Top Post Ad

कळवा- माजिवडा प्रभागातील अनेक बांधकामांवर महापालिकेची कारवाई

.

माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली  या कारवाईतंर्गत माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधील वाघबिळ गांव स्टील्ट + ५ मजली अनधिकृत इमारतवरील मालदा साफ करण्याचे काम सुरू आहे. भाईंदरपाडा येथील नाईट क्वीन (खुशी) या अनधिकृत लेडीज बारचे बांधकाम पूर्णपणे निष्कसित करण्यात आले. ओवळा येथील स्टर्लिंग या अनधिकृत लेडीज बारचे बांधकाम पूर्णपणे निष्कसित करण्यात आले. तसेच ढोकळी येथील डिमार्ट च्या बाजूला चालू असलेले बैठी बांधकाम पूर्णपणे निष्कसित करण्यात आले. 
सदर निष्कासनाची सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त  कल्पिता पिंपळे आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या सहाय्याने करण्यात आली


 दरम्यान  आज कळवा प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकामे निष्कासित कारवाईतंर्गत कळवा प्रभाग समितीमधील लक्ष्मि अपर्टमेंट जवळ आझाद चौक खारेगाव येथे  अमृत पार्क तळ + ९  मजली अनधिकृत इमारतीच्या रुमच्या भिंती व दरवाजे निष्कासित करण्यात आल्या. कळवा मच्ची मार्केट जवळ राज वाईन्स च्या पाठीमागे  ओम मयुरेश सोसायटी तळ + ८  मजली अनधिकृत इमारतीच्या ११ रुमच्या अंतर्गत भिंती निष्कासित करण्यात आल्या. कळवा मार्केट  ते स्टेशन रोड  येथील रस्त्यावरचे फेरीवाले वर कारवाई करण्यात आली सदर निष्कासनाची कारवाई कळवा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त  प्रणाली घोंगे आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या सहाय्याने करण्यात आली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com