Top Post Ad

महाराष्ट्र राज्य ग्रंथालय चळवळ सक्षम होण्यासाठी सक्षम नेतृव ही काळाची गरज

      महाराष्ट्र राज्यातील ग्रंथालय चळवळ ही एक लोकशिक्षणाचे व आपल्या इतिहासाची व संस्कृतीची जपणूक करणारे एक मुक्त विद्यापिठच आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.आणि या ग्रंथालय चळवळीची मातृसंस्था अथवा ग्रंथालय चळवळीचा आत्मा म्हणजेच महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ. या मातृ संस्थेच्या त्रैवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने हा लेखन प्रपंच......

 ग्रंथालय चळवळीत अनेकानी आपले अमूल्य असे योगदान देवून ही चळवळ वाढविली रुजविली त्यासाठी हयात घालविली आहे. आज ही चळवळ अतिशय बिकट अशा परिस्थितीतुन वाटचाल करीत आहे. या चळवळीला उभारी देण्यासाठी सक्षम जाणकार व योगदान देणाऱ्या लढव्वय्या नेतृत्वाची गरज आहे.या चळवळीला उभारी देण्यासाठी सक्षम नेतृत्व देऊन ही निवडणूक कारणी लागवी. आपली ग्रंथालय चळवळ अत्यंत प्रभावीपणे लोकाश्रयावर सुरु आहे. परंतु मागील दहा बारा वर्षात ही चळवळ अडचणीत आहे. नवीन ग्रंथालय मान्यता, वर्गबदल वाढ,कालमाना नुसार अनुदान वाढ या ना अनेक कारणामुळे चळवळीचा विकास खुंटला आहे. या ग्रंथालय चळवळीत अनेकाचे योगदान आहे. त्यापैकीच एक नाव म्हणजे गुलाबराव मगर. त्यांचे चळवळीतील योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या कार्याचा परिचय देणे किंवा आढावा घेणे शब्दात मांडणे शक्य नाही पण तरीही हा प्रयत्न. 

          गुलाबराव आप्पाराव मगर या चळवळीतील लढवय्या नेतृत्वाचा उदय कामगार शिक्षक,स्वेच्छा निवृत्त कापड गिरणी कामगार - सन १९९० पासून ग्रंथालय चळवळीत वाकेश्वर वाचनालय वाकला ता. वैजापूर इतर ब वर्ग संस्थापक - मराठवाडा कामगार ग्रंथालय एन-५,सिडको, औरंगाबाद. कोषाध्यक्ष इतर अ वर्ग- स्वामी रामानंद तिर्थ वाचनालय एन-७, सिडको, इतर ब वर्ग कार्यकारी मंडळ सदस्य - महात्मा ज्योतीबा फुले वाचनालय खैरगांव ता. अर्धापूर, जि. नांदेड इतर क वर्ग उपाध्यक्ष -क्रांतीसिंह नाना पाटील वाचनालय पिशोर,कन्नड इतर क वर्ग अध्यक्ष-औरंगाबाद जिल्हा ग्रंथालय संघ सचिव - मराठवाडा विभाग ग्रंथालय संघ अध्यक्ष-महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार १९९३ कामगार क्षेत्रात राज्य पातळीवर कार्य,सहकार चळवळीत. पतसंस्था,महाराष्ट्र राज्य सहकारी संघ म.पुणे संचालक,औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर ५ वर्षे संचालक , वाकला ग्रामपंचायत ५ वर्षे सदस्य, वाकला वि.का.से. सह. सोसायटी १५ वर्षे चेअरमन , महाराष्ट्र शासनाचा सन २०१६ चा ग्रंथ मित्र पुरस्कार. कामगार / औद्योगिक न्यायालयात व मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे कामगार युनियन सहकारासंबधी व ग्रंथालयाच्या प्रश्नावर स्वत : याचिका दाखल करून बाजु मंडली आहे.

ग्रंथालय चळवळीतील योगदान
१) सार्वजनिक ग्रंथालयाच्या मान्यता रद्द व दर्जा अवनत केल्याबद्दल स्वतः याचिका तयार करुन मा. हायकोर्ट औरंगाबाद येथे स्वत : बाजू मांडून न्याय मिळवून दिला आहे २) २०१२ च्या महसूल पडताळणीतील त्रुटीग्रस्त ५७०१ ग्रंथालयांच्या २ वर्षाच्या अनुदानासाठी ३ वेळी मा. हायकोर्टात याचीका दाखल करुन स्वत : च बाजू मांडली मा. सुप्रीम कोर्टात सुध्दा वकीला मार्फत ह्याच केस मध्ये न्याय मिळवून दिला आहे  ३) मा. हायकोर्ट मुंबई बेंच औरंगाबाद येथे मा. सुप्रीम कोर्टच्या निकालानंतर ही त्रुटीग्रस्त ५७०१ ग्रंथालयांचे अनुदान देण्यास शासन तयार नसल्याने शासनास स्वत : नोटीस देऊन अवमान याचीका दाखल करुन न्याय मिळवून दिला. अशासकीय सदस्य, महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम १९६७ व नियम सुधारणा समिती मुंबई यावर काम केलेले आहे.कामगार, सहकार,नागरी प्रश्नावर आणि ग्रंथालय क्षेत्रात शासकिय अधिकारी व मंत्र्यासोबत शिष्टमंडळ भेटीत सक्रीय सहभाग विकासात्मक आंदोलनात नेहमीच अग्रेसर भूमिका.आणी अशा ग्रंथालय चळवळीतील अग्रणी शिलेदारास महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ अध्यक्ष पदाच्या माध्यमातून शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय चळवळीला गतिमान करण्यासाठी चळवळीतील प्रत्येकाचे पाठबळ सहकार्य, मार्गदर्शन गरजेचे आहे.

 चळवळीतील प्राधान्यक्रम अनुदान वाढ,वर्ग बदल,कर्मचा - याना सेवानियम व किमान वेतन यासाठी शासन दरबारी सर्वाना सोबत घेऊन चळवळीच्या मागण्या मंजूर करण्यासाठी वेळप्रसंगी लोकशाही सनदशीर मार्गाचा अवलंब करून काम करणारा, काम होणार नाही असं लक्षात येताच धरणे आंदोलन,उपोषण,संघर्ष करणारा, सार्वजनिक ग्रंथालयांच्या बाबतीत मंत्रीमहोदयांचा जो गैरसमज झाला आहे, तो दुर करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणारा माणूस म्हणून त्यांना निवडून दिले पाहिजे. ते आपल्या चळवळीच भविष्य उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्नशील राहतील हे नक्की. चळवळीतील सर्व घटकांतील आजी माजी अध्यक्ष तथा पदाधिकारी यांच्यात समन्वयव व सुसंवाद घडवून चळवळीत परिवर्तन घडवण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील.

  एकजूट.सांघिक बांधणी वैचारिक उंची चळवळीचा उत्कर्ष वाचनसंस्कृती वाढीसाठी जेष्ठ मार्गदर्शकाच्या नियंत्रणाखाली काम करण्यास ते बांधिल राहतील. तेंव्हा चळवळीत अधिक जोमानं व कर्तृत्व दातृत्व नेतृत्व करण्यासाठी आपल्या प्रत्येकाच्या सदिच्छा,आर्शिवाद पाठबळ उभे करुन चळवळीच्या माध्यमातून आपले प्रश्न अडचणी दूर करण्यासाठी व एक विचार संकटे व अडचणी अनेकांना येतात. संकटांना संयमाने तोंड द्यावे लागते. संयमातूनच चिकाटीचा गुण मिळतो. चिकाटीच्या गुणातून चारित्र्य तयार होते.चारित्र्यवान माणूस नेहमी आशावादी असतो.आशावादी विचारातूनच सामर्थ्य निर्माण होते. आपल्या विश्वासास व चळवळीस बळकट करण्यास ते पात्र राहतील असा विश्वास चळवळीतील प्रत्येकाच्या मनात आहे.त्या मुळे गुलाबराव मगर यांनी केलेले कार्य कदापी कदापी विसरता येणार नाही. आज पर्यत या चळवळीचा मुख्यघटक म्हणजे ग्रंथालय कर्मचारी यांना केंद्रस्थानी ठेवूनच चळवळीत त्यांचे योगदान वाखण्याजोगे आहे.

    मा.गुलाबराव मगर यानी ग्रंथालय चळवळीत गेली २५ ते ३० वर्षापासून चळवळीत काम करत असताना मी एक सामान्य कार्यकर्ता त्यांना राज्य ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदाची संधी देवून आपल्या सर्वाच्या सोबत राहून काम करण्यासाठी व ग्रंथालय चळवळ चळवळीचा केंद्रबिंदु असलेला ग्रंथालय कर्मचारी यांच्या न्याय हक्क व हिताकरीता कार्यरत राहतील. त्यामुळे या निवडणुकीत त्यांनी यशस्वी होणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना प्रत्येकाच्या सदिच्छा व पाठबळाची गरज आहे. 

गोपाळ अहंकारी ९४२१५०१६५५ उमरगा,उस्मानाबाद.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com