देशातील सर्व कामगार आणि शेतकरी संघटनांनी भारत बंद आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन


  कल्याण-
शेतकऱ्यांचे विरोधातील तिन काळे कायदे रद्द करण्यासाठी. कामगारांना बरबाद करणाऱ्या चार श्रम संहीता रद्द करण्यासाठी. नवीन येणारे विद्युत बिल रद्द करण्यासाठी. बेरोजगारी संपविण्यासाठी. जीवनावश्यक वस्तूंची (किराणामाल) प्रचंड महागार्ड रोखण्यासाठी. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसची महागाई थांबविण्यासाठी. सरसकट चाललेले खाजगीकरण रोखण्यासाठी. देशाची मालमत्ता व सत्याचा चाहती बाद चाललेली लुट व विक्री थांबविण्यासाठी. देशाला गालावातरयी लामगिरी पामत वाह न वाचविण्यासाठी. देशाची लोकशाही व सं वाचविण्यासाठी, संविधान,लोकशाही समाजवाद, धर्मनिरपेक्षता, स्वतंत्रता, समता,न्याय हि लोकशाही मुल्ये जपण्यासाठी. देशाला भांडवलदारापासून, हुकुमशाही पासून, पारत्र्यांपासून वाचवण्यासाठी. आपण जाणकार व जबाबदार नागरिक म्हणून एकत्र येऊन केंद्र सरकारच्या बेजबाबदार कारभाराचा निषेध करू या  असे आवाहन  श्याम गायकवाड, उमेश बोरगावकर, उदय चौधरी, डॉ.गिरीश लटके, बाबा रामटेके, धनंजय जोगदंड, कळू कोमस्कर, जे.आर.पाटील, परवीन खान / कॉम्रेड लाली  आदींनी केले आहे. 

केंद्र सरकारच्या विरोधातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, कामगार संघटना व मजूर संघटना, सहभागी पक्ष संघटना, कल्याण तालुका भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी आमदार आदमी पार्टी, जनता दल, आर पी आय (सेक्युलर), भारतीय कामगार सेना (शिवसेना पुरस्कृत), आयटक, इंटक, सिटू, एच. एम. एस., एन.टी.यु. आय., लेबर फ्रेंट, एम.एस.इ. वर्कर्स फेडरेशन (बीज कर्मचारी), ए.आय.बी.इ.ए. (बँक कर्मचारी), भारतीय किसान सभा, नागरी हक्क कृती समिती, लाल बावटा रिक्षा चालक मालक संघटना (डोंबिवली), कल्याण रिक्षा युनियन (कल्याण), घरकाम मोलकरीण संघटना, नागरी हक्क संघर्ष समिती, श्रमिक पत्रकार संघटना आणि प्राध्यापक, डॉक्टर्स, विद्यार्थी, महिला, वकील, व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांच्या विविध संघटना. आदींनी कल्याण येथून प्रसिद्धी भारत बंद मध्ये आपला सहभाग नोंदवला आहे.

    ठाणे - २७ सप्टेंबर रोजी शेतकरी, कामगार संघटना आणि विविध राजकीय पक्षांनी भारत बंदची घोषणा केली आहे. त्याचे समर्थनार्थ ठाण्यातील जनतेला आवाहन करण्यासाठी आज विविध कामगार संघटना व संस्थेचे कार्यकर्त्यांनी ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात आवाहन पत्रके वाटली. बहुजन असंघटित कामगार युनियन, श्रमिक जनता संघ, महाराष्ट्र घरेलू कामगार युनियन, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, समता विचार प्रसारक संस्था, आर.एम.पी.आय, ट्रेड युनियन सेंटर आफ इंडिया, कामगार एकता कमिटी, स्वराज अभियान, आयटक आणि जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय (NAPM) आदी संघटनांचे प्रमुख कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते. केंद्र सरकारच्या विरोधात "२७ सप्टेंबर भारत बंद "यशस्वी करूया, असे आवाहन जगदीश खैरालिया, भास्कर गव्हाळे, चंद्रभान आजाद, रवि जोशी, धोंडीराम खराटे, अजय भोसले, मधुसूदन म्हात्रे , सूर्यकांत शिंगे, रवींद्र सोनार, प्रभाकर शेंडगे, विजय बनसोडे यांनी ठाणे रेल्वे स्टेशन वर पत्रके वाटतांना नागरिकांना केले.

  शहापूर -  केंद्र सरकारच्या शेतकरी, कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात 27 सप्टेंबर ला होणारे आंदोलन यशस्वी करण्यासाठी शहापूर रेस्ट हाऊस येथे सर्वपक्षीय कृती समितीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते, याप्रसंगी तालुक्याचे आमदार दौलत दरोडा,कॉ आत्माराम विशे,काँग्रेस तालुका अध्यक्ष महेश धानके,राष्ट्रीय ओबीसी महासंघ प्रदेश अध्यक्ष प्रकाश भांगरथ,  बहुजन विकास आघाडीचे तालुका अध्यक्ष योगेश हजारे,कॉ रमेश जाधव,कॉ संभाजी भेरे,आरपीआय सेक्युलर चे तालुका अध्यक्ष केशव साबळे,एकनाथ तारमळे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

पत्रकारांशी संवाद साधताना आमदार दौलत दरोडा म्हणाले की भाजप सरकार हे शेतकरी, कामगार विरोधी आहेत शिवाय ते सर्वसामान्य वर्गाच्याही विरोधात आहे,देशाचा पोशिंदा दहा महिने आपल्या न्याय हक्कसाठी आंदोलन करत असूनही केंद्र सरकारला शेतक्रयांची दया येत नाही, शेती व शेतकरी संपविण्याचा विडा उचललेल्या या सरकारचा निषेध करण्यासाठी 27 ला भारत बंद आंदोलन असून जनता, व्यापारी, रिक्षा चालक यांनी उस्फुर्त पणे सहभाग नोंदवावा असे दरोडा म्हणाले,  कॉ विशे यांनी आंदोलनाची पार्श्वभूमी विशद करताना देश बिकने नही दुंगा असे म्हणन्राया प्रधान सेवकाने देशाची संपत्ती विकायला काढली आहे,देशाची घटना सुद्धा धोक्यात आल्याचे त्यांनी सांगितले, पत्रकार परिषदेचे प्रस्तावित योगेश हजारे यांनी तर आभार प्रदर्शन महेश धानके यांनी केले  

कोल्हापूर-  शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावेत, हमीभाव कायदा करावा, यासह अन्य मागण्यांसाठी संयुक्त  शेतकरी कामगार मोर्चा तर्फे 27 सप्टेंबरला पुकारलेले 'भारत बंद' यशस्वी करण्याचे आवाहन शेतकरी कामगार पक्षाच्या कोल्हापूर येथील बैठकीत करण्यात आले. शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावेत, हमीभाव कायदा करावा, यासह अन्य मागण्यांसाठी संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा तर्फे 27 सप्टेंबरला पुकारलेले भारत बंद' यशस्वी करण्याचे आवाहन शेतकरी कामगार पक्षाच्या बैठकीत करण्यात आले आहे.


केंद्राने लागू केलेल्या कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी मागील कित्येक महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतक्रयांचे आंदोलन सुरु आहे.  या मुद्यावर शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेच्या अनेक फ्रेया झाल्या. मात्र, कोणताही ठोस मार्ग निघालेला नाही. त्यानंतर आता पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाने जोर पकडला आहे. शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे राकेश टिकैत उत्तर प्रदेशमध्ये नुकतेच महापंचायतीमध्ये केंद्र सरकारला लक्ष्य करताना कृषी कायदे तसेच शेतक्रयांच्या इतर मागण्यांना घेऊन केंद्र सरकारवर टीका केली. तसेच शेतक्रयांच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी 27 सप्टेंबर रोजी भारत बंदचे आवाहन केले आहे.   टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

 1. दै. नवाकाळ शनिवार दिनांक २५ सप्टेंबर २०२१
  संपादकीय जयश्री खाडिलकर-पांडे

  ना. एकनाथ शिंदे नौटंकी बंद करा
  कुणावरही कारवाई होणार नाही हे जाणतो

  ठाण्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या रस्त्यावर उठवून रस्त्यांवरील खड्डे दाखवत आरडाओरड केली. वाहिन्यांचे कॅमेरे समोर येताच पालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. उगाच मोठा आवाज काढून पालिका आयुक्तांना खडसावले. एकनाथ शिंदेंनी ही नौटंकी त्वरित बंद करावी. अवघ्या महाराष्ट्राने खड्डे पडलेले पाहिले आहेत, पावसाळ्यापूर्वी ते भरताना बघितले आहेत, पहिल्या पावसात त्याच्यावरील खडी वाहून जाताना बघितली आहे. सर्वत्र हाच तमाशा सुरू आहे आणि हा तमाशा या वर्षीचा नाही तर वर्षानुवर्षे सुरू आहे. आजवर कधी कुणावर कारवाई होणार नाही याची जनतेला पूर्ण खात्री आहे. कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करायचे आणि मग इतर कुणी निविदा भरली नाही म्हणून त्याच कंत्राटदारांना काम द्यायचे हेही सुरू आहे आणि सुरूच राहणार आहे.
  एकनाथ शिंदे तर तळागाळातून मंत्रिपदापर्यंत पोचलेत. तळातून गाळात आणि गाळातून गाडीत, गाडीतून विमानात हा प्रगतीचा महामार्ग त्यांना नवीन नाही. ठाण्यात पारंपारिक खड्डे आहेत. ठाण्यातील माणूस घरून निघाला तर अर्ध्या तासानंतरही तो तिथेच असतो कारण खड्ड्यातून तो बाहेरच येत नाही. अगदी स्पीडब्रेकरही तुटून तिथे खड्डे झाले आहेत. तिथे पूल असे बांधले आहेत की पुलावरील पाण्याचा निचराच होत नाही. हे दारिद्य्र सतत आहे. ते कुणामुळे आहे तेही सर्वांना माहीत आहे. तरीही एक दिवस रस्त्यावर उतरून आरडाओरड करायची याला काय अर्थ आहे? त्यातून आरडाओरड ही पालिका कर्मचाऱ्यांवरच केली जाते. कारण मंत्र्यासमोर तोंड उघडायची त्यांची हिंमत नाही. मान खाली घालून ऐकून घ्यायचे आणि संध्याकाळी खिशात हात घालून गप्प घरी जायचे याची सवयच लागली आहे. मंत्र्यांचा ऐब राखायचा आणि आपले पोस्टिंग टिकवायचे याच्याशीच मतलब राहतो. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्याला झोडणे हे सोयीचे आणि सुरक्षित असते.
  एकनाथ शिंदे आयुक्तांना म्हणाले की, ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करा, दोषींवर कडक कारवाई होईल. पावसाळ्यात खड्ड्यांवरील खडी वाहून कशी जाते? एकनाथ शिंदे स्वत: जिथे राहतात त्या नितीन कंपनी परिसरात खड्डे आहेत. गेल्या वर्षी होते, त्याच्या आदल्या वर्षी होते, आज आहेत, उद्याही असणार आहेत. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मोठे नेते आहेत. ज्या पालिकेवर आणि ज्या सरकारवर रस्त्यांची जबाबदारी आहे तिथे सर्वत्र शिवसेनेचीच सत्ता आहे. ही सत्ता अलिकडे नव्याने आलेली नाही. ठाण्यातील खड्डे जितके जुने आहेत तितकी जुनी शिवसेनेची सत्ताही आहे. सामान्य माणूस वर्षानुवर्षे हाल सोसतो आहेत. मुंबईत तेच, ठाण्यात तेच, कोकणात जाताना तेच चित्र आहे. चार तासांचा प्रवास नऊ तासातच संपतो. या खड्डयातून काहींचे महाल उभे राहिले, कंपन्या आल्या, हेलिकॉप्टर आली. सामान्य माणसाची मात्र टायर फाटली, नोकरीवर लेटमार्क लागला, काहींचा जीव गेला. आता तर सतत उखडणारे पेव्हर ब्लॉक टाकून खड्डे बुजवण्याचा चमत्कार सुरू आहे. म्हणूनच म्हणतो, एकनाथ शिंदे तुम्ही नौटंकी करू नका. तुमचे पाहून सर्व पालकमंत्री हेच सुरू करतील याचीच आम्हाला धास्ती आहे.

  उत्तर द्याहटवा