मंत्रीपदाचा उपयोग मी शहापूर तालुक्याच्या विकासासाठी करणार- कपिल पाटील यांचे आश्वासन

शहापूर  : ठाणे जिल्ह्याला तब्बल ७४ वर्षांनंतर केंद्र सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले आहे. आणि तेही बहुजन वर्गातील आगरी समाजाच्या व्यक्तीला. हे पद देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाणे जिल्ह्यातील बहुजन वर्गाचा तसेच ठाणे जिल्ह्याचा वनवास संपवला आहे. या पदाचा उपयोग मी देशातील सामान्यांच्या उत्कर्षाबरोबर शहापूर तालुक्याच्या विकासासाठी करणार आहे. असे प्रतिपादन केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपील पाटील यांनी गुरुवारी शहापूर तालुक्याच्या जन आशीर्वाद यात्रे मध्ये केले आहे.  मंत्री कपील पाटील यांची जन आशीर्वाद यात्रा पाच दिवस ठाणे, रायगड जिल्ह्यत आयोजित केली आहे. शहापूर तालुक्यात यात्रेचा चौथा दिवस होता. यावेळी भाजपा नेत्यांबरोबर आगरी समाजातील विविध पक्ष, संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री कपील पाटील यांचे जंगी स्वागत केले. 

   केंद्रात मला मिळालेल्या मंत्री पदाचा उपयोग देशांतील विविध भागांतील सामान्यांच्या उत्कर्षासाठी करणार आहे. शहापूर तालुक्यातील रखडलेली, प्रस्तावित विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे कपील पाटील यांनी सांगितले. शहापूर तालुक्यातील किन्हवली, शेणवा नाका  सापगाव येथे विलास गगे यांनी, शहापूर येथे रमाबाई ब्रिगेड महिला संघटना अध्यक्ष ज्योती भगवान गायकवाड, रिपाइंचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष विनोद थोरात, तालुका जयवंत थोरात  यांनी, खातिवली येथे भाजपचे तालुका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी तर वासिंद येथे राष्ट्रवादी काँग्रेस वासिंद शहर अध्यक्ष संदीप पाटील यांनी व इतर पदाधिकारी यांनी त्यांचे स्वागत केले. समस्यांची माहिती यावेळी मंत्री महोदय कपील पाटील यांना विविध संघटना तर्फे देण्यात आली 
हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आश्वासन पाटील यांनी यावेळी दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या