Top Post Ad

मानवाच्या संकटात ऊर्जा देणारी परिचारिका टीम

    कोरोनाची महामारी असो कि दरड कोसळून होणारे नैसर्गिक अपघात,पावसामुळे येणारा महापूर मानवाच्या संकटात सामाजिक बांधिलकी पाळत के.ई.म हॉस्पिटलची टीम म्हणजेच मानवाच्या संकटात ऊर्जा देणारी परिचारिका यांनी 22 जुलै आणि 23 जुलै रोजी कोकणातील महापुराच्या परिस्थिती मध्ये उपस्थित झाली.कोरोना मध्ये पालिकेच्या परिचारिका आणि कामगार वर्ग यांनी गेल्या दीड वर्षांमध्ये अतिशय प्रामाणिकपणे आणि सातत्याने कार्य केले हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले.आता महापुरानंतर परिचारिका आणि कामगार यांच्या एकी मधून पूरग्रस्तांना मदत पोहोचविण्याचा उपक्रम के. ई.एम.रुग्णालय येथील परिचारिका आणि कामगार यांनी हाती घेतला.

 कोकण प्रांतातील महापुरानंतर कोकणातील लोकांचे दुःख आणि टाहो पाहून,तसेच आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचं गांभीर्य समजून एक सामाजिक बांधिलकी पाळत के.ई.म हॉस्पिटलची टीम रुग्णसेवा किंवा आपल्या कुटुंबाला कुठल्याही प्रकारचा व्यत्यय न आणता आपल्या जबाबदाऱ्या सांभाळून रात्रीचा दिवस करून सर्व परिचारिका आणि कामगार यांनी तातडीने मानवांना मदत पोहचवण्याचा ध्यास घेऊन एकत्र मिळून मदत कार्यासाठी लागणारे सर्व कार्य अवघ्या चार ते पाच दिवसांमध्ये पूर्णत्वास आणले.

कोकणांत मुसळधार पावसामुळे खूप मोठी हानी होऊन येथील जनजीवन विस्कळीत झाले, कोरोना आणि तोक्ते वादळामुळे नुकसान झालेली असताना या पावसामुळे नव्याने संकटांची भर पडली डोंगराळ नजीक असलेल्या भागात दरड कोसळून काही लोक मृत्युमुखी पडले. जोरदार पावसामुळे गाय,बैल,शेळी पुरामध्ये वाहून गेले. कित्येक माणसे मृत्युमुखी पडले या हानीमुळे कोकणातील पूरग्रस्तांसाठी तातडीच्या मदतीसाठी के..एम रुग्णालयातील प्रत्येक संवर्गातील कामगारवर्ग वार्डबॉय,डॉक्टर,परिचारिका,टेक्निशियन असिस्टंट,सफाई कामगार यांच्या कडून मदती साठी लागणारे साहित्य सुका खाऊ बिस्किट फरसाण तांदूळ डाळ,चहा पावडर,साखर,मीठ,तेल,मसाला,कडधान्य,माचिस,टूथ ब्रश टूथपेस्ट,साबण,टॉवेल,चादरी,सॅनिटरी पॅड व गृह उपयोगी व संसारात लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू च्या वाटप करण्यात आले एक हात मदतीचा देत के..एम हॉस्पिटल टीम (दि.२९ जुलै) रोजी कोकणच्या दिशेने रवाना झाली होती व दि ३१जुलै.४.३०वाजता के ई एम हॉस्पिटल येथे दाखल झाली या सर्व कर्मचारी इतर वर्ग व स्टाफ यांनी चिपळूण जवळील खेर्डी, महापे कलबसते,पेठमाप,महाड या गावात मदतीचा हात दिला. 

नऊ जणांपासून सुरू झालेल्या या कार्याला बघता बघता प्रचंड प्रतिसाद मिळत गेला आणि एक हात मदतीचा टीमचा विस्तार होऊन पंचवीस लोकांनी या कार्यास मदतीचा एक हात लावत या कार्याची कार्यसिद्धी करण्यास मदत केली. मदत कार्य पोहोचवण्यासाठी लागणारी पूर्वतयारी मध्ये विद्यार्थी परिचारिका यांनी खारीचा वाटा उचलून मोलाचे सहकार्य केले. आणि मदतकार्य चिपळूण वासिया पर्यंत पोहोचवताना तृप्ती लोके,वंदना पाटील,आरती आंगणे,श्रुती गमरे,शुभांगी लाड,भाग्यश्री सानप, प्रथमेश पोयेकर,मोनिका राठोड,रमेश पेवेकर,अमित बनसोडे, वैभव जुवेकर, प्रफुल अहिरे, महिंद्र गरबडे, भाविन भोजे,हनुमंत कल्लाल,शुभम कदम,अमोल माने, प्राजक्ता नांगरे आदी लोकांनी खूप मेहनत घेतली. मानवाच्या संकटात ऊर्जा देणारी परिचारिका टीम ने समाज कार्याची ऊर्जा घेऊन या टीमने अहोरात्र काम करून मदत कार्य हे घरोघरी पोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 

मदत पोहोचवताना मदत घेणारे स्थानिक लोक नगरसेवक तसेच महानगरपालिकेचे सफाई कामगार यांच्याकडून ज्या वेळेस या टीमच्या कामाची पाहणी होत होतीत्यावेळेस त्यांना प्रशंशाची थाप ही प्रत्येकाकडून मिळत होती. के..एम रुग्णालयाचे अधिष्ठाता हेमंत देशमुख आणि आधिसेविका प्रतिमा नाईक यांनी या मानव मदत कार्यास पाठिंबा देत एम एक हात मदतीचा टीमचे मनोबल वाढवले.चिपळूण वासीयांनीही मदत मिळाल्यानंतर के.ई.एम टीमचे आणि केईएम रुग्णालयाचे आभार मानत सर्वांचा निरोप घेतला.


भाग्यश्री बळीराम सानप 

परिचारिका के.ई.एम हॉस्पिटल परेल,मुंबई

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com