आरोप केला की.  ठाणे महापालिकेच्या लसीकरण मोहीमेत राजकारण सुरू असून पक्षपातीपणा केला जात असून महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाकडून विशिष्ट पक्षांनाच लसीकरणासाठी प्राधान्य दिले जात आहे. देशाची लस आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची उठबस अशी स्थिती आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला लस मिळावी यासाठी वेगाने लसीकरण सुरू आहे. मात्र गेल्या एक-दीड महिन्यांपासून ठाण्यात राजकीय दबावापोटी महापालिका प्रशासनाकडून लसीकरणात राजकारण आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना वाव दिला जात आहे. लस एका पक्षाची नाही, महाविकास आघाडीची तर बिल्कूल नाही. ती केंद्र सरकारची आहे. मात्र, ठाण्यात राजकीय पक्षबाजी सुरू आहे. एखाद्या आपत्तीत नागरीकांच्या तोंडचा घास काढून घेणे, हे महाभयानक पाप आहे. त्याचप्रमाणे राजकीय पक्षबाजीमुळे सामान्य नागरीक लसीपासून वंचित ठेवणे, हेही पाप आहे. हाच प्रकार महापालिकेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून घडत आहे. महापालिका प्रशासनाने राजकीय दबावाला बळी पडून लसीकरण मोहीम राबवू नये. अन्यथा गंभीर परिणाम होतील असा इशाराही विनय सहस्रबुद्धे यांनी दिला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com